एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुमचा रिझ्युम 2016 या वर्षासाठी कसा असावा?
मुंबईः सध्या तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमचा रिझ्युम कसा असावा याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. रिझ्युम पाहताच तो निवडला जावा यासाठीच्या काही खास टिप्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, असं विल्मींगटनचे कमर्शिअल रिझ्युम लेखक डॉन बुगणी यांनी सांगितलं.
रोजगाराच्या संधी सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे नोकरीसाठी स्पर्धाही तेवढीच वाढली आहे. मुलाखतकर्ते रिझ्युम पाहण्यासाठी जास्तीत जास्त सहा सेकंद देतात, त्यामुळं एवढ्या कमी वेळेत मुलाखतकर्त्यांवर तुमचा प्रभाव पडावा असा रिझ्युम तयार करणं गरजेचं आहे, असं ऑनलाईन नोकरी शोधण्याची सेवा देणाऱ्या दी लॅडर्स फाऊंड या कंपनीने एका अभ्यासात म्हटलं आहे.
रिझ्युम तयार करण्याच्या काही खास टिप्सः
संपर्काची माहिती थोडक्यात असावी
तुमच्याविषयी सर्व माहिती मुलाखतीमध्ये विचारली जाईल एवढा वेळ मुलाखतकर्त्यांकडं नसतो. त्यामुळं तुमचं ई-मेल अकाऊंट, ट्विटर किंवा फेसबुक अकाऊंट यांची हायपरलिंक देणं जास्त सोयिस्कर ठरतं. रिझ्युमवर जास्त माहिती न देता हायपरलिंकसह शहर, राज्य आणि पिनकोड दिला तरी प्रभावी ठरु शकतं.
रिझ्युमची रचना आकर्षक असावी
तम्ही कोणत्या कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज करत आहात, त्यानुसार रिझ्युमची रचना असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या ग्राफिक डिजायनिंग कंपनीमध्ये अर्ज करत असाल तर रिझ्युम हा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यापेक्षा वेगळा असावा.
या व्यतिरिक्त रिझ्युम तयार करताना पेजिनेशनसाठी वेगवेगळे रंग, डिझाईन्स, फाँट आणि संबंधित माहितीचे मथळे देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ संपर्काचा विभाग असेल तर त्याचा उठीव अक्षरात मथळा देणं गरजेचं आहे.
ऑब्जेक्टीव वाक्य नोकरीशी संबंधित असावं
रिझ्युममध्ये ऑब्जेक्टीव लिहिताना अनेकदा आपण ज्या नोकरीला अर्ज केला आहे, त्याला समर्पित नसते. त्यामुळं आपला नोकरी करण्याचा मुख्य उद्देश सांगणारं ऑब्जेक्टीव लिहिणं गरजेचं आहे. स्वतःविषयी माहिती देण्यासाठी वेगवेगळे भाग करु नये. याऐवजी कामाचा अनुभव, उत्कृष्ट कामगिरी ही एका सारांशामध्ये द्यावी. एक छोटासा 'समरी' असा मथळा करुन ही माहिती दिल्यास मुलाखतकर्त्याला एकाच वेळी तुमच्याविषयी सर्व माहिती वाचणं सोपं जातं. महत्वाची माहिती बोल्ड अक्षरात असावी मुलाखतकर्ते रिझ्युम वरुन खाली वाचतात असा अनेकांचा समज असतो. त्यामुळं वरील काही माहिती मोठ्या अक्षरांमध्ये दिली जाते. मुलाखतकर्ते रिझ्युम सध्या खालून वर किंवा मध्येही वाचू शकतात. त्यामुळे अनुभव, कामगिरी अशी माहिती लिहीताना बोल्ड अक्षरात लिहिणं गरजेचं आहे. वेगवेगळे रंग किंवा कमी शब्दात जास्त माहिती सांगणारा रिझ्युम तुमचे तांत्रिक कौषल्य, अनुभव, वैयक्तिक माहिती या गोष्टी महत्वाच्या असल्या तरी त्यावर जास्त जागा खर्च करणे चुकीचे आहे. आपला रिझ्युम एका पानापेक्षा जास्त होऊ नये याची काळजी घ्यावी. कमी शब्दात जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही ज्या नोकरीसाठी अर्ज करत आहात त्या नोकरीला अपेक्षित असेच कौषल्य रिझ्युममध्ये द्यावेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
ट्रेडिंग न्यूज
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement