एक्स्प्लोर

Health Tips : झटपट वजन वाढवायचंय? आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा; काही दिवसांतच फरक जाणवेल

Weight Gain Tips : जर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात 5 पदार्थांचा समावेश करा.

Weight Gain Tips : आजकाल लोक चांगल्या पर्सनालिटीसाठी वेगवेगळे उपाय करतात. काहीजण जिममध्ये जातात, तर काही डाएट फॉलो करतात. वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआऊट करुन बघतात. वजन कमी करणं जितकं कठीण काम आहे तितकंच वजन वाढवणंही अवघड आहे. काही लोक इतके बारीक असतात की ते जाड होण्यासाठी खूप प्रयत्न करतात. जर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात 5 पदार्थांचा समावेश करा. तुम्हाला महिन्याभरातच त्याचे परिणाम दिसून येतील.  

तूप-साखर खा : मीडिया रिपोर्ट्सनुसार, तूप-साखर हेल्दी पद्धतीने तुमचे वजन वाढवण्याचे काम करते. एक चमचा देशी तुपात एक चमचा साखर मिसळून खा. जेवणाच्या अर्धा तास आधी हे खाल्ल्यास आश्चर्यकारक परिणाम दिसून येईल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे याचे दुष्परिणाम देखील होत नाहीत.

सुके अंजीर आणि मनुके : जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्ही अंजीर आणि मनुका खाऊ शकता. 5 सुके अंजीर आणि काही मनुके रोज रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे खा. महिनाभरात शरीर मजबूत होईल.

दूध आणि केळ्याचे सेवन करा : सकाळी लवकर नाश्त्यात एक ग्लास दूध आणि दोन केळी घेतल्यास तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम दिसून येईल.. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही शेक बनवूनही पिऊ शकता. केळी आणि दुधात असलेल्या कॅलरीजमुळे शरीराचे वजन झपाट्याने वाढते आणि स्टॅमिनाही वाढतो.

दुधासह आंबा खा : अशक्तपणा दूर करण्यासाठी तुम्ही आंब्याचे दुधासोबत सेवन करु शकता. नाश्त्यात खाल्ल्याने काही दिवसांतच त्याचा परिणाम दिसू लागतो. दोन पिकलेले आंबे खाल्ल्यानंतर हलके कोमट दूध प्या. यामुळे शरीरात आश्चर्यकारक बदल होतात. सध्या आंब्यांचा सीझन आहे त्यामुळे बाजारात अगदी सहज ते मिळू शकतात.

ड्रायफ्रूट्स रामबाण उपाय : जर तुम्ही दररोज शेंगदाणे, काजू, बदाम, अक्रोड, मनुका यांसारखे ड्रायफ्रूट्सचे सेवन केले तर तुमच्या शरीराला खूप फायदा होतो. मूठभर ड्रायफ्रूट्स रात्री भिजत ठेवा आणि सकाळी  खा. याचे सेवन केल्याने अशक्तपणा दूर होऊन शरीर मजबूत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Health Tips : पोटाची चरबीही कमी होईल आणि पचनक्रियाही नीट राहील; सकाळी उठल्याबरोबर ही 3 आसनं करा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं?
एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं?
Sharib Hashmi Wife Diagnos Six Times Cancer: आधीच पाचवेळा कॅन्सरवर मात, आता पुन्हा बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीला जीवघेण्या आजाराचं निदान; पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला...
आधीच पाचवेळा कॅन्सरवर मात, आता पुन्हा बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीला जीवघेण्या आजाराचं निदान; पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला...
Vitrified or Glazed Vitrified Tiles: फुल-बॉडी विट्रिफाइड कि ग्लेज्ड विट्रिफाइड टाइल्स? दोघांमध्ये काय आहे फरक, तुमच्या घरासाठी कोणती सर्वोत्तम? वाचा सविस्तर
फुल-बॉडी विट्रिफाइड कि ग्लेज्ड विट्रिफाइड टाइल्स? दोघांमध्ये काय आहे फरक, तुमच्या घरासाठी कोणती सर्वोत्तम? वाचा सविस्तर
हायपरटेन्शन कमी करण्यासाठी मीठ कमी करणे नव्हे, ‘ही’ गोष्ट महत्त्वाची; डॉक्टर सांगतात..
हायपरटेन्शन कमी करण्यासाठी मीठ कमी करणे नव्हे, ‘ही’ गोष्ट महत्त्वाची; डॉक्टर सांगतात..

व्हिडीओ

NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
Pune Accident News: पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
पुण्यात मध्यरात्री थरकाप उडवणारा भीषण अपघात; भरधाव कार पिकअपला धडकली, कारचा चक्काचूर; 8 जण गंभीर जखमी
Dharmendra Pradhan on NEET Exam: 'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
'पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल' शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा
Chennai Super Kings: आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
आयपीएल प्लेऑफची शर्यत अत्यंत रोमांचक झाली असतानाच चेन्नईला हादरा; मॅच विनर खेळाडू दुखापतीने थेट मायदेशी परतला
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
Devendra Fadnavis and PM Modi: मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: देवेंद्र फडणवीस
मोदीजींनी आपल्याला फार मोठा त्याग करायला सांगितलेला नाही, त्यावरुन आपली देशभक्ती सिद्ध होईल: देवेंद्र फडणवीस
Embed widget