Travel: अबब...भारतातील 'या' सर्वात महागड्या रेल्वेगाड्या, तिकीटाची किंमत वाचून बसेल शॉक! आयुष्यात एकदा तरी प्रवासाची अनेकांचं स्वप्न..
Travel: भारतात अशा काही ट्रेन आहेत ज्यांच्या तिकीटाची किंमत हजारांमध्ये नाही तर लाखांमध्ये आहे. पण त्यांच्या सुविधांबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Travel: अप्रतिम निर्मिती... आरामदायी...विविध सुविधा...अशा रेल्वेतून प्रवास करायला कोणाला आवडणार नाही? या व्यस्त जीवनात प्रत्येकाला प्रवासाची आवड आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बहुतांश लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. मात्र कामाच्या आणि वेळेच्या अभावी रेल्वेगाड्यातून प्रवास करणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भारतातील लक्झरी आणि सर्वात महागड्या रेल्वेगाड्यांबद्दल सांगणार आहोत. त्यातील सुविधांबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि भाडं ऐकून तर शॉक बसेल..
तिकीटाची किंमत हजारांमध्ये नाही तर लाखांमध्ये...
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला प्रवासाची आवड आहे. अशा परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बहुतांश लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. वेगवेगळ्या रेल्वेत प्रवास करण्यासाठी वेगवेगळ्या तिकीटांचे दर मोजावे लागतात. पण तुम्हाला माहित आहे का की भारतात अशा काही ट्रेन आहेत ज्यांच्या तिकीटाची किंमत हजारांमध्ये नाही तर लाखांमध्ये आहे. पण त्यांच्या सुविधांबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही लक्झरी आणि महागड्या गाड्यांबद्दल सांगणार आहोत.
'या' आहेत भारताच्या लक्झरी आणि महागड्या गाड्या
महाराजा एक्सप्रेस ट्रेन - सर्वात महागड्या ट्रेनमध्ये गणना
महाराजा एक्सप्रेस ही भारतातील लक्झरी आणि महागडी ट्रेन आहे, या ट्रेनमध्ये 12 डब्यांमध्ये फक्त 88 प्रवासी एकत्र बसू शकतात. ही ट्रेन दिल्लीहून राजस्थानपर्यंत जाते. 4 दिवस आणि 3 रात्री या ट्रेनमधील डिलक्स केबिनचे भाडे प्रति व्यक्ती सुमारे 2 लाख 80 रुपये आहे. ही ट्रेन विशेषतः ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान धावते. महाराजा एक्सप्रेस ही भारतातील सर्वात महागड्या ट्रेनमध्ये गणली जाते.
गोल्डन रथ ट्रेन. - प्रवास करण्यासाठी एका व्यक्तीचे भाडे तब्बल लाखभर
गोल्डन रथ ही लक्झरी आणि महागडी ट्रेन आहे. ही ट्रेन बेंगळुरू, हम्पी, बदामी, कोची इत्यादी ठिकाणांहून जाते. गोल्डन रथमध्ये प्रवास करण्यासाठी एका व्यक्तीचे भाडे 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
पॅलेस ऑन व्हील्स ट्रेन - 4.8 लाख रुपये खर्च
पॅलेस ऑन व्हील्स ट्रेन ही भारतातील पहिली लक्झरी ट्रेन आहे. राजस्थान पॅसेंजर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि भारतीय रेल्वे यांनी संयुक्तपणे याची सुरुवात केली होती. पॅलेस ऑन व्हील्स ही ट्रेन दिल्लीहून जयपूर, उदयपूर, जैसलमेर आणि आग्रा मार्गे जाते. पॅलेस ऑन व्हील्स 7 दिवसांच्या प्रवासासाठी 4.8 लाख रुपये खर्च करू शकतात.
डेक्कन ओडिसी ट्रेन - भारतातील सर्वोत्तम ट्रेनपैकी एक
रत्नागिरी, गोवा, कोल्हापूर, नाशिक, कृष्णा आणि मुंबईला परतणारी डेक्कन ओडिसी ट्रेन ही भारतातील सर्वोत्तम ट्रेनपैकी एक आहे. या ट्रेनची रचना पॅलेस ऑन व्हील्सच्या मॉडेलवर करण्यात आली आहे. डेक्कन ओडिसीच्या डिलक्स केबिनचे भाडे प्रति व्यक्ती 9 लाख रुपये असू शकते.
हेही वाचा>>>
Winter Travel: हिवाळा सुरू होण्यापूर्वी ट्रीपला जायचंय? 'या' ठिकाणाचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल, Pre-Winter Vacation साठी परफेक्ट!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )