Weight Loss Drink : वजन कमी करायचंय? मग, आहारात सामील करा ‘हे’ ज्यूस
Weight Loss Food : भाज्या आणि फळांच्या रसात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, जे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत करतात.
![Weight Loss Drink : वजन कमी करायचंय? मग, आहारात सामील करा ‘हे’ ज्यूस Weight Loss Drink Want to lose weight then add this juice to the diet Weight Loss Drink : वजन कमी करायचंय? मग, आहारात सामील करा ‘हे’ ज्यूस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/19/d943bfb0f49895eb9a81d500c526cea5_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Weight Loss Drinks : आहारात ज्यूस सामील केल्यामुळे फळे आणि भाज्यांचे रोजचे सेवन वाढण्यास मदत होते. याशिवाय ते व्हिटॅमिनची पातळी वाढवण्यास, आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास, तसेच वजन कमी करण्यास मदत करतात. आपण घरच्या घरी अनेक प्रकारची फळं आणि भाज्यांपासून रस बनवू शकता. हे रस आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास देखील मदत करतात. भाज्या आणि फळांच्या रसात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, जे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत करतात. फळे आणि भाज्यांच्या रसामुळे पोट देखील बराचवेळ भरलेले राहते. यामुळे वेळी अवेळी भूक लागत नाही. परिणामी वजन नियंत्रणात ठेवता येते. चला जाणून घेऊया अशाच हेल्दी ज्यूसबद्दल...
कारल्याचा रस
कारल्याचा ज्यूस बनवण्यासाठी सर्वप्रथम कारले कापून घ्या. त्याची साल काढू नका, कारण त्याची साल खूप फायदेशीर असते. त्यात भरपूर पोषक घटक असतात. जर, बिया देखील कोवळ्या आणि मऊ असतील, तर बिया काढण्याचीही गरज नाही. कारले आणि आले ज्युसरमध्ये टाकून त्याचा रस तयार करा. त्यात थोडे पाणी, लिंबाचा रस, हळद, काळे मीठ, मध, काळी मिरी घालून चांगले मिसळा. कारल्याचा रस आरोग्याला जास्तीत जास्त फायदे देणारा आणि प्रतिकारशक्ती वाढवणारा आहे.
कोबीचा रस
कोबीचा रस पोट फुगी आणि अपचन यांसारख्या पोटाच्या अनेक समस्यांपासून आराम देतो. यामुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहते. यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते. यासाठी प्रथम कोबी धुवा आणि बारीक कापून घ्या. आता कोबी आणि त्यात अर्धा ग्लास पाणी घालून वाटून घ्या. आता एका भांड्यात पातळ कपडा ठेवा आणि कोबीचे मिश्रण गाळून घ्या. चव वाढवण्यासाठी यात तुम्ही लिंबाचा रस घालून थंड सर्व्ह करू शकता.
टरबूजाचा रस
टरबूजमध्ये खूप कमी कॅलरीज आढळतात. वजन कमी करण्यासाठी, आपण हे फळ रस स्वरूपात आहारात समाविष्ट करू शकता. रस तयार करण्यासाठी, प्रथम टरबूज सोलून त्याचे चौकोनी तुकडे कापून घ्या. नंतर त्याची गुळगुळीत प्युरी बनवा. चाळणीतून हा रस गाळून त्यात चवीनुसार लिंबाचा रस घाला आणि तुमच्या हायड्रेटिंग ड्रिंकचा आनंद घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या :
- Health Tips : विड्याच्या पानाचे आरोग्यदायी आणि सौंदर्यदायी फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या...
- Health Benefits Of Kiwi : रोज किवी खा, विटामिन सीची कमतरता दूर करा
- Covid19 : कोरोनाचा डोळ्यांवर परिणाम; 90 टक्के लोकांच्या दृष्यमानतेत फरक झाल्याचा दावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)