Hair Care Tips : 'या' 5 फळांनी तुमचे केस घनदाट आणि मजबूत करा; काही दिवसांतच फरक जाणवेल
Hair Care Tips : जर तुमचे केस देखील पातळ आणि कमकुवत असतील तर यासाठी तुम्ही काही फ्रूट मास्क वापरून पाहू शकता.
Hair Care Tips : जर तुम्हालाही लांब, सुंदर आणि दाट केस हवे असतील तर, काही प्रकारची फळे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. या फळांमध्ये असलेले पोषक तत्व तुमचे केस मजबूत बनवतात. ही फळं कोणती आणि याचा केसांसाठी कसा उपयोग होतो हे जाणून घेऊयात.
'या' फळांमुळे केस मजबूत आणि दाट होतात
स्ट्रॉबेरी : आंबट गोड स्ट्रॉबेरीची चव सगळ्यांनाच खूप आवडते. यामध्ये अनेक पोषक तत्वे देखील असतात ज्याचा शरीराला फायदाच नाही तर केसांना मजबूत बनवण्यासाठी उपयोग होतो. यात मॅग्नेशियम मॅंगनीज, कॉपर मुबलक प्रमाणात असते. ते केसांच्या कूपांना उत्तेजित करतात, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. यासाठी स्ट्रॉबेरीचा हेअर मास्क बनवा. 4 ते 5 स्ट्रॉबेरी मिक्स करा. त्यात एक चमचा दही मिक्स करा आणि केसांना लावा. अर्ध्या तासानंतर केस लाईट शॅम्पूने धुवा. यामुळे तुमचे केस मजबूत होतील.
किवी : किवीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. याशिवाय त्यात बीटा-कॅरोटीन हे अँटीऑक्सिडंट असते. जे केस मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही किवी हेअर मास्क लावू शकता. यासाठी दोन चमचे किवी पल्प घ्या. त्यात एक चमचा खोबरेल तेल घालून चांगले मिक्स करा आणि हेअर मास्क टाळूपासून केसांच्या टोकापर्यंत लावा.
सफरचंद : सफरचंदात असलेले अँटीऑक्सिडंट केसांसाठी खूप फायदेशीर असतात. हे केस गळण्यापासून थांबवतात आणि केसांच्या कूपांना मजबूत करतात. सफरचंदाच्या मास्कसाठी तुम्ही सफरचंद सोलून त्याचे छोटे तुकडे करा. त्यात एक अंड घाला. त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल घालून चांगले मिक्स करा. हा हेअर मास्क तुमच्या टाळूवर आणि केसांना लावा. अर्ध्या तासानंतर केस शॅम्पूने धुवा.
पपई : पपईमध्ये देखील असे अनेक पोषक तत्व असतात जे केस मजबूत करण्यास मदत करतात. पपईचा हेअर मास्क बनवण्यासाठी दोन चमचे पपईचा पल्प काढा. त्यात एक चमचा मध मिक्स करा आणि घट्ट पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क तुमच्या टाळूवर आणि केसांवर लावा आणि अर्धा तास लावून ठेवा. आता केस शॅम्पूने धुवा. यामुळे तुमचे केस मऊ होतील.
केळी : केळ्यापासून बनवलेला हेअर मास्कही तुमचे केस मजबूत आणि घट्ट करू शकतात. केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स असतात. याशिवाय त्यात सिलिका देखील असते. जे केस मजबूत आणि घट्ट होण्यास मदत करतात. एक केळं छान मिक्स करा. त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि एक चमचा मध घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण केसांवर लावा. अर्ध्या तासानंतर केस शॅम्पूने धुवा.