(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी झटपट 'हे' सॅलड वापरून पाहा; हेल्दी आणि फीट राहाल
Weight Loss Tips : अॅसिडीटी, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या अनेक समस्या सॅलड खाल्ल्याने दूर होतात.
Weight Loss Tips : सॅलडचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सॅलड हा आपल्या आहाराचा अत्यावश्यक भाग असला पाहिजे कारण ते बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या भाज्या, फळे, बिया आणि पाने वापरली जातात. यामध्ये असलेले पोषण आपल्या शरीरातील अनेक अवयवांच्या कार्यासाठी आवश्यक असते. जेवण्यापूर्वी एक वाटी सॅलड खाल्ल्याने पचनाच्या अनेक समस्या दूर होतात. फळे आणि भाज्यांमध्ये असलेले पोषण आपल्या शरीराच्या अनेक कार्यांसाठी आवश्यक आहे. अॅसिडीटी, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या अनेक समस्या सॅलड खाल्ल्याने दूर होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सॅलड खाल्ल्याने वजन सहज नियंत्रित करता येते. अशाच एका चविष्ट आणि हेल्दी सॅलडची रेसिपीबद्दल जाणून घेऊयात.
वजन कमी करण्यासाठी काही मिनिटांत तयार होणारं हे सॅलड खाऊन पाहा
कडधान्याचं सॅलड कसं बनवायचं?
साहित्य – 1 कप चणे, 1 कप चेरी टोमॅटो अर्धा कापून, 1 काकडीचे तुकडे, 1 लाल सिमला मिरची चिरलेली, लाल कांदा बारीक चिरलेला, 1/2 कप ऑलिव्ह, 1/2 कप चीज, किंचितसा ओवा, 1/4 कप चिरलेला ताजा पुदिना
ऑलिव्ह ऑईल, व्हिनेगर 2 चमचे, 1 ठेचलेला लसूण, ओरेगॅनो 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि मिरपूड
सॅलड बनवण्याची कृती
- एका मोठ्या भांड्यात चणे, टोमॅटो, काकडी, लाल मिरची, लाल कांदा, ऑलिव्ह ऑईल, चीज, अजमोदा आणि पुदिन्याची पाने एकत्र करा.
ड्रेसिंग करण्यासाठी, एका भांड्यात ऑलिव्ह ऑईल, रेड वाईन व्हिनेगर, ठेचलेला लसूण, ओरेगॅनो, मीठ आणि मिरपूड मिसळा.
- चण्याच्या मिश्रणावर हे साहित्य टाका आणि चमच्याने छान मिक्स करून घ्या.
- सर्व्ह करण्यापूर्वी, कोशिंबीर सुमारे 15-20 मिनिटे सॅलडमध्ये घालून ठेवा. ती छान मिक्स होईल. हे फ्लेवर्स एकमेकांत चांगले मिसळण्यास सुरुवात होईल. अशा प्रकारे तुमचं पौष्टिक आणि हेल्दी सॅलड तयार होईल.
तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी हे हेल्दी सॅलड नक्की करून पाहू शकता. यासाठी लागणारं साहित्य अतिशय सोपं आहे. वजन कमी करण्यासाठी इतर अनेक उपाय करण्यापेक्षा हे सॅलड नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :