Skin Care Tips : तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी एलोवेरा जेलचा वापर करा, 'ही' पद्धत वापरा
Skin Care Tips : बदलत्या ऋतूबरोबर तेलकट त्वचेमुळे लोकांच्या समस्याही वाढू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत कोरफडचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी कशी घेऊ शकता.
Skin Care Tips : बदलत्या जीवनशैलीबरोबरच हवामानातही हळूहळू बदल होत आहेत. अशा वेळी ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्या समस्याही वाढू लागल्या आहेत. बहुतेक स्त्रियांना ही समस्या असते की त्यांची त्वचा तेलकट वाटते आणि त्यांना वारंवार मुरूमांच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तेलकट त्वचेला नियंत्रणात ठेवण्याचा आणि त्याच्याशी संबंधित सर्व समस्या टाळण्याचा एकच उपाय आहे. ते म्हणजे एलोवेरा जेल. एलोवेरा जेल त्वचेवर नेमके कसे उपयोगी आहे हे जाणून घ्या.
या काही टीप्स फॉलो करा :
ग्लिसरीन विथ एलोवेरा जेल - जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही एलोवेरा जेलसह ग्लिसरीन मास्क बनवून तुमच्या त्वचेवर लावू शकता. हे तुमच्या त्वचेला मॉइश्चराईझ देखील करेल. हे करण्यासाठी दोन टेबलस्पून एलोवेरा जेलमध्ये थोडे ग्लिसरीन मिसळा. यासाठी प्रथम एका भांड्यात दोन चमचे कोरफडीचे जेल घ्या आणि त्यात ग्लिसरीन मिसळा. यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ करा आणि कापसाच्या मदतीने हा मास्क चेहऱ्यावर लावा. साधारण 15 ते 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.
कोरफडसोबत संत्र्याचा रस - तुम्ही तुमच्या त्वचेवर कोरफड सोबत संत्र्याचा रस देखील वापरू शकता. यामुळे तुमच्या त्वचेतील तेल तर निघेलच पण तुमच्या त्वचेची चमकही वाढेल. हे करण्यासाठी एक चमचा संत्र्याचा रस आणि दोन चमचे कोरफड जेल घ्या. सर्व प्रथम हे दोन्ही एका भांड्यात ठेवा. ते मिक्स केल्यानंतर, पेस्ट चेहऱ्यावर किमान 10 ते 15 मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.
कोरफड सोबत कडुलिंब - जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील मुरुम आणि डागांमुळे खूप त्रास होत असेल, तर तुम्ही एलोवेरा जेल बरोबर चेहऱ्यावर कडुलिंबाची पाने लावू शकता. हे लावण्यासाठी मूठभर कडुलिंबाची पाने आणि दोन चमचे कोरफडीचे जेल घ्या. प्रथम कडुलिंबाची पाने धुवून वाळवा. नंतर ते बारीक करून पावडर बनवा. एका भांड्यात एलोवेरा जेल आणि कडुलिंबाची पाने पावडर टाकून मिक्स करा. ते चेहऱ्यावर लावून एक महिना राहू द्या आणि शेवटी पाण्याने चेहरा धुवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Amla benefits : सुपरफूड अशा आवळ्याचे 'हे' गुणधर्म आणि वापरण्याची पद्धत तुम्हाला माहित आहे का?
- Benefits of Sesame Oil : अत्यंत गुणकारी तिळाचे तेल, सौंदर्य आणि आरोग्यासाठीही लाभदायक
- जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय असेल तर हे नक्की वाचा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha