Winter Health Tips : रूम हीटरसमोर तासनतास बसणं धोकादायक; 'या' आजारांना देताय आमंत्रण
Winter Health Tips : जर एखादी व्यक्ती रूम हीटरसमोर बराच वेळ बसली तर त्यांच्या त्वचेला खूप नुकसान सहन करावे लागते.
![Winter Health Tips : रूम हीटरसमोर तासनतास बसणं धोकादायक; 'या' आजारांना देताय आमंत्रण Winter Health Tips and safety dos and do not to safely use room heaters marathi news Winter Health Tips : रूम हीटरसमोर तासनतास बसणं धोकादायक; 'या' आजारांना देताय आमंत्रण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/30/7cd259bee27e326fc07f733bb07a1a901703946233981358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Winter Health Tips : हिवाळ्यात (Winter) पडणाऱ्या अति थंडीपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी रूम हिटरचा (Room Heater) सर्वात जास्त वापर केला जातो. उत्तर भारतात थंडीचा कडाका फार जास्त असल्या कारणाने लोकांना थंडीचा मारा सहन करावा लागतो. असे बरेच लोक आहेत जे सतत रूम हीटरसमोर बसतात. बरेच लोक झोपताना रूम हिटर चालू ठेवतात. पण, रूम हिटर आरोग्यासाठी (Health) नुकसानकारक असू शकतो. खरंतर, रूम हीटर लावून सतत बसल्याने आरोग्याला अनेक नुकसान होते. खोलीतील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते. जे शरीराच्या अवयवांसाठी खूप धोकादायक असू शकते.
शरीराच्या 'या' अवयवांना इजा होते
त्वचेवर अॅलर्जी
जर एखादी व्यक्ती रूम हीटरच्यासमोर बराच वेळ बसली तर त्यांच्या त्वचेला (Skin) खूप नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे चेहऱ्यावर मोठे फोड येऊ लागतात आणि संपूर्ण शरीरावर पुरळ उठते. ही एक प्रकारची उष्णतेमुळे होणारी ऍलर्जी आहे. ज्यामुळे खूप नुकसान होते. ते तुमची त्वचा कोरडी करू शकते. याशिवाय केस गळण्याची समस्याही यामुळे सुरू होऊ शकते.
नाकातून रक्तस्त्राव सुरू होतो
रूम हिटरच्या अतिवापरामुळे आपलं नाक कोरडं होतं तसेच नाकातून रक्तस्त्राव सुरू होतो. त्यामुळे नाकाच्या वरच्या भागात वेदना सुरू होतात. हे तुम्हाला आतून त्रास देऊ शकते. त्यामुळे रूम हीटर्सचा वापर जपून करा.
मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो
रूम हिटरच्या अतिवापरामुळे मेंदूला गंभीर नुकसान होते. हिटरच्या अतिवापरामुळे मृत्यूचा धोका वाढतो. याशिवाय खोलीत कार्बन मोनोऑक्साईडची पातळी वाढते त्यामुळे मेंदूमध्ये रक्ताची कमतरता भासते. त्यामुळे मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्रावही होऊ शकतो. आणि हे मृत्यूचे कारण देखील ठरू शकते. त्यामुळे रूम हीटरचा वापर जपून करा. जरी तुम्ही हिवाळ्यात रूम हिटरचा वापर जरी करत असलात तरी जास्त काळ वापरू नका. कारण यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात.
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी तुम्ही स्वेटर, कानटोपी, हातमोजे वापरू शकता. तसेच, जर अति थंड असल्यास शेकोटीचा आधार देखील घेऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Health Tips : सेलिब्रेशननंतर थोडा हलका आणि निरोगी नाश्ता हवाय? 'ही' रेसिपी वापरून पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)