(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Time Magazine's 50 Greatest Places In The World 2023: टाइम मॅगझिनच्या 50 सर्वोत्तम ठिकाणांची यादी जाहीर; भारतातील या दोन ठिकाणांच्या नावांचा यादीत समावेश
2023 मधील 50 सर्वोत्तम ठिकाणांची यादी टाइम मॅगझिननं (Time Magazine) जाहीर केली आहे.
Time Magazine's 50 Greatest Places In The World 2023: विविध ठिकांणा भेट देण्याची आवड अनेक पर्यटकांना असते. आता जगभरातील पर्यटकांसाठी टाइम मॅगझिननं (Time Magazine) 2023 मधील 50 सर्वोत्तम ठिकाणांची यादी म्हणजेच वल्ड्स ग्रेटेस प्लेसेस ऑफ 2023 (World’s Greatest Places of 2023) जाहीर केली आहे. या यादीमध्ये जगभरातील विविध ठिकाणांचा समावेश आहे. भारतातील दोन ठिकाणांच्या नावांचा सामावेश टाइम मॅगझिनच्या 50 सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीत करण्यात आला आहे. ओदिशाचा (Odisha) मयूरभंज जिल्हा (Mayurbhanj) आणि लडाख (Ladakh) केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश टाइम मॅगझिननं जाहीर केलेल्या 50 सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीत करण्यात आला आहे. ऐतिहासिक मंदिरे, तेथील खाद्य पदार्थ यासाठी ही ठिकाणे निवडण्यात आली आहेत.
'लडाखमध्ये (Ladakh) अल्पाइन लँडस्केप आणि तिबेटी बौद्ध संस्कृती आहे. यावर्षी, भारताने लडाखची राजधानी लेहपासून सुमारे 168 मैल आग्नेयेस, हॅनले गावात पहिले डार्क स्काय रिझर्व्ह देखील डिझाइन केलं आहे.' असा उल्लेख टाइम मॅगझिनमध्ये (Time Magazine) करण्यात आला आहे.
'अत्यंत दुर्मिळ काळा वाघ येथे बघायला मिळतो. या एप्रिलमध्ये मयूरभंजमध्ये त्यांचा डान्स फेस्टिव्हल देखील होणार आहे.' असं मयूरभंजबद्दल (Mayurbhanj) टाइम मॅगझिनमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन टाइम या कंपनीनं त्यांच्या वल्ड्स ग्रेटेस प्लेसेस ऑफ 2023 (World’s Greatest Places of 2023) ही यादी जाहीर केली. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, '2023 मधील जगातील सर्वोत्तम ठिकाणांची यादी सादर करत आहोत. ही आहेत, एक्सप्लोर करण्यासाठी 50 विलक्षण ठिकाणं.' तसेच या 50 ठिकाणांचे फोटो देखील टाइम कंपनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत.
पाहा यादी-
टँपा, फ्लोरिडा
विल्मेट व्हॅली, ओरेगॉन
रिओ ग्रांडे, पीआर
टक्सन, ऍरिझोना
योसेमाइट नॅशनल पार्क, कॅलिफोर्निया
बोझेमन, मोंटाना
वॉशिंग्टन डी. सी.
व्हँकुव्हर
चर्चिल, मॅनिटोबा
डिजॉन, फ्रान्स
पँटेलेरिया, इटली
नेपल्स, इटली
आरहस, डेन्मार्क
सेंट मॉरिट्झ, स्वित्झर्लंड
बार्सिलोना
टिमिसोरा, रोमानिया
सिल्ट, जर्मनी
बेराट, अल्बेनिया
बुडापेस्ट
व्हिएन्ना
ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया
कांगारू बेट, ऑस्ट्रेलिया
डोमिनिका
मेक्सिको शहर
ग्वाडालजारा, मेक्सिको
टोरेस डेल पेन नॅशनल पार्क, चिली
पंतनाल, ब्राझील
मेडेलिन, कोलंबिया
ओलांटायटांबो, पेरू
रोटान, होंडुरास
लडाख, भारत
मयूरभंज, भारत
क्योटो
नागोया, जपान
इसान, थायलंड
फुकेत, थायलंड
जेजू बेट, दक्षिण कोरिया
लुआंग प्राबांग, लाओस
गिझा आणि सक्कारा, इजिप्त
च्युलु हिल्स, केनिया
मुसान्झे, रवांडा
रबत, मोरोक्को
डकार, सेनेगल
लोआंगो नॅशनल पार्क, गॅबन
फ्रीटाउन द्वीपकल्प, सिएरा लिओन
लाल समुद्र, सौदी अरेबिया
अकाबा, जॉर्डन
जेरुसलेम
शारजाह, UAE
तुआमोटू द्वीपसमूह, फ्रेंच पॉलिनेशिया
महत्त्वाच्या इतर बातम्या :