Basic Life Skill : एक चांगली व्यक्ती बनवण्यासाठी तुमच्या मुलांना आत्ताच लावा 'या' सवयी; मुलं नेहमी प्रामाणिक राहतील
Basic Life Skill : पालक अनेकदा मुलांना काही मूलभूत जीवन कौशल्ये शिकवत नाहीत, याचा मुलांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो.
Basic Life Skill : प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलांचे चांगले संगोपन करायचे असते. चांगले शिक्षण, अन्न, कपडे, खेळ या सर्व गोष्टींची मुलांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये. जेणेकरून मुलं आयुष्यात काहीतरी चांगलं करू शकतील, पण कधी-कधी पालक ओव्हर पॉझिटिव्ह होतात आणि मुलांना काही मूलभूत जीवन कौशल्ये शिकवत नाहीत, याचा मुलांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. चला अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊयात ज्या मुलांना त्यांच्या भविष्यासाठी शिकवण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.
मुलांना त्यांची कामे स्वतः करायला शिकवा : आजकाल मुलांची अधिक काळजी घेण्यासाठी पालक एकतर त्यांची सर्व कामे स्वतः करतात किंवा नोकर ठेवतात. आपल्या पाल्याला काही अडचण येऊ नये असे प्रत्येक पालकाला वाटत असते, पण जर तुम्ही असेच करत राहिलात तर त्याला स्वतःचे काम स्वतः करण्याची सवयच लागणार नाही. अशा परिस्थितीत मुल 3 वर्षांपेक्षा जास्त असेल तेव्हा त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्या.
मुलाला वेगवेगळी कामे द्या : लहानपणापासूनच मुलाचा मानसिक विकास सुरू होतो. अशा स्थितीत त्यांना सर्जनशील बनवण्यासाठी विविध प्रकारची कामे द्या. ते जेवढा विचार करतील, तेवढेच प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतील आणि विकासासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना कोडे सोडवण्यासाठी किंवा मातीने काहीतरी डिझाइन करण्यासाठी सांगा.
आरोग्यदायी सवयी सांगा : तुमच्या पाल्याला निरोगी सवयींची जाणीव करून द्या. जसे की, नेहमी ब्रश करणे, रोज अंघोळ करण्याची सवय लावणे, जेवण्यापूर्वी हात धुणे इत्यादी. या गोष्टी त्यांनी लहानपणी शिकल्या तर ते नेहमीच पुढे जातील.
मुलांना स्वच्छतेबद्दल सांगा : लहानपणापासून मुलांना स्वच्छतेबद्दल सांगा. उदाहरणार्थ, शौचालयातून आल्यानंतर, प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर, आजारी व्यक्तीला भेटल्यानंतर हात नेहमी धुवावेत. याशिवाय मुलांची नखेही स्वच्छ करून घ्या.
मदत करायला शिकवा : लहानपणापासूनच तुमच्या मुलांना प्रत्येक मानवी गुण शिकवण्यास सुरुवात करा. त्यांना सांगा की मानवी जीवनाचा उद्देश जेणेकरून त्यांच्यात इतरांना मदत करण्याची भावना वाढेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :