एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

 Valentines Day : जाणीवा हरवलेल्या जगातील बदलतं प्रेम, खरंच आपण प्रेम जगतो का?

Valentines Day 2022 : प्रेम ही एक अदभूत भावना असते. ती भावना व्यक्त करताच चेहरा खुलतो, बहरतो. एका जीवाने दुसऱ्या जीवावर केलेली ती एक मुक्त उधळण असते. परंतु, बदलत्या काळानुसार प्रेमाचं हे व्यक्त होणं बदलत चाललंय.

Valentines Day 2022 : प्रेम (Love) हा शब्दच केवळ अडीच अक्षरी. परंतु, प्रेम ही एक अदभूत भावना असते. ती भावना व्यक्त करताच चेहरा खुलतो, बहरतो. प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे. ती कधीही, कोठेही आणि कोणावरही होऊ शकतं. प्रेमालां कोणतं बंधन नसतं. एका जीवाने दुसऱ्या जीवावर केलेली ती एक मुक्त उधळण असते. तसं पाहिलं तर प्रेम व्यक्त करण्यासठी ठराविक वेळेची, विशेष दिवसाची किंवा जागेची गरच नसते. 365 दिवस प्रेमाचे आणि प्रेमासाठीच असतात. परंतु, 'व्हॅलेंटाईन डे' हा प्रेमाचा आणि प्रेमवीरांसाठीचा खास दिवस. या दिवशी प्रेमाला जणू चैत्री पालवीसारखी पालवीच फुटते. परंतु, बदलत्या काळानुसार प्रेमाचं हे व्यक्त होणं बदलत चाललंय. 

वाट बघण्याची आणि कुणी तरी येणार म्हणून असणारी आतूरता या सोशल आणि डिजिटल झालेल्या जगाने संपुष्टात आणली. मोबाईल नव्हते त्याकाळातही प्रेम झालेली माणसं होती. चिट्टी लिहिणारी आणि खाणाखुणा करुन चिट्टी देणारी पिढी या जगाने संपवली. आता कुणाला तरी काय तरी वाटतं तेव्हा ईमोजी नावाचं चित्र मोबाईलमध्ये टाईप करायचं आणि पाठवायचं, मग लगेच प्रेम होतं आणि लगेच डेटिंगही होतं. इतकं सगळं सोपं झालंय हे प्रेम. खरचं अलिकडं माणसं इतकी सहज साध्य झाली आहेत  काय? हा प्रश्नच. परंतु, याच सोशल मीडियातून कमी वेळेत जन्माला आलेलं अपरिपक्व प्रेम एखाद्याचा जीवही घेऊ लागलं आहे. प्रेमासाठी फासावर गेलेल्या रोम मधील संत व्हेलेंटाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून जगभरात व्हेलेंटाईन डे साजरा केला जातो. परंतु, या दिवसानिमित्ताने तरी प्रेमाची खरी व्याख्या आणि प्रेमाच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे. 

बदलत्या काळात प्रेम आणि प्रेमाच्या व्याख्याही बदलत गेल्या. यात एकतर्फी प्रेम आणि सोशल मीडियावरील अपरिपक्व प्रेम या दोन गोष्टींनी जागा घेतली आहे. बदलत्या प्रेमांने प्रेम या भावनेचा जणू खूनच केलाय. हिंगणघाटसारख्या घटना याचे ताजे उदाहरण आहे. एकतर्फी प्रेमातून नराधमाने प्राध्यापिकेला जाळून ठार केले. प्रेमाला होकार देत नाही म्हणून सांगलीतील अमृता देशपांडे या भगिणीचा झालेला खून. एक ना दोन अशा कितीतरी अमानुष घटना रोज या जाणीवा हरवलेल्या जगात घडत आहेत. तासंतास चॅटिंग करून सोशल मीडियावरून एकमेकांच्या प्रेमात पडायचं आणि यातूनच पुढे जाऊन हत्या किंवा फसवणूक करायची अशी कितीतरी प्रकरणे रोज घडत असतात. 

