Karnataka Cabinet Expansion: कर्नाटकात सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, 'या' नव्या मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
Karnataka Cabinet Expansion: काँग्रेसकने कर्नाटकात सत्ता स्थापन केल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. कर्नाटकात आज एकूण 24 मंत्र्यांनी शपथ घेतली.
Karnataka Cabinet Expansion: कर्नाटकात (Karnataka) सिद्धरामय्या यांच्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) आज करण्यात आला. सिद्धरामय्या (Siddhramaiya) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कर्नाटकात आता नवे मंत्री तयार करण्यात आले आहेत. सिद्धरामय्या आणि डी.के शिवकुमार यांनी काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेत्यांकडून 26 मे रोजी संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब करुन घेतलं. तसेच आज अनेक मंत्र्यांनी शपथ घेत कर्नाटकात आज शपथविधीचा सोहळा पार पडला. काँग्रेसचे नेते एचके पाटील, कृष्णा बायरे गौडा यांनी मंत्रीपदाची तसेच गोपनीयतेची शपथ घेतली. तसेच त्यांच्या सोबत इतर 22 जणांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.
या 24 मंत्र्यांनी घेतली शपथ
कर्नाटकात काँग्रेसच्या 24 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये दिनेश गुंडुराव, शरणबसप्पा दर्शनापुर, एचके पाटील, कृष्णा बायरे गौडा, एन चेलुवरायस्वामी, के वेंकटेश, शिवानंद पाटील, तिम्मापुर रामप्पा बलप्पा, एसएस मल्लिकार्जुन, तंगदगी शिवराज संगप्पा, डॉक्टर एचसी महादेवप्पा, ईश्वर खांद्रे, क्याथासंद्रा एन राजन्ना, डॉक्टर शरणप्रकाश रुद्रप्पा पाटील, संतोष एस लाड, एनएस बोस राजू, सुरेश बीएस, मधु बंगारप्पा, डॉक्टर एमसी सुधाकर, मंकल वैद्य, लक्ष्मी आर हेब्बाळकर, रहीम खान, डी सुधाकर और बी नागेंद्र यांचा समावेश आहे.
काँग्रेसकडून 2024 ची तयारी?
काँग्रेसने जातीय समीरकरण करुन कर्नाटकात 2024 च्या निवडणुकांची तयारी केली असल्याचं आता म्हटलं जात आहे. जातीयवादाचा मुद्दा लक्षात घेऊन काँग्रेसने प्रत्येक समाजाचा किमान एक मंत्री करण्यावर भर दिल्याचं चित्र कर्नाटकात पाहायला मिळत आहे. यामध्ये अनुसुचित जाती, लिंगायत समाज, ब्राह्मण समाज आणि इतर जातींच्या समाजातील प्रत्येकी एक असे मंत्री काँग्रेसकडून निवडण्यात आले आहेत. परंतु पहिल्या मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये उत्तरेपेक्षा दक्षिण कर्नाटकाला जास्त महत्त्व देण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण दक्षिण कर्नाटकातील पाच मंत्र्यांनी आज मंत्रिमंडळाची शपथ घेतली तर उत्तर कर्नाटकातून तीन मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. तसेच अनुसुचित जाती जमातीतले मंत्री करुन काँग्रेसने समाजात सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या समिकरणाचा फायदा काँग्रेसला 2024 होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Karnataka Cabinet expansion | Bengaluru: Congress leaders Santosh Lad, NS Boseraju, Suresha BS, and Madhu Bangarappa take oath as Karnataka Minister pic.twitter.com/w8UK3Rmwyl
— ANI (@ANI) May 27, 2023