Travel : 'जीवनाचं सार्थक होईल, जेव्हा चारधामची यात्रा कराल!' प्रवास नोंदणी 'या तारखेपासून सुरू होणार, जाणून घ्या सविस्तर
Travel : धार्मिक मान्यतेनुसार व्यक्तीच्या जीवनात चारधामची यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. चारधामची यात्रा करण्यासाठी आधी प्रवास नोंदणी करावी लागते.
Travel : असं म्हणतात ना.. मानवी जीवन हे निसर्गाची अनमोल देणगी आहे. आपल्या वैयक्तिक जीवनाचे ध्येय प्राप्त झाले की जीवन सार्थक झाले असं म्हणतात. हिंदू धर्मात चारधाम यात्रेला (Chardham Yatra) मोठे धार्मिक महत्त्व आहे. शास्त्रात म्हटलंय की, चारधामच्या दर्शनाने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि व्यक्ती जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. अशा माणसाला नश्वर जगात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, त्याला मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार व्यक्तीच्या जीवनात चारधामची यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. चारधामची यात्रा करण्यासाठी आधी प्रवास नोंदणी करावी लागते.
चारधाम यात्रा कधीपासून सुरू होतेय?
उत्तराखंडमध्ये 10 मेपासून चारधाम यात्रा सुरू होत आहे. धामांचे दरवाजे उघडण्याची तारीखही निश्चित झाली आहे. या चारधाम यात्रेसाठी नोंदणी अनिवार्य असेल. नोंदणीशिवाय चारधाम यात्रेला परवानगी दिली जाणार नाही. चारधाम यात्रेची ऑनलाइन नोंदणी 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेत नोंदणीची तयारी पूर्ण झाली आहे. केदारनाथ धामचे दरवाजे 10 मे रोजी भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत. याच दिवशी अक्षय्य तृतीया असल्याने यमुनोत्री आणि गंगोत्री धामचे दरवाजेही 10 मे रोजी दर्शनासाठी उघडण्यात येणार आहेत. जगप्रसिद्ध बद्रीनाथ धामचे दरवाजे 12 मे रोजी अभिजीत मुहूर्तावर उघडणार आहेत. उत्तराखंड पर्यटन विकास परिषद बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती गंगोत्री आणि यमुनोत्री धाम समितीकडून पत्र मिळाल्यानंतरच यात्रेसाठी नोंदणी सुरू करता येणार आहे.
नोंदणी कशाप्रकारे केली येईल?
उत्तराखंडमध्ये सर्व धामांचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे, तर यमुना जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्याची वेळ निश्चित केली जाणार आहे. विकास पर्यटन विकास परिषदेची तयारी सुरू करण्यात आली असून नोंदणीसाठी चार माध्यमे निश्चित करण्यात आली आहेत. प्रवासापूर्वी नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. नोंदणीमध्ये योग्य मोबाईल क्रमांक टाकणे आणि दर्शन टोकन घेणे आवश्यक आहे.
चारधामसाठी हेलिकॉप्टर बुकिंग
प्रवासादरम्यान डोंगराळ भागात अनेकदा हवामान खराब असते आणि बर्फवृष्टीमुळे थंडीही वाढते. हे लक्षात घेऊन प्रवाशांनी पुरेसे लोकरीचे कपडे, छत्री, रेनकोट सोबत ठेवावेत. चारधामच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कोणतेही औषध घेतल्यास ते सोबत ठेवावे. तुम्हाला अस्वस्थ वाटत असल्यास, प्रवास टाळा. चारधामच्या हेलिकॉप्टर प्रवासासाठी heliyatra.irctc.co.in वरून तिकीट बुक करता येईल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Travel : भर उन्हात टेन्शन विसराल! जेव्हा 'या' थंडगार धबधब्याचं स्वर्गसुख अनुभवाल.. एकदा भेट देऊन तर बघा...