Travel : टिव्ही, मोबाईलपासून दूर नेत मुलांना द्या देशभक्तीचे धडे! 15 ऑगस्टला भारतातील 'या' ऐतिहासिक ठिकाणी भेट द्या, गर्दी टाळायची तर असं नियोजन करा
Travel : मुलांसोबत घरी न राहता त्यांना ऐतिहासिक स्थळी घेऊन गेल्याने त्यांना देशभक्ती आणि सामाजिक जबाबदाऱ्यांचे महत्त्व कळते, 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलांना देशभक्तीचे धडे देऊ शकता.
Independence Day Travel : तसं पाहायला गेलं तर मुलांना पुस्तकं आणि टीव्हीमध्ये खूप काही पाहायला आणि समजायला मिळतं. कारण समोर पाहून आणि त्याला स्पर्श करून ज्या गोष्टी समजतात, त्या पुस्तकांतून कदाचित समजणार नाहीत. म्हणूनच यंदाचा 15 ऑगस्ट ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. हा दिवस स्वातंत्र्यांचा दिवस आहे. या विशेष प्रसंगी, जर तुम्हाला तुमच्या मुलांना या दिवसाचे महत्त्व पटवून द्यायचे असेल, तर त्यांना ऐतिहासिक ठिकाणी घेऊन जाण्याचा प्लॅन तुम्ही नक्कीच केला पाहिजे. भारतातील या ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्याने मुलांना समाज आणि संस्कृतीची सखोल माहिती मिळते. संस्कृती आणि इतिहासाबद्दल मुलं अधिक उत्साही होतील, जाणून घ्या...
जर तुम्हाला गर्दी टाळायची असेल तर...
स्वातंत्र्यदिनी अशा ऐतिहासिक ठिकाणी मोठी गर्दी असते. त्यामुळे या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांसोबत तासन्तास लांब रांगेत उभे राहावे लागेल. मात्र जर तुम्हाला गर्दी टाळायची असेल, तर आगाऊ तिकीट बुक करा, यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. अनेक वेळा ऐतिहासिक ठिकाणी गर्दी वाढल्याने काही काळ प्रवेश बंद केला जातो. त्यामुळे तुमचे तिकीट मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे मुलांसोबत फिरायला जात असाल तर आगाऊ तिकीट बुक करा.
राणी की वाव, पाटण
गुजरात राज्यातील पाटण येथे असलेली प्रसिद्ध 'राणी की वाव' हे 15 ऑगस्टला भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. १५ ऑगस्टला होणारा विशेष कार्यक्रम आणि गर्दी लक्षात घेता तुम्ही आगाऊ तिकीट बुक करून तुमचा प्रवास सुकर करू शकता. हे ठिकाण केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठीच प्रसिद्ध नाही, तर त्याची भव्यता आणि वास्तू पाहण्यासाठी परदेशातूनही लोक येतात. येथे तुम्हाला देवी-देवतांच्या मूर्ती, धार्मिक चिन्हे आणि इतर कलात्मक आकृत्या पाहण्याची संधी मिळेल. स्वातंत्र्यदिनी भेट देण्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे.
कसे पोहोचायचे?
पाटण हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे, परंतु येथे जाण्यासाठी प्रथम तुम्हाला तुमच्या शहरातून अहमदाबाद किंवा कोणत्याही मोठ्या रेल्वे स्टेशनला जावे लागेल. यानंतर तुम्ही पाटणला ट्रेनने जाऊ शकाल. इतर शहरातून पाटणला थेट रेल्वे नाही.
बसने- पाटणला गुजरात राज्य परिवहन महामंडळ आणि खाजगी बस सेवा उपलब्ध आहेत.
वेळ- राणी की वाव दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत खुली असते.
लाल किल्ला, दिल्ली
मुलांसोबत लाल किल्ल्यावर जाणे हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. पण इथे जाण्यासाठी तुम्ही आगाऊ तिकीट बुक करा. हा ऐतिहासिक किल्ला प्रत्येक स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकवण्याचे ठिकाण आहे. दरवर्षी १५ ऑगस्टला येथे विशेष कार्यक्रम होतात. इथे खूप गर्दी असते त्यामुळे आगाऊ तिकीट काढायला विसरू नका. लाल किल्ल्यावर अनेक गॅलरी आणि संग्रहालये आहेत, जसे की सिटी पॅलेस संग्रहालय आणि मुघल सम्राटांच्या वस्तू. म्हणून, मुलांना येथे घेऊन जाणे चांगले होईल.
मेट्रो मार्गे- चांदनी चौक हे दिल्ली मेट्रोचे सर्वात जवळ आहे.
रेल्वेने- दिल्ली जंक्शन रेल्वे स्टेशन जवळचे स्टेशन आहे.
साबरमती आश्रम, अहमदाबाद
भारतातील हे ठिकाण, जिथे महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेक महत्त्वाच्या चळवळींचे नेतृत्व केले. सत्याग्रह आणि अहिंसा या महात्मा गांधींच्या तत्त्वांबद्दल मुलांना शिकण्याची संधी मिळेल. मुलांनी हे पुस्तकात वाचले तरी ते पाहिल्यानंतर त्यांना देशाप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजतील. जर तुम्ही 15 ऑगस्टला इथे जाण्याचा विचार करत असाल तर तुमची तिकिटे आगाऊ बुक करा. गुजरातमध्ये भेट देण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
हेही वाचा>>>
Travel : 15 ऑगस्टचा Long Weekend ठरेल अविस्मरणीय! पुण्याजवळ 'या' 3 ठिकाणांना भेट द्या, कमी खर्चात पिकनिक होईल झक्कास...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )