Valentine Week 2023 : पार्टनरसाठी चॉकलेट डे असेल खास; अशा प्रकारे घरी बनवा चॉकलेट चीज केक
Valentine Week 2023 : या व्हॅलेंटाईन डेला तुमच्या पार्टनरला स्पेशल फिल करण्यासाठी तुम्ही चॉकलेट डेच्या दिवशी हा केक घरी सहज बनवू शकता.
Valentine Week 2023 : व्हॅलेंटाईन वीक अवघ्या काही दिवसांवर आहे. तुमच्या पार्टनरला खुश करण्यासाठी तुमचे काही प्लॅन्स सुरु असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला गोड खाण्याची आवड असेल तर ही स्वीट डिश नक्की करून पाहा. या व्हॅलेंटाईन डेला तुमच्या पार्टनरला स्पेशल फिल करण्यासाठी तुम्ही चॉकलेट डेच्या दिवशी हा केक घरी सहज बनवू शकता. ही एक सोपी नो-बेक चीज केक रेसिपी आहे. अगदी कमी वेळात तुम्ही हा केक तयार करू शकता. तुम्हाला केक बेक करण्याची गरज नाही, त्यामुळे ही रेसिपी लहान मुलांसाठीही सुरक्षित आहे. चीजकेक बनवण्यासाठी तुम्हाला फक्त मोजक्या साहित्याची गरज आहे. रात्रीच्या जेवणानंतर हा चीज केक डेझर्ट म्हणून तुम्ही तुमच्या फॅमिलीला देऊ शकता. चीज केकची बनवण्याची सोपी पद्धत कशी ते समजून घ्या.
नो-बेक चॉकलेट चीजकेकचे साहित्य :
100 ग्रॅम चॉकलेट क्रीम बिस्किटे
1 कप क्रीम चीज
1/2 कप हेवी क्रीम
1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स
150 ग्रॅम दूध चॉकलेट
1/4 कप बटर
1/4 कप पिठीसाखर
नो-बेक चॉकलेट चीजकेक कसा बनवायचा?
स्टेप 1 : केकचा बेस तयार करा
बिस्किटांना एका झिपलॉक बॅगमध्ये ठेवा आणि बारीक करा. बिस्किटांचा चुरा होईपर्यंत नीट कुस्करून घ्या. एका भांड्यात बिस्किटांचा बारीक चुरा घ्या आणि त्यात वितळलेले बटर घाला. हे मिश्रण घट्ट होईल असे करा. आता हे मिश्रण एका भांड्यात ओता फ्रीजरमध्ये ठेवा.
स्टेप 2 : चॉकलेट वितळवा
आता कापलेले चॉकलेट एका भांड्यात ठेवा आणि ते वितळण्यासाठी काही सेकंदासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. त्याच भांड्यात क्रीम चीज, साखर, व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण स्मूथ होईपर्यंत मिक्स करा.
स्टेप 3 : बॅटर तयार करा
एका वेगळ्या भांड्यात, जाड मलई घ्या आणि फेटून घ्या. त्यात चॉकलेटचे मिश्रण टाका आणि हलक्या हाताने रोल करा. साहित्य मिक्स करून बॅटर तयार करा. आता हे मिश्रण आपण आधी बनवलेल्या बिस्किटाच्या खालच्या थरावर ओता. मिश्रण सारख्या प्रमाणात पसरवा.
स्टेप 4 : फ्रीझ करा
आता टीन फ्रीजरमध्ये ठेवा. एक तास किंवा चीजकेक सेट होईपर्यंत फ्रीझ करा. एकदा पूर्ण झाल्यावर, तुम्ही चीज केकला चोको चिप्सने सजवू शकता.
स्टेप 5 : चीज केकचे तुकडे करा आणि सर्व्ह करा. तुमच्या पार्टनरसह नो-केक चॉकलेट चीज केकचा आनंद घ्या.
महत्त्वाच्या बातम्या :