Father's Day 2024 : फादर्स डे येतोय! वडिलांना सरप्राईझ द्यायचंय? भारतातील या 3 ठिकाणी घेऊन जा अन् आनंद अनुभवा
Travel : पालक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याप्रमाणे आईची जागा कोणी घेऊ शकत नाही, त्याचप्रमाणे वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
Travel : खरं तर पालक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. ज्याप्रमाणे आईची जागा कोणी घेऊ शकत नाही, त्याचप्रमाणे वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आपल्या कुटुंबाचं योग्य पालनपोषण व्हावं, यासाठी वडील हे दिवसरात्र मेहनत करत असतात, मुलांना चांगल शिक्षण, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वडिलांची सतत धडपड सुरू असते, ज्याप्रमाणे आईला कधीच कोणत्याच कामातून सुट्टी नसते, तसेच संपूर्ण घराची जबाबदारी वडिलांच्या खांद्यावर असते. तुम्ही कधी विचार केलाय का? आपल्या वडिलांनाही रोज तेच काम करण्याचा कंटाळा येत असेल, म्हणूनच जागतिक पितृ दिन म्हणजेच फादर्स डे जवळ येतोय. संपूर्ण जगात 16 जून 2024 रोजी फादर्स डे साजरा केला जाईल, त्यामुळे जर त्यांना सरप्राईझ द्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी अशा ठिकाणी पिकनिक प्लॅन केली पाहिजे, जिथे गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तुम्हाला पाहता येईल.
वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहायचाय?
मनात मुलांविषयी अपार प्रेम, पण वेळीच शिस्त देखील लावतो तो म्हणजे बाप..! वडील हे शक्यतो प्रेम दाखवत नाही, त्यांच्या रागावणारा चेहरा आपल्याला दिसतो, परंतु जो आपली सर्वात जास्त काळजी घेतो. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून आपले वडील आहेत, त्यामुळे ते आपल्यावर अपार प्रेम करतात, ते आपले वडील आहेत. वडिल मुलांसाठी रात्रंदिवस मेहनत करतात, आठवडाभर बाहेर काम केल्यानंतर सुट्टीच्या दिवशीही ते कधी घरच्या कामात व्यस्त होतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहायचा असेल तर त्यांना सर्व कामातून सुट्टी द्या आणि त्यांना सहलीला घेऊन जा. या सहलीवर गेल्यानंतर तुमचे वडील खूप आनंदी होतील.
आसाम - पर्वत आणि समुद्रकिनारे मनाला शांती देतील
आजपर्यंत तुमचे वडील तुम्हाला फेरफटका मारायला घेऊन जात असतील, पण आता तुम्ही त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाण्याची वेळ आली आहे. सध्या वातावरण उष्ण आहे, या उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी तुम्हाला काही खास ठिकाणी जायचं असेल, तर आसाम हे भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. येथे तुम्हाला अनेक पर्वत आणि समुद्रकिनारे पाहायला मिळतात. विलोभनीय दृश्यांमुळे तुमच्या वडिलांना निवांत क्षण अनुभवायला मिळेल. तुमच्या वडिलांना स्वच्छ वातावरण आणि हिरवीगार झाडे असलेली जागा आवडेल. भारतात भेट देण्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे.
काश्मीर - नयनरम्य दृश्य वडिलांना मंत्रमुग्ध करतील
या उन्हाळ्यात कमी गर्दीच्या ठिकाणी जायचे असेल तर वडिलांसोबत काश्मीरला जाण्याचा बेत करा. तुम्ही तुमच्या पालकांना एकटे सहलीला देखील पाठवू शकता. कारण मुलं झाल्यानंतर पालकांना स्वतःसाठी वेळ काढण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी जाण्याचा विचार करावा. येथील नद्या, नयनरम्य धबधबे, दऱ्या आणि हिरवीगार जंगले तुमच्या वडिलांना मंत्रमुग्ध करतील. येथील शांतता आणि सौंदर्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. काश्मीरमध्ये फिरण्यासाठी अनेक चांगली ठिकाणे आहेत.
गोवा - भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक
तुमचे बजेट चांगले असेल तर वडिलांना गोव्याच्या सहलीला घेऊन जा. परदेशात नेणे जमत नसेल तर गोव्यातच घेऊन जा. हे ठिकाण परदेशापेक्षा कमी नाही. याचे कारण असे की, भारतात सर्वाधिक परदेशी पर्यटक कोठे येतात, असे कोणी विचारले तर पहिले उत्तर गोवा आहे. बहुतेक पर्यटकांना गोवा खूप आवडतो. गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातील इतर देशांतूनही अनेक पर्यटक येथे मौजमजा करण्यासाठी आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येतात.
हेही वाचा>>>
Travel : मान्सून येताच पिकनिकचे लागले वेध! मुंबईच्या आजूबाजूचे हे 10 धबधबे पाहाल, तर टेन्शन विसराल!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )