(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : तुमच्या 'या' चांगल्या सवयी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात; आजपासूनच त्या बंद करा
Health Tips : निरोगी जीवनशैलीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे तुमचा आहार.
Health Tips : जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर तुमची जीवनशैली (Lifestyle) देखील निरोगी असली पाहिजे असं आपण अनेकदा वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. यासाठी दिवसभर अॅक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. निरोगी जीवनशैलीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे तुमचा आहार. निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्यावा आणि भरपूर पाणी प्यावं असं म्हटलं जातं. पण, तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या काही चांगल्या सवयीदेखील तुमच्यासाठी घातक ठरू शकतात.
उदा. चांगली झोप घेणं आरोग्यासाठी चांगले मानले जाते. पण, जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त झोप घेतली तर त्यामुळे तुमचेच नुकसान होते. अशा इतर अनेक सवयी आहेत ज्या तुम्हाला कळत नकळत नुकसान पोहोचवू शकतात.
फळांना मिठाईच्या स्वरूपात खाणं
फळांचा नैसर्गिक गुणधर्म चांगला आहे. पण, अनेकजण मिठाईमध्ये फळांचा वापर करतात. अशा वेळी फळं मिष्टान्न म्हणून खाऊ नयेत. कारण असे केल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जेवणाबरोबर किंवा नंतर लगेच फळं खाणे टाळावे. दोन जेवणाच्या अंतराने फळं खाल्ल्यास त्याचा तुमच्या शरीरावर फारसा परिणाम होणार नाही त्यामुळे ही वेळ योग्य आहे.
भरपूर पाणी पिणे
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी पिणं गरजेचं आहे असं आपण अनेकदा ऐकलं आहे. पण, जास्त पाणी पिणे देखील आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जास्त पाणी प्यायल्याने उलट्या आणि शरीरात सूज यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. असे केल्याने शरीरात पाणी विषारी होऊ शकते आणि अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळे नेहमी आपल्या गरजेनुसार आणि शरीराच्या क्षमतेनुसार पाणी प्यावे.
जास्त व्यायाम करणे
व्यायाम करणं ही एक चांगली सवय आहे. पण, अतिव्यायामही शरीराला नुकसान पोहोचवू शकतात. तसेच शरीर आणि मनावर जास्त ताण येत असताना कोणीही वेट ट्रेनिंग करू नये. जेव्हा बरेच लोक तणावाखाली असतात, तेव्हा ते अधिक कठीण व्यायाम करण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशा स्थितीत व्यक्तीला दुखापत होण्याचा धोका असतो आणि लवकर थकवाही येतो.
चांगल्या फॅटसाठी नट्स घेणे
फॅट्स देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. पण, बर्याच वेळा असे दिसून आले आहे की लोक चांगल्या फॅटसाठी खूप काजू खातात. पण, असे केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, मर्यादित प्रमाणात काजू खा. याशिवाय जास्त प्रमाणात नट्स खाल्ल्याने एखाद्याला अॅलर्जी सारखी समस्या देखील होऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : तुमच्या 'या' सवयींमुळे पाठदुखीची समस्या वाढू शकते; सुटका मिळवण्यासाठी 'हे' व्यायाम करा