प्रेम म्हणजे एकमेकांबद्दलची काळजी, प्रेम म्हणजे जोडीदाराबद्दलचा आदर, प्रेम म्हणजे कोमल भावना. प्रेम करणे म्हणजे त्या व्यक्तीत पूर्णपणे तल्लीन होणे आणि तिच्याविषयी सकारात्मक मूल्यमापन करणे. हे मूल्यमापन बदलल्यास प्रेमभावनेतही बदल होऊ शकतात. प्रेमभावना सतत मनात ठेवायची की हद्दपार करायची, हे सर्वस्वी त्या व्यक्तीवर अवलंबून असते. प्रेमात दोघांनाही एकमेकांबद्दल काळजी असते. त्याला काटा टोचला तर तिला कळ येते आणि तिला काटा टोचला तर याला कळ येते. प्रेमात जोडीदाराचा त्याच्या चांगल्या आणि वाईट गुणांसह स्वीकार करायचा असतो. एकमेकांच्या विचारांचा, भावनांचा आदर करायचा असतो. परंतु, आज प्रेमाच्या या व्याख्यांना तडा गेला आहे. आज उरलय फक्त शारीरिक आकर्षण आणि स्वार्थी वृत्ती. या स्वार्थी वृत्तीतून जीच्यावर एकेकाळी जीव ओवाळून टाकला जात असे तिलाच अतिशय अमानुषपणे संपवलं जातं आहे. एकेकाळी प्रेम ही समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी केलं जात असायचं. परंतु, आज समोरच्याकडून काहीतरी मिळवण्यासाठी प्रेम केलं जात आहे.    

प्रेम ही भावना अतिशय सामर्थ्यवान असते. ही भावना वर्णन करणे विचित्र आणि कठीण आहे. परंतु जेव्हा आपण प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला ती आतून कळून येते. रोमियो आणि ज्युलियट यांच्या प्रेमाच्या कहाण्यांसारखी इतिहासात प्रेमाची अनेक उदाहरणे दिली जातात. परंतु, ही उदारणे आता फक्त इतिहासातच पाहायला मिळत आहेत. तर अलिकडे या प्रेमातून झालेल्या दुर्देवी शेवटाची उदाहणे दिली जात आहेत. त्यामुळे प्रेम या शब्दाचाचा काहिंना तिरस्कार वाटू लागलाय. परंतु, खरंच या प्रेमाचे पदर समजून घेतले तर प्रेमासारखी अत्युच्य आनंद देणारी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. 

प्रेमाच्या प्रत्येक पदराला अनेक सूक्ष्म पापुद्रे असतात. प्रत्येक पापुद्रा अलवार, नाजूक, प्रत्येक पापुद्रा वेगळा तरीही एकसंघ. प्रेम आणि लैंगिकता, शरीर प्रेम ते अशरीर प्रेम, प्रेम आणि नैतिकता, प्रेम आणि व्यक्तिस्वातंत्र्य असे अनेक पैलू या प्रेमाला आहेत.  प्रेमाकडं तटस्थपणे पाहणं गरजेचं आहे.  प्रेमाकडं पाहण्यासाठी अलौकिक अशी दृष्टी हवी. त्यासोबतच प्रेम समजून घेण्यासाठी  तेवढं सामाजिक भानही हवं. एकमेकांचा जीव घेणारं प्रेम नसावं तर एक मेकांना जीव लावणारं प्रेम असावं. आजच्या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने तरूण पीढिने प्रेमाची खरी व्याख्या आणि प्रेमाच्या भावना समजून घ्यायला हव्यात. प्रेमांचे वेगवेगळे पदर समजून घ्यायला हवेत आणि हे सर्व समजून एकमेकांवर जीवापाड प्रेम करावं. शेवटी काय तर या प्रेमासाठीच जगावं. 

महत्वाच्या बातम्या

Valentine Day 2022 : आजपासून सुरु होतोय व्हॅलेंटाईन वीक, पाहा संपूर्ण यादी

Romantic Destination : ‘व्हॅलेंटाईन डे’ला फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग, ‘ही’ ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athwale On Fadanvis : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, शिंदेंना कोणतंच आश्वासन दिलं नव्हतंABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 26 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-Sunil Bhusara Mumbai : मला मिळायला हवी ती मतं विरोधी उमेदवाराला मिळाली - सुनील भुसाराTOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 25 Nov 2024 : 12 Noon

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Embed widget