Travel : पावसात लांब कशाला? मुंबईतच स्वर्गसुख अनुभवा! 'हा' धबधबा पाहाल, तर माथेरान, महाबळेश्वर विसराल..
Monsoon Travel : ज्यांना काम आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे मुंबई बाहेर जाता येत नाही अशा निसर्गप्रेमींनो.. मुंबईच्या आसपासचे सौंदर्य देखील स्वर्गापेक्षा कमी नाही. बरं का..!
Monsoon Travel : मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. अनेक निसर्गप्रेमी पावसाळ्यात विविध ठिकाणी जातात. कोणी माथेरान, कोणी लोणावळा, खंडाळा तर कोणी महाबळेश्वर.. मात्र ज्यांना काम आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे मुंबई बाहेर जाता येत नाही अशा निसर्गप्रेमींनो.. मुंबईच्या आसपासचे सौंदर्य देखील स्वर्गापेक्षा कमी नाही. बरं का..! मुंबईच्या आजूबाजूसही असे अनेक धबधबे आहेत, जे पुन्हा पावसात सज्ज झाले आहेत. तर आज आम्ही तुम्हाला मुंबई जवळील अशा एक सुंदर धबधब्याबद्दल सांगणार आहोत. जिथे गेल्यानंतर तुम्ही तुमचे सर्व टेन्शन विसराल.. जिथे तुम्ही तुमची सुट्टी आणखीन संस्मरणीय बनवू शकाल..
मुंबई जवळील सर्वोत्तम धबधब्यांपैकी एक..!
आम्ही ज्या धबधब्याबद्दल सांगत आहोत, तो धबधबा म्हणजे चिंचोटी धबधबा... हा धबधबा तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात आहे. हा धबधबा मुंबईजवळील सर्वोत्तम धबधब्यांपैकी एक आहे. इथे जाण्यासाठी तुम्हाला एक सुंदर ट्रेक करावा लागेल. चिंचोटी धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या घनदाट जंगलातून किमान 60 ते 70 मिनिटे ट्रेक करावा लागेल. यामुळे तुम्हाला जंगलातील ट्रेकिंगचा उत्तम अनुभव मिळेल आणि तुम्हाला जंगलाचे सौंदर्य पाहता येईल. चिंचोटी धबधब्यापर्यंत पोहोचण्याचा ट्रेक सोपा आहे, धबधब्यापर्यंत जाण्यासाठी एकच रस्ता आहे आणि इथे दिशानिर्देशांसाठी कोणतेही फलक नाहीत, त्यामुळे जाण्यापूर्वी गूगल मॅप डाउनलोड करावा लागेल आणि धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा वापर करावा लागेल.
पावसाळ्यामुळे हे ठिकाण नंदनवन बनते!
चिंचोटी धबधब्याचे दृश्य अतिशय नयनरम्य आहे आणि इथपर्यंत पोहोचण्याचा मार्गही अद्भुत आहे. विशेषतः पावसाळ्यात हे ठिकाण नंदनवन बनते, इथे तुम्ही गेल्यास तुम्हाला तुमच्या आजूबाजूला फक्त हिरवंगार जंगल दिसेल, आणि याच जंगलात चिंचोटी धबधबा खूप सुंदर दिसतो, या धबधब्याच्या पाण्यामुळे एक तलाव निर्माण झाला आहे, जिथे तुम्ही निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊ शकता.
घनदाट जंगलातून ट्रेकिंग एक रोमांचकारी अनुभव..!
चिंचोटी धबधब्यापर्यंतचा ट्रेक तुम्हाला घनदाट जंगलातून एक रोमांचकारी अनुभव देईल. चिंचोटी धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक पाऊल तुम्हाला आनंद देईल आणि हा सर्वात सोपा ट्रेक आहे. चिंचोटी धबधबा तुंगेश्वर वन्यजीव अभयारण्यात स्थित आहे, तुमच्या भेटीदरम्यान तुम्हाला जंगलात अनेक पक्ष्यांच्या प्रजातीही आढळतील. ट्रेकिंग दरम्यान तुम्हाला भरपूर पक्षीही दिसतील. चिंचोली धबधब्यावर तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ घेता येईल, यामुळे तुमच्या सुंदर आठवणी तयार होतील. म्हणूनच चिंचोटी धबधब्याला मान्सून पिकनिकसाठी एक आदर्श ठिकाण म्हणतात.
चिंचोटी धबधब्याला कसं जायचं?
चिंचोटी धबधबा पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील चिंचोटी गावात आहे.
येथे जाण्यासाठी वसई किंवा नायगाव रेल्वे स्टेशनसाठी लोकल ट्रेन पकडा, जे तुमच्यासाठी सर्वात जवळचे आणि सोयीचे आहे.
इथून तुम्ही ऑटो रिक्षा घेऊन चिंचोली गावात या.
तिथून चिंचोटी धबधब्यापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला जवळपास 60 मिनिटांचा ट्रेक करावा लागेल.
चिंचोटी गावापासून चिंचोटी धबधब्याचे अंतर सुमारे 3 किमी आहे,
त्यामुळे तुमचे खाद्यपदार्थ सोबत ठेवा.
चिंचोटी धबधबा पाहण्यासाठी उत्तम वेळ
चिंचोटी धबधब्याला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे पावसाळ्यात. जून ते सप्टेंबर हे महिने उत्तम आहेत. या महिन्यांत तुम्हाला सुंदर जंगल आणि धबधबे पाहायला मिळतील.
चिंचोटी फॉल्स जवळचे रेल्वे स्टेशन कोणते? किती अंतरावर आहेत?
जवळची रेल्वे स्थानके - नालासोपारा, नायगाव आणि वसई रेल्वे स्थानके आहेत.
नालासोपारा – 14.5 किमी
वसई रेल्वे स्टेशन 14.5 किमी
जुचंद्र रेल्वे स्टेशन – 14.8 किमी
कामन रोड रेल्वे स्टेशन – 17 किमी
नायगाव रेल्वे स्टेशन – 18.6 किमी
विरार रेल्वे स्टेशन - 20 किमी
चिंचोटी धबधब्याजवळ पाहण्यासारखी ठिकाणे
अशोक धबधबा
जीवदानी मंदिर, विरार
वसईचा किल्ला
वसई बीच
चिंचोटी धबधबा
चिंचोटी धबधबा येथे नेण्यासारख्या गोष्टी
स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात घेऊन जा.
कारण चिंचोली धबधब्याकडे जाताना तुम्हाला कोणतेही हॉटेल किंवा किराणा दुकान सापडणार नाही.
कॅमेरा, मोबाईल फोन, पॉवर बँक, टॉर्च
ग्लुकॉनडी, इलेक्ट्रॉन पावडर, बिस्किटे किंवा तयार पदार्थ.
टॉवेल, नॅपकिन्स आणि अतिरिक्त कपडे
छत्री, रेनकोट, घालण्यासाठी शूज
तुमच्या कचऱ्यासाठी पॉलिथिन पिशव्या
कोणत्याही इमर्जन्सीसाठी रोख रक्कम घेऊन जा
हेही वाचा>>>
Travel : मान्सून येताच पिकनिकचे लागले वेध! मुंबईच्या आजूबाजूचे हे 10 धबधबे पाहाल, तर टेन्शन विसराल!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )