एक्स्प्लोर

Valentine Day Special : 40 वर्ष केवळ वाट बघण्यात घालवलेल्या एका प्रियकराची गोष्ट 

Valentine Day : 40 वर्ष केवळ आपल्या प्रेयसीला बघण्यासाठी थांबलेल्या एखाद्या प्रियकराबद्दल सांगितलं तर तुम्हाला ती दंतकथा वाटेल

Valentine Day Special : 'ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभेविण प्रीती', या तुकारामांच्या अभंगाच्या ओळी आजच्या काळात प्रमाण म्हणून देता येण्यासारखी उदाहरणे दुर्मीळ किंबहुना नाहीतच. अलीकडील काळात आपल्याला दुसऱ्याकडून काही लाभ नसेल तर माणसं हल्ली एकमेकांकडे बघतही नाहीत. हीच समीकरणं नात्यांमध्येही लागू होतात. आपला जोडीदार आपल्या मानसिक, शारीरिक, भौतिक गरजा पूर्ण करू शकत नसेल तर तात्काळ त्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. दोन जीव जे एकमेकांसाठी जान, जानू आणखी काय काय असतात ते छोट्या छोट्या गोष्टींसाठी एकमेकांपासून दूर जातात. पुणे, मुंबईत तर हे प्रमाण अधिकच. तिथल्या वडापाव आणि सामोसाला तयार व्हायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात नाती जुळतात आणि तुटतातही. आणखी प्रयत्न करत  आपल्याला अनुकूल असलेल्या जोडीदाराचा शोध घेत तात्काळ दुसरी नाती जुळवतात आणि कालच्या तुटलेल्या नात्याला ही आजची उथळ प्रेयसी आणि प्रियकरांची झुंड विसरलेली असते. याच काळात मी तुम्हाला एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 40 वर्ष केवळ आपल्या प्रेयसीला बघण्यासाठी थांबलेल्या एखाद्या प्रियकराबद्दल सांगितलं तर तुम्हाला ती दंतकथा वाटेल किंवा, असं कुठे असतं का? म्हणत तुम्ही त्याकडे दुर्लक्ष कराल. पण  ही २० व्या शतकातील भारतात त्यातही आपल्या महाराष्ट्रात जन्मलेल्या एका महान चित्रकार, छायाचित्रकार कैखुसरू माणिकजी मूस तथा केकी मूस या अवलियाची कहाणी आहे. तो किती महान होता याची तो गेल्यावर त्याच्या घरात सापडलेल्या 300 हून अधिक पुरस्कारांच्या लिफाफ्यांचे गठ्ठे साक्ष देतात. विशेष म्हणजे यातील एकही लिफाफा त्याने कधी उघडूनही बघितला नाही. तो किती महान होता याचं आणखी एक उदाहरण म्हणजे दस्तुरखुद्द तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्याच्या घरी जाऊन आपल्याभोवतीच्या व्यापातही त्याची भेट घ्यावीशी वाटली. 5 मिनिटांची ही नियोजित भेट कधी 40 मिनिटांवर गेली ते नेहरूंनाही कळलं नाही. 
 
एका सधन पारशी कुटुंबात जन्मलेल्या केकीला चित्रकलेची प्रचंड आवड असल्याने आपल्या खानदानी व्यवसायात न रमता त्याने मुंबईत कलेचं रीतसर शिक्षण घेतलं. त्यानंतर लंडनमध्ये जाऊन कमर्शियल आर्टमध्ये उच्च शिक्षण घेऊन तो पुन्हा भारतात परतला. काहींच्या मते त्याची लंडनमध्येच त्याच्या प्रेयसीशी पहिली भेट झाली तर काहींच्या मते तो तिला मुंबईत पहिल्यांदा भेटला. असो. तो तिला कधी आणि कुठे भेटला यापेक्षा त्याच्या पुढे काय झालं हे जास्ती महत्वाचं. 

चित्रकला आणि फोटोग्राफीमध्ये उच्च शिक्षण घेऊन भारतात परतलेला केकी त्याच्या मूळ ठिकाणाहून म्हणजे मुंबईतील मलबारमधून चाळीसगावला आला. त्याच्या वडिलांनी व्यवसायाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव  येथे एक घर बांधले होते. तो तिथे आला आणि तिथलाच झाला. तब्बल ४० वर्ष स्वतःला येथे कोंडून घेत या घराला आपले विश्व  करून टाकले. साधना या शब्दाचा अर्थ आपण त्या घरात म्हणजे आताच्या कॆकी मूस  कलादालनात काही वेळ घालवल्यावर आपल्याला लक्षात येऊ शकेल.

ही झाली केकीची कहाणी. मात्र, आता शीर्षकात व्हॅलेन्टाईन डे स्पेशल म्हटल्याप्रमाणे काहीही स्पेशल सांगितलेले नाही. आता यापुढे ये येणारा किस्सा हा तुमचा व्हॅलेंटाईन डे अर्थपूर्ण करेल. तुमच्या नात्यांमध्ये, नाती जुळलीच नसतील तर येत्या काळात जुळणाऱ्या नात्यांमध्ये प्रेम आहे असं म्हणून संपत नाही.  तर त्यासाठी काय करावं लागतं किंबहुना खऱ्या प्रेमाचा अर्थ काय तो उलगडू शकेल. 

केकी प्रेयसीला शेवटचं भेटला तेव्हा तिचं एक वर्ष शिक्षणाचं बाकी होतं.  केकीने मात्र तेव्हा पदवी संपन्न केली होती. त्यामुळे त्याला तेथून निघणं भाग होतं. त्याने ती जागा सोडली आणि तो तिला लवकरच भेटू आशेवर सोडून जाण्यासाठी तयार झाला. तिनेही त्यात होकार भरत मी लवकरच तुला येऊन भेटेन असं सांगितलं आणि दोघेजण आपापल्या मार्गाने निघाले. त्यानंतर केकी चाळीसगावात राहायला आल्यावर मधून मधून तिचे पत्र त्याला येत होते. पत्रांमध्ये उद्याचा आशावाद होता. तो ही रोज तिची वाट बघत होता. आता या वाट बघण्याचीही मजेशीर गोष्ट आहे. दोघांमध्ये शेवटचं काय बोलणं झालं असेल कुणास ठाऊक पण तो रोज रात्री मुंबईहून जाणारा पंजाब मेल रात्री १ वाजता चाळीसगावला थांबल्यावर रोज केकीच्या घराचं बहुदा बंदच असलेलं दार उघडायचं. गाडी गेल्यावर काही वेळाने पुन्हा ते दार बंद व्हायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. हा क्रम किती दिवस चालावा तर ४० वर्ष. एखादी गोष्ट सलग आठवडाभर करावी लागली तर कंटाळा करणारे आपण या नित्यनेमाचा केवळ विचार केला तरी पुरेसं आहे. ४० वर्ष झाल्यावरही केकीला ती भेटली नाहीच पण अधूनमधून येणारी तिची पत्रेही कधीच बंद झाली होती. तरीही केकीचा रात्रक्रम कधी चुकला नव्हता. या दरम्यान तो नुसतीच वाट बघण्यात वेळ घालवत होता का तर नाही. सृजनाची आस असलेल्या या सच्चा आणि संवेदनशील कलाकाराने तब्बल 15000 चित्रे आणि छायाचित्रे काढून कलेचं एक मोठं भांडार पुढच्या अनेक पिढ्यांसाठी चितारलं. आयुष्यभर केवळ देण्याचंच काम तो करत गेला कोणत्याही परत फेडीशिवाय.  आपण आणि आपलं प्रेम याच्या व्याख्या ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या लावत बसाव्यात. प्रेमाचं हे मूर्तीमंत उदाहरण तुमच्यापाशी मांडून मीही त्यातून संयमाचा आणि लाभाशिवाय प्रेमाचा बोध घेऊन थांबतो. जय व्हॅलेंटाईन.

About the author मयूर बोरसे

मयूर बोरसे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget