(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Skin Care Tips : लग्नापूर्वी 'या' आरोग्यदायी रसाचा आहारात समावेश करा; तुमच्या चेहऱ्यावर झटपट ग्लो येईल
Skin Care Tips : जर तुम्हाला तुमची त्वचा आतून सुंदर आणि ग्लोईंग बनवायची असेल तर फंक्शनच्या काही दिवस आधी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करू शकता.
Skin Care Tips : एखाद्या सण-समारंभाच्या दिवशी आपला चेहरा ग्लो (Skin Care Tips) करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. खरंतर, आपल्या घरी सणसमारंभाला किंवा लग्नाला रोज मेकअप करावा लागतो. त्यामुळे चेहऱ्यावरचा ग्लो लवकर कमी होऊ शकतो. अशा वेळी मेकअप नीट सेट न झाल्यामुळे आपल्याला हवा तो लूकही मिळत नाही. मेकअपमुळे तुमची त्वचा बाहेरून सुंदर दिसू शकते. पण, जर तुम्हाला तुमची त्वचा आतून सुंदर आणि ग्लोईंग बनवायची असेल तर फंक्शनच्या काही दिवस आधी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करू शकता. आणि तुमची त्वचा तजेलदार होऊ शकते.
तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनश्चर्येत 'या' टिप्सचा समावेश करू शकता
बीट आणि आवळा ज्यूस
बीट आणि आवळा या दोन्ही ज्यूसमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. विशेषत: व्हिटॅमिन सी चं प्रमाण खूप जास्त असते. तुमच्या आहारात बीटचा समावेश केल्याने शरीरात रक्त प्रवाह वाढतो. ज्यामुळे तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या ग्लो करतो. याशिवाय आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे शरीरात कोलेजन निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे त्वचेची चमक वाढते. दररोज सकाळी बीट आणि आवळ्याचा ज्यूस पिऊन तुम्ही तुमचे शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स करू शकता.
ऊस आणि लिंबाचा रस
साधारणपणे लोकांना उन्हाळ्यात उसाचा रस प्यायला आवडतो. पण तुम्ही हिवाळ्यातही ऊसाचा रस पिऊ शकता. ऊसाचा रस प्यायल्याने त्वचेतील मृत पेशी निघून जातात आणि यामुळे तुमचा स्किन टोनही सुधारतो. यामध्ये लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरताही भरून काढता येते.
लिंबूसह ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. हे लिंबू मिसळून प्यायल्याने शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफाय होते आणि त्वचेशी संबंधित समस्या जसे की सूज आणि ऍलर्जीपासूनही आराम मिळतो. चेहऱ्यावरील लालसरपणा, खाज सुटणे आणि पुरळ कमी करण्यासाठी तुम्ही ग्रीन टी वापरू शकता.
तसेच, जर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी बाजारातील महागड्या प्रोडक्ट्सवर खर्च करणं गरजेचं नाही. तुम्ही काही घरगुती उपायांचा देखील यात समावेश करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :