Vitamin D For Kids : मुलांमध्ये 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे हाडे आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होते, 'या' आजारांचा वाढतो धोका
Vitamin D Deficiency : मुलांच्या वाढीसाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे मुलांमध्ये अनेक आजार होऊ शकतात.
Kids Health : मुलांच्या योग्य विकासासाठी आणि निरोगी शरीरासाठी चांगले अन्न खूप महत्वाचे आहे. अनेकदा खाण्यापिण्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. अशा वेळी, मुलांमध्ये जीवनसत्त्वं आणि इतर पोषक तत्वांची कमतरता भासते. मुलांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी (Vitamin D) खूप गरजेचे आहे. यामुळेच डॉक्टर मुलांना 15 मिनिटे हलका सूर्यप्रकाश दाखविण्यास सांगतात.
पूर्वीच्या काळी मुलांना मसाज केल्यावर त्यांना बराच वेळ उन्हात सोडले जायचे. शरीरातील इतर जीवनसत्त्व शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे, कॅल्शियम शरीरात योग्यरित्या शोषले जात नाही. त्यामुळे मुलांच्या हाडांचा विकासही थांबतो. तुमच्या मुलामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास ही लक्षणे दिसू शकतात.
मुलांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारे आजार
मेंदूवर परिणाम :
शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास हाडांव्यतिरिक्त त्यांच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. व्हिटॅमिन डी मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि डोपामाइन रसायने तयार करण्यास मदत करते.
अॅनिमियाचा धोका :
मुलांमध्ये दीर्घकाळापर्यंत व्हिटॅमिन डी ची कमतरता राहिल्यास अशक्तपणा येऊ शकतो. शरीरात 30 नॅनो ग्रॅम प्रति मिलिलिटर व्हिटॅमिन डी पेक्षा कमी असल्यास अनेक रोग होऊ शकतात.
प्रतिकारशक्ती कमकुवत :
शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये चिडचिड, लवकर आजार आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे मुले लवकर आजारी पडतात.
हाडांमध्ये तिरकसपणा :
लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत आणि वाकडी होऊ लागतात. त्यामुळे अनेक वेळा मुलांचे पाय वाकलेले असतात. याशिवाय हाडे फ्रॅक्चर आणि जोडण्याची समस्या आहे.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे
मुलांच्या पाठीच्या कण्यावर परिणाम दिसून येतो.
हाडांचा विकास थांबतो.
जर बाळाचे डोके खूप नाजूक असेल तर मुलामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे.
मुलाला चालायला त्रास होणे
मुलांचे वजन वाढण्यास अडथळा
हातांची बोटे वाकडी होऊ लागतात आणि पायाची हाडेही सरळ नसतात.
मुलांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता कशी दूर करावी
नवजात बाळाला कपड्यांशिवाय दररोज 15 मिनिटे उन्हात ठेवावे.
रोज शक्य नसेल तर आठवड्यातून तीनदा 15 मिनिटे उन्हात नक्कीच बसा.
मुलाला दररोज किमान 1 ग्लास फुल फॅट गाईचे दूध द्या. याशिवाय दह्याचा आहारात समावेश करा.
मुलांना ब्रेड, तृणधान्ये, दूध, चीज, चीज, सोया मिल्क आणि संत्र्याचा रस असे फोर्टिफाइड पदार्थ खायला द्या.
मुलांच्या आहारात अंडी, मशरूम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध मासे यासारख्या गोष्टींचा समावेश करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Care Tips: Drink this drink to boost your immune system, it will prevent corona
- Omicron Variant: 5 वर्षांखालील मुलांना होतेय ओमायक्रॉनची लागण, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
- Omicron : ओमायक्रॉनची सौम्य लक्षणे दिसताच स्वतःला असं करा होमक्वारंटाईन, 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )