100 आजारांवरचा एकच उपाय रोजच्या आहारात वापरा "हे" फळ
डाळींब हे शरीरासाठी फार उपयुक्त असते. सर्वात जास्त न्यूट्रिशन डाळींबात असते. शरीरातील इम्यूनिटी वाढवण्यासाठी याचा जास्त फायदा होतो.
POMEGRANATE Benefits For Health : डाळिंब (POMEGRANATE) हे एकमेव फळ आहे जे संपूर्ण भारतात मिळते. याचा वापर जर रोजच्या जीवनात केला तर शरीरास खूप फायदा होवू शकतो. न्यूट्रिशनचे सगळ्यात जास्त प्रमाण हे डाळिंबात असते. यामुळेच याला न्यूट्रिशनचे पाॅवर हाउस म्हणले जाते. तसेच या फळात शरीरास उपयुक्त असे पोषक घटक असतात. यात कॅल्शियम (CALCIUM) , पोटॅशियम (POTASSIUM) , सोडियम(SODIUM) , मॅग्नीशियम(MAGNESSIUN) , आयर्न (IRON) , विटामिन (VITAMIN) यांचा समावेश असतो. या फळासोबतच त्याची साल , पान आणि फूल इत्यादी मध्ये देखील पोषक घटक असतात. चेहऱ्यासाठी , पचनासाठी , हृदयासाठी आणि तसेच इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी डाळिंब हे अतिशय उपयुक्त फळ आहे. ज्याचे शरीराला असंख्य फायदे होतात. त्यामुळेच रोजच्या जीवनात डाळिंब खाणे जास्त वाढवले पाहीजे. काय आहेत डाळिंब (POMEGRANATE) खाण्याचे फायदे जाणून घेवूया.
इम्यूनिटी बूस्ट (IMUNITY BOOST)
या फळात अँटीआॅक्सीडंट (ANTI-OXIDENT) असल्या कारणाने याचा फायदा शरीराला खूप जास्त प्रमाणात होतो. .यामुळे आपली बाॅडी अनेक आजारांपासून दूर राहते. विशेष म्हणजे या फळाचा वापर रोजच्या आहारात केला तर तुमचा स्ट्रेस देखील कमी होवू शकतो. इम्यूनिटी बूस्ट (IMUNITY BOOST) करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.
हार्ट हेल्थ (HEART HEALTH)
हृदयाच्या विकारापासून दूर राहायचे असल्यास देखील याचा वापर केला जावू शकतो. या फळात अँटीआॅक्सीडंट असल्याने हृदय विकार होत नाहीत. सोबतच याने बीपी (BLOOD PRESSURE) आणि कोलेस्ट्रॉल (CHOLESTEROL) कंट्रोल मध्ये राहते.
पचन प्रक्रिया सुधारते (DIGESTION)
डाळिंबात फायबरचे (FIBRE) प्रमाण जास्त असल्याकारणाने तुमची पचन प्रक्रिया चांगली राहू शकते. त्यामुळे याचा आहारात जास्त वापर केला तर पचन सुरळीत होवू शकते.
वाढते वय लपले जावू शकते
डाळिंबामध्ये व्हिटामिन सी (VITAMIN C) असल्याने ते तुमच्या त्वचेला तजेलदार बनवते. यात असणाऱ्या अँटीआॅक्सीडंट त्वचेचे अनेक आजार कमी होवू शकतात. त्वचेला जळजळ होणे , लालपणा , कोरडी त्वचा या सगळ्या समस्या कमी होतात. चेहऱ्यावर ग्लो (GLOW) देखील येतो.
अॅनिमीयापासून सुटका होवू शकते
डाळिंबाचा आहारात समावेश असल्याने अॅनिमीयापासून सुटका होवू शकते. तसेच याचे सेवन केल्याने शरीरातील रेड ब्लड सेल (RED BLOOD CELL) वाढतात.
रक्तदाब
डाळिंब शरीरातील रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. ज्यामुळे तुमचा बीपी (BLOOD PRESSURE) कंट्रोल मध्ये राहतो.
इतर महत्वाच्या बातम्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )