Winter Travel: हिवाळा सुरू होण्यापूर्वी ट्रीपला जायचंय? 'या' ठिकाणाचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल, Pre-Winter Vacation साठी परफेक्ट!
Winter Travel: तुम्हीही हिवाळा सुरू होण्यापूर्वी कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही देशातील ही ऑफबीट ठिकाणं एक्सप्लोर करू शकता.
Winter Travel: पावसाळा प्रमाणेच हिवाळा ऋतूही अनेकांना आवडतो. कारण या ऋतूत गुलाबी थंडी, आल्हाददायक वातावरण, उत्तम मनमोहक निसर्गसौंदर्य अनेकांना वेड लावतो. सध्या ऑक्टोबर महिना सरत असतानाच नागरिकांना उष्णतेपासून आता दिलासा मिळू लागला आहे. त्यामुळे हिवाळ्याची चाहूल लागली असून या गुलाबी थंडीत लोक प्रवास करण्याचा बेत आखू लागतात. तुम्हीही प्री-विंटर व्हेकेशनसाठी म्हणजेच हिवाळ्यापूर्वी ट्रीपसाठी परफेक्ट ऑफबीट डेस्टिनेशन शोधत असाल तर, ही ठिकाणं नक्कीच एक्सप्लोर करा...
ऑक्टोबर महिना सरताच थंडीची चाहूल, प्रवासासाठी उत्तम काळ
ऑक्टोबर महिना सरत असतानाच थंडीची चाहूल लागली आहे. हिवाळा सुरू होण्यापूर्वी होणारी गुलाबी थंडी प्रवासासाठी खूप चांगली मानली जाते. आता लोक थंडीची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. प्रवासाची आवड असलेले लोक हिवाळ्याच्या आधीच्या काळात त्यांच्या सुट्टीचे नियोजन करू लागतात. अशावेळी, जर तुम्हीही हिवाळा सुरू होण्यापूर्वी कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही देशातील ही ऑफबीट ठिकाणं एक्सप्लोर करू शकता.
गोकर्ण, कर्नाटक
जर तुम्ही समुद्रकिनारा प्रेमी असाल आणि समुद्राजवळ काही निवांत क्षण घालवायचे असतील तर कर्नाटकातील गोकर्ण हा एक उत्तम पर्याय आहे. ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत भेट देण्यासाठी हे एक योग्य ठिकाण आहे. हे सुंदर शहर गोव्यापेक्षा अधिक शांत आणि कमी पर्यटन आहे, जिथे तुम्ही तुमची सुट्टी शांततेत घालवू शकता.
ऋषिकेश, उत्तराखंड
ऋषिकेश हे गंगेच्या काठावर वसलेले एक पवित्र शहर आहे, ज्याला 'जगाची योग राजधानी' म्हणूनही ओळखले जाते. येथे अनेक धार्मिक स्थळे आहेत. याशिवाय हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमची सुट्टी या सुंदर आणि धार्मिक ठिकाणी घालवू शकता, ज्यामुळे तुम्हाला शांतता वाटेल.
वागमोन, केरळ
तुम्हाला तुमची सुट्टी हिरवाई आणि सौंदर्यात घालवायची असेल, तर केरळमधील वागमोन तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. मध्य त्रावणकोरमधील ही छोटी वस्ती चहाच्या मळ्यांनी वेढलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला जवळपास प्रत्येक कोपऱ्यात सौंदर्य पाहायला मिळेल. हिवाळ्यापूर्वीच्या सुट्टीसाठी तुम्ही हे ठिकाण निवडू शकता.
बांधवगड राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश
जर तुम्ही वन्यजीव प्रेमी असाल तर मध्य प्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यान तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. जैवविविधता आणि बंगाल वाघांसाठी प्रसिद्ध, बांधवगड हे ऑक्टोबरमध्ये भेट देण्यासाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
हम्पी, कर्नाटक
हिवाळ्यापूर्वीच्या सुट्टीसाठी तुम्ही कर्नाटकातील हम्पी येथेही जाऊ शकता. हे शहर त्याच्या काळातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक मानले जात असे. जर तुम्हाला इतिहास आणि ऐतिहासिक गोष्टींची आवड असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे. हे शहर, युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ, मंदिरे आणि भव्य वास्तुकला यांचा खजिना आहे.
हेही वाचा>>>
Diwali Travel: दिवाळीची सुट्टी अन् गुलाबी थंडी करा एन्जॉय! 1 दिवसाची सुट्टी घेऊन 4 दिवस प्रवासाचा आनंद घेऊ शकता, कसं ते जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )