एक्स्प्लोर

Travel : इंग्लंड, थायलंड कशाला? महाराष्ट्रातील गोदावरी नदीवर वसलेलं 'हे' ठिकाण पाहाल, तर परदेश विसराल; निसर्गसौंदर्याचा खजिना

Travel : सुंदर प्राचीन वास्तू, पवित्र स्थळं आणि अनेक ऐतिहासिक ठिकाणांसाठी एक उत्तम पर्यटन स्थळ मानले जाते. तर गोदावरी नदीमुळे या ठिकाणाला दक्षिणेचे हरिद्वार असेही म्हटले जाते. 

Travel : लहान मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. पण ही सुट्टी कशी संपते कोणालाच कळत नाही. अनेक ठिकाणी फिरायचे प्लॅन बनतात.. भारतात किंवा भारताबाहेर.. पण एक गोष्ट सांगायची ती म्हणजे भारताबाहेर प्लॅन करायचा तर तुमच्याकडे मोठा बजेट हवा, कारण याचा खर्च खूप होतो, पण कमी बजेटमध्ये तुम्ही भारतात किंवा महाराष्ट्रात मनसोक्त फिरू शकता. खाणंपिणं, हॉटेल्स, निसर्गसौंदर्य असं सर्वकाही एन्जॉय करू शकता. आणि आज आम्ही तुम्हाला अशा एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. जिथे गेल्यानंतर तुम्ही परदेश विसराल.  गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे शहर म्हणजे एक उत्तम पर्यटन स्थळ मानले जाते. भारतातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि महाराष्ट्र राज्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळाबाबत जाणून घेऊया...

हिंदू भाविकांमध्ये अत्यंत लोकप्रिय, या ठिकाणाला म्हणतात दक्षिणेचे हरिद्वार!

आम्ही ज्या पर्यटन स्थळाबाबत सांगत आहोत ते ठिकाण म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील 'नाशिक' आहे. नाशिक हे भारतातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि महाराष्ट्र राज्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. सुंदर प्राचीन वास्तू, पवित्र स्थळे आणि अनेक ऐतिहासिक ठिकाणांसाठी एक उत्तम पर्यटन स्थळ मानले जाते. वर्षातून एकदा भरणाऱ्या प्रसिद्ध कुंभमेळ्यामुळे हे हिंदू भाविकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. नाशिक हे केवळ मंदिरे किंवा श्रद्धेचे केंद्र नाही तर गोदावरी नदीमुळे या ठिकाणाला दक्षिणेचे हरिद्वार असेही म्हटले जाते. दर 12 वर्षांनी या ठिकाणी कुंभमेळाही भरतो. नाशिक हवामानामुळेही प्रसिद्ध आहे. गोदावरी नदीच्या काठावर असलेले अनेक सुंदर घाट या ठिकाणचे सौंदर्य आणखी वाढवतात. या शहराचा सर्वात प्रमुख भाग म्हणजे पंचवटी. याशिवाय येथे अनेक मंदिरे आहेत. सणासुदीच्या काळात नाशिकमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते... 

Travel : इंग्लंड, थायलंड कशाला? महाराष्ट्रातील गोदावरी नदीवर वसलेलं 'हे' ठिकाण पाहाल, तर परदेश विसराल; निसर्गसौंदर्याचा खजिना

पांडव लेणी

नाशिकला खास पांडव लेणी पाहण्यासारखे ठिकाण आहे. 24 लेणी एकत्र करून हा समूह तयार करण्यात आला आहे. या लेण्यांमध्ये तुम्हाला बुद्धाच्या मूर्ती दिसतील. इथपर्यंत पोहोचताना तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल, पण एवढ्या मेहनतीनंतर इथपर्यंत पोहोचल्यावर थकवा पूर्णपणे नाहीसा होईल. ही लेणी महाराष्ट्रातील सर्वात जुन्या लेण्यांपैकी एक आहेत, येथील एकूण चोवीस लेण्या जैन राजांनी बांधल्या होत्या.

Travel : इंग्लंड, थायलंड कशाला? महाराष्ट्रातील गोदावरी नदीवर वसलेलं 'हे' ठिकाण पाहाल, तर परदेश विसराल; निसर्गसौंदर्याचा खजिना

दादासाहेब फाळके स्मारक

पांडवलेणी गुंफाजवळील 29 एकरात पसरलेल्या दादासाहेब फाळके स्मारकाची स्वतःची ओळख आहे. ज्यांना शांतता आवडते त्यांच्यासाठी गर्दीपासून दूर असलेले दादासाहेब फाळके स्मारक वरदानापेक्षा कमी नाही. भगवान बुद्धांच्या भव्य मूर्ती, सुंदर लॉन, संगीत कारंजे ध्यानासाठी योग्य आहेत. तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासह येथे येऊ शकता आणि सुंदर क्षण घालवू शकता. दादासाहेब फाळके मेमोरिअलमध्ये बरेच लोक येतात पण इथे एक आर्टिफॅक्ट म्युझियम देखील आहे हे अनेकांना माहीत नाही. त्यामुळे जेव्हाही तुम्ही इथे याल तेव्हा आर्टिफॅक्ट म्युझियमला ​​जायला विसरू नका.

Travel : इंग्लंड, थायलंड कशाला? महाराष्ट्रातील गोदावरी नदीवर वसलेलं 'हे' ठिकाण पाहाल, तर परदेश विसराल; निसर्गसौंदर्याचा खजिना

पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान, बोटॅनिकल गार्डन

दादा साहेब फाळके स्मारकापासून 500 मीटर अंतरावर आहे. पंडित जवाहरलाल नेहरू फॉरेस्ट गार्डनला बोटॅनिकल गार्डन असेही म्हणतात. या बागेत अनेक प्रकारची झाडे उगवली जातात जी अनेकदा नामशेष मानली जातात. येथील वनस्पतींपासून अनेक प्रकारची औषधे बनवली जातात. जर तुम्हाला निसर्गावर प्रेम असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बनवले आहे.

Travel : इंग्लंड, थायलंड कशाला? महाराष्ट्रातील गोदावरी नदीवर वसलेलं 'हे' ठिकाण पाहाल, तर परदेश विसराल; निसर्गसौंदर्याचा खजिना

अंजनेरी हनुमान मंदिर

नाशिकपासून 28 किमी अंतरावर असलेल्या अंजनेरी मंदिराला विशेष महत्त्व आहे. येथे हनुमानाचा जन्म झाला असे मानले जाते. अंजनेरी येथे हनुमानजींची माता अंजनीची अतिशय सुंदर मूर्ती आहे. येथे येऊन तुम्हाला अध्यात्माचा नवा अनुभव मिळेल. त्यामुळे येथे येणे चुकवू नका.

Travel : इंग्लंड, थायलंड कशाला? महाराष्ट्रातील गोदावरी नदीवर वसलेलं 'हे' ठिकाण पाहाल, तर परदेश विसराल; निसर्गसौंदर्याचा खजिना

त्र्यंबकेश्वर

जर तुम्ही महाराष्ट्राला भेट देणार असाल तर शिर्डी, भीमशंकर शिवमंदिर, एलोरा, एलिफंटा गुंफांशिवाय त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट द्यायला विसरू नका. भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये श्री त्र्यंबकेश्वरला दहावे स्थान दिले आहे. हे महाराष्ट्रातील नाशिक शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर गौतमी नदीच्या काठावर वसलेले आहे. मंदिराच्या आत असलेल्या एका छोट्या खड्ड्यात ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे प्रतीक मानली जाणारी तीन छोटी लिंगं आहेत. त्र्यंबकेश्वरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या ज्योतिर्लिंगामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघेही विराजमान आहेत. काळ्या दगडांनी बनवलेले हे मंदिर अतिशय सुंदर दिसते.

Travel : इंग्लंड, थायलंड कशाला? महाराष्ट्रातील गोदावरी नदीवर वसलेलं 'हे' ठिकाण पाहाल, तर परदेश विसराल; निसर्गसौंदर्याचा खजिना

राम कुंड

नाशिकमधील राम कुंड हे गोदावरी नदीवर वसलेले आहे, जे असंख्य यात्रेकरूंना आकर्षित करते. येथे भाविक स्नानासाठी येतात. भगवान रामाने येथे स्नान केल्याचे मानले जाते. 1696 मध्ये चितारो खातरकर यांनी राम कुंड बांधले. असे मानले जाते की या पवित्र तलावात मृत व्यक्तीची अस्थिकलश विसर्जित केल्याने त्याच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो. राम कुंड परिसरात इतरही अनेक मंदिरे आहेत जसे की सुंदर नारायण मंदिर, नारो शंकर मंदिर आणि कपालीश्वर मंदिर.

Travel : इंग्लंड, थायलंड कशाला? महाराष्ट्रातील गोदावरी नदीवर वसलेलं 'हे' ठिकाण पाहाल, तर परदेश विसराल; निसर्गसौंदर्याचा खजिना

सीता गुंफा

असे मानले जाते की भगवान रामाच्या 14 वर्षांच्या काळात नाशिकच्या पंचवटी परिसरात लक्ष्मण आणि माता सीता यांचे वास्तव्य होते. संपूर्ण पंचवटी परिसर सुमारे पाच किमीवर पसरलेला आहे. पाच वटवृक्ष एकमेकांना जोडलेले असल्यामुळे याला पंचवटी म्हणतात. हे पाच प्राचीन वटवृक्ष अजूनही सीता गुंफेभोवती आहेत आणि त्यांना अंकांनी चिन्हांकित केले आहे, जेणेकरून तुम्ही त्यांना सहज ओळखू शकता. खाली सीता गुंफा मंदिरासमोर वटवृक्षाचे चित्र आहे. हे मंदिर तुम्ही सहज ओळखू शकता. हे मंदिर फार मोठे नाही पण ते आध्यात्मिक उर्जेने भरलेले आहे कारण सीता मातेने वनवासात येथे तपश्चर्या तसेच पूजा केल्याचं सांगण्यात येतं. ही सीता लेणी नाशिकमधील पंचवटी परिसरात येते. गुहेत जाण्यासाठी 20 मिनिटे ते एक तास लागू शकतो.

Travel : इंग्लंड, थायलंड कशाला? महाराष्ट्रातील गोदावरी नदीवर वसलेलं 'हे' ठिकाण पाहाल, तर परदेश विसराल; निसर्गसौंदर्याचा खजिना

सुला व्हाइनयार्ड्स

जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल आणि सहलीदरम्यान काहीतरी वेगळे करायचे असेल, तर तुम्ही व्हाइनयार्ड टुरिझममध्ये काही रस दाखवला पाहिजे. होय, तुम्ही अनेक वेळा किल्ले, लेणी, संग्रहालये आणि निसर्ग पर्यटन केले असेलच. पण आता प्रवासाचे क्षेत्र विस्तारत आहे आणि काही अनोख्या कल्पनांसह नवीन ठिकाणे पर्यटनाशी जोडली जात आहेत. भारतातील द्राक्षबागांचे पर्यटनही याचाच एक भाग आहे. सुला विनयार्ड्सने ही पाश्चात्य प्रवासी संस्कृती स्वीकारली आहे. मुंबईपासून 180 किलोमीटर अंतरावर असलेले नाशिक शहर संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य आणि सुंदर द्राक्षबागांसाठी ओळखले जाते. येथून हाकेच्या अंतरावर दिंडोरी हे छोटेसे गाव आहे. हिरवेगार डोंगर आणि सुंदर तलाव यांनी वेढलेले हे गाव अतिशय सुंदर दिसते. देशातील सर्वात प्रसिद्ध सुला व्हाइनयार्ड या गावात आहे. या द्राक्ष बागेची पहिली कापणी 1999 मध्ये झाली. तेव्हापासून या द्राक्षबागेचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. येथे दररोज आठ ते नऊ हजार टन द्राक्षे क्रश करून वाईन तयार केली जाते. ही वाईन केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही विकली जाते.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा>>>

Travel : महाराष्ट्रात लपलेला 'हा' समुद्रकिनारा चक्क गोव्याची अनुभूती देतो! तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेले 'हे' ठिकाण तुम्हाला वेड लावेल.. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन
Sharad Pawar : मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; थेट शरद पवारांसमोर मागणी!
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर
Embed widget