Skin Care Tips : आरोग्य चांगले ठेवण्याबरोबरच 'या' भाज्या तुमच्या चेहऱ्याची चमकही वाढवतील; 'हा' फेसपॅक वापरा
Skin Care Tips : चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी केमिकल प्रोडक्ट्स वापरायची नसतील, तर घरी ठेवलेल्या भाज्या वापरणे हा सोपा उपाय आहे.
Skin Care Tips : भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. हे खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. पण, तुम्हाला माहित आहे का की, ग्लोईंग स्किनसाठी भाज्या देखील खूप फायदेशीर आहेत. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, पालक, बटाटा, टोमॅटो, काकडी यापासून फेस पॅक तयार करता येतो. यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि ग्लाईंग राहण्यास मदत होते.
बटाटा फेस पॅक
साहित्य : एक बटाटा, दोन चमचे दही
बटाट्याचा फेसपॅक बनवण्याची पद्धत
- बटाटे सोलून बारीक करा.
- त्यात दही मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. पाच मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.
- दोन आठवड्यांतून एकदा हा पॅक लावा. तुमच्या त्वचेवर ग्लो येईल.
पालक फेस पॅक
साहित्य : पालकाची काही पाने, अर्धी केळी
पालकचा फेसपॅक बनवण्याची पद्धत
पालक आणि केळी दोन्ही मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट बनवा.
- चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.
- हा फेसपॅक15 दिवसांतून एकदा लावा, त्वचा चमकदार होईल.
कोबी फेस पॅक
साहित्य : 2-3 पाने कोबीची पाने, एक चमचा तयार ग्रीन टी
कोबीचा फेसपॅक बनवण्याची पद्धत
- कोबी बारीक करून पेस्ट तयार करा.
- त्यात ग्रीन टी मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांनी धुवा.
- निरोगी, चमकदार त्वचेसाठी 15 दिवसांतून एकदा याचा वापर करा.
बीट फेस पॅक
साहित्य : एक तुकडा बीटरूट, दोन चमचे ऑलिव्ह ऑईल
बीटचा फेस पॅक बनवण्याची पद्धत
बीट बारीक करून पेस्ट बनवा.
- त्यात ऑलिव्ह ऑईल मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा.
- 10 दिवसांतून एकदा हा फेसपॅक लावा, त्वचा चमकदार होईल.
टोमॅटो फेस पॅक
साहित्य : एका टोमॅटोचा लगदा, चमचे गुलाबपाणी, चतुर्थांश चमचे लिंबाचा रस.
टोमॅटोचा फेसपॅक बनवण्याची पद्धत
- सर्व साहित्य नीट मिक्स करा आणि तुमच्या चेहऱ्यावर लावा. 5-7 मिनिटांनी चेहरा धुवा.
- हा फेस पॅक 15 दिवसांतून एकदा वापरा. तुमची त्वचा तजेलदार होईल.
काकडीचा फेस पॅक
साहित्य : अर्धी काकडी, चतुर्थांश कप तयार थंड ग्रीन टी
काकडीचा फेस पॅक बनवण्याची पद्धत
- काकडी सोलून बारीक करा.
- त्यात ग्रीन टी मिक्स करून चेहरा आणि मानेवर लावा आणि 10 मिनिटांनी चेहरा धुवा.
- आठवड्यातून एकदा हा फेसपॅक लावा. काही दिवसांतच फरक दिसून येईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :