LGBTQIA Full Form : तुम्ही LGBT बद्दल ऐकले असेल; पण LGBTQIA मध्ये Q, I, A चा अर्थ नेमका माहित आहे का? नसेल तर ही माहिती वाचा
LGBTQIA Full Form : आजच्या काळात, आपल्या देशात समलैंगिकतेला कायदेशीर मानण्यात आले आहे. त्यांना LGBTQIA असे नाव देण्यात आले आहे.
LGBTQIA Full Form : 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. या दिवशी, भारतीय दंड संहितेच्या कलम 377 ची तरतूद बदलण्यात आली होती. ज्यामध्ये एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींमध्ये संबंध ठेवणे बेकायदेशीर मानले गेले होते. सुप्रीम कोर्टाने कलम 377 अंतर्गत समलैंगिक संबंधांना कायदेशीर ठरवत लैंगिक प्रवृत्ती नैसर्गिक असून त्यावर लोकांचे नियंत्रण नसल्याचा निर्णय दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे एलजीबीटी (LGBT) समुदायाला समाजात समान स्थान मिळाले. नंतर, LGBT मध्ये Q नंतर, I आणि A देखील जोडले गेले आणि आता या समुदायाचे पूर्ण नाव LGBTQIA असे झाले आहे. तुमच्यापैकी अनेकांना LGBT चा अर्थ माहित असेल, पण Q, I आणि A चा अर्थ क्वचितच कोणाला माहीत असेल. जर तुम्हालाही त्यांचा अर्थ माहित नसेल तर आज आम्ही तुम्हाला या सर्वांचा अर्थ सांगणार आहोत.
L म्हणजेच लेस्बियन (lesbian) :
जेव्हा एखादी स्त्री पुरुषाकडे आकर्षित न होता स्त्रीकडे आकर्षित होते, त्या स्त्रिला लेस्बियन (lesbian) म्हटले जाते. लेस्बियन सेक्समध्ये दोन्ही पार्टनर स्त्रिया असतात.
G फॉर समलिंगी (Gay) :
त्याचप्रमाणे, जर एखाद्या पुरुषाला एकाच लिंगाचे, म्हणजे केवळ पुरुषाचेच आकर्षण असेल, तर त्याला गे (Gay) म्हणतात. यामध्ये दोन्ही पार्टनर पुरुष असतात.
B म्हणजेच उभयलिंगी (Bisexual) :
जर एखादा पुरुष किंवा स्त्री दोन्ही लिंगांकडे आकर्षित होत असेल तर त्याला उभयलिंगी (Bisexual) म्हणतात. स्त्री आणि पुरुष दोघेही 'बायसेक्शुअल' असू शकतात. यामध्ये, दोन्ही पार्टनर समान किंवा विरुद्ध लिंगाचे असू शकतात.
T म्हणजेच ट्रांसजेंडर (Transgender) :
जेव्हा एखाद्याचे शरीर पुरुषाचे असते, परंतु त्या पुरुषाला स्त्री सारख्या भावना असतात. किंवा जेव्हा एखाद्या स्त्रीचे शरीर असते परंतु तिला पुरुषासारख्या भावना असतात. ते ट्रान्सजेंडरच्या (Transgender) श्रेणीत येतात. जन्मत: प्राप्त झालेल्या लिंगापासून भिन्न भावनांमुळे देखील हे घडते. अनेक लोक पुढे जाऊन त्यांच्या आवडीचे लिंग निवडण्यासाठी नंतर त्यांचे लिंग परिवर्तनसुद्धा करतात.
Q म्हणजेच ‘क्वीयर’ Queer :
Queer या श्रेणीतील लोक आपली तुलना LGBT श्रेणीमध्ये नाही करत. कारण Queer मधील Q हा प्रश्नार्थक अर्थाने वापरला जातो. कारण हे लोक त्यांच्या शारीरिक इच्छा ठरवू शकत नाहीत. म्हणूनच अशा लोकांना क्विअर हे नाव दिले जाते.
I म्हणजेच इंटरसेक्स Intersex :
Intersex या श्रेणीत येणारे लोक शारीरिक लैंगिक अवयवाद्वारे पुरुषही नसतात किंवा स्त्रीसुद्धा नसतात. त्यांचे लैंगिक अवयव निश्चित होऊ शकले नाहीत.
ए म्हणजेच Asexual :
ज्यांना स्त्री आणि पुरुष दोघांबरोबर लैंगिक संबंधात रस नाही त्यांना अलैंगिक (Asexual) श्रेणीमध्ये समावेश केला जातो.
या व्यतिरिक्त, A for Alliance देखील आहे जो LGBTQIA चा भाग नसलेल्या, परंतु त्यांच्या अधिकारांना पूर्ण समर्थन देत असलेल्या लोकांसाठी वापरला जातो.
महत्त्वाच्या बातम्या :