एक्स्प्लोर

Health Tips : मुलांमधील अशक्तपणाची ही 5 लक्षणे आहेत; काळजी घ्या

Health Tips : जर मुलांमध्ये अशक्तपणा असेल तर थोडे गंभीर होण्याची गरज आहे. मुलांमध्ये अशक्तपणामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

Health Tips : लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांना योग्य आहार देणं, त्यांची आवड-निवड जपण हा खरंतर सर्वच पालकांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचप्रकारे आव्हानात्मक आहे. मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणं हे पालकांचं कर्तव्य आहे. ज्यावेळी मुलं आजारी पडतात त्यावेळी अनेक लक्षणेही मुलांमध्ये दिसतात. फक्त त्या लक्षणांची काळजी घेणे आवश्यक आहे. आज आपण अशा लक्षणांबद्दल सांगणार आहोत, जी सामान्यतः लहान मुलांमध्ये दिसून येतात. 

दिवसभर थकवा जाणवणे

जर तुमच्या मुलाचे शरीर निस्तेज राहते. त्याला कोणत्याही गोष्टीत उत्साह राहत नाही. मूल कोणत्याच प्रकारची मस्ती करत नाही. तसेच, जर त्याला डोकेदुखीची तक्रार असेल तर यावेळी मुलाकडे थोडं गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे. ही बालकांच्या अस्वस्थ आरोग्याची लक्षणे आहेत. अशी परिस्थिती उद्भवल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवावे. 

धावताना धाप लागणे

धावताना धाप आणि हृदयाचा वेग वाढणे हे सामान्य आहे. लहान किंवा मोठे कोणतेही मूल वेगवान पावलांनी धावत असेल किंवा चालत असेल तर अशा स्थितीत हृदयाची गती वाढते. पण खेळताना श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल आणि छातीत दुखत असेल तर सतर्क राहण्याची गरज आहे. 

पाय दुखत असल्याची तक्रार करणे

कधीकधी मुलांच्या पायात वेदना होतात. हे सहसा पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे होते. धावताना, उडी मारताना किंवा सर्वसाधारणपणे चालताना त्यांना वेदना होऊ लागतात. कधीकधी लहान मुलांना चालतानाही पाय दुखतात. अशा परिस्थितीत सतर्क राहण्याची गरज आहे. हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असू शकते. 

ताप येणे 

अशी अनेक मुले आहेत ज्यांना दर आठवड्याला किंवा दर काही दिवसांनी ताप येतो. अशा मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली की, वारंवार ताप येत राहतो. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलांची प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक आहे. 

चेहऱ्यावर समस्या 

मुलांमध्ये अशक्तपणाचे सामान्य लक्षण म्हणजे मुलाचा चेहरा कोरडा पडतो. ओठ फुगणे, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येणे, अंगावर पुरळ येणे, गिळताना त्रास होणे ही लक्षणे आहेत. याकडे लक्ष देऊन डॉक्टरांनी उपचार केले पाहिजेत. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Health Tips : झटपट वजन वाढवायचंय? आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणाMuddyache Bola : सांगोल्यात शहाजीबापूंच्या कामावर जनता किती समाधानी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget