Health Tips : फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणे शरीरावर दिसतात; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Health Tips : शरीरात चरबी जमा होणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे शरीराचा आकारच बिघडतो असे नाही तर अनेक आजारांचा धोकाही वाढतो.
Health Tips : सध्याच्या वाईट जीवनशैलीमुळे (Lifestyle) प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे आजकाल लोक हेल्दी खाण्याऐवजी जंक फूड जास्त खाऊ लागले आहेत. त्यामुळे जाणूनबुजून किंवा नकळत लोक अनेक आजारांना आमंत्रण देत आहेत. जंक फूड जास्त खाल्ल्याने यकृतावर अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते.
यकृत (Liver) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो केवळ अन्न पचविण्यास मदत करत नाही तर आपल्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढून टाकतो. यकृतावर चरबी जमा होऊ लागली तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे माणसाला अनेक आजार होतात. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी यकृत तंदुरुस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. फॅटी लिव्हरचे (Fatty Liver) दोन प्रकार असतात. नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग (Non-Alchoholic Fatty Liver) आणि अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग (Alchoholic Fatty Liver).
नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग (Non-Alchoholic Fatty Liver)
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा एक आजार आहे. हा आजार दारू प्यायल्याने होत नाही. याचं खरं कारण म्हणजे बिघडलेली जीवनशैली आणि मोठ्या प्रमाणात जंक फूडचं सेवन हे असू शकते.
अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग (Alchoholic Fatty Liver)
दारू प्यायल्याने यकृताला खूप नुकसान होते. दारू हे यकृतासाठी विषापेक्षा कमी नाही. दारूचे सेवन करणाऱ्या अशा लोकांना फॅटी लिव्हरचा आजार होऊ शकतो.
फॅटी लिव्हरमुळे शरीरात 'ही' लक्षणे दिसतात
1. फॅटी लिव्हर सिंड्रोम किंवा रोग झाल्यास यकृतावर चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे यकृतामध्ये हळूहळू सूज येऊ लागते. पोटाच्या ज्या भागात यकृत आहे त्या भागातही सूज दिसून येते.
2. फॅटी लिव्हर आजारामुळे शरीराला योग्य ऊर्जा मिळत नाही, त्यामुळे व्यक्तीला थकवा जाणवतो.
3. फॅटी लिव्हर आजारामुळे तुम्ही कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाही. याबरोबरच व्यक्तीला खूप अशक्तपणाही जाणवतो.
4. फॅटी लिव्हर असलेल्या काही लोकांमध्ये वजन झपाट्याने कमी होऊ लागते.
5. बद्धकोष्ठतेची समस्या अनेकदा फॅटी लिव्हरच्या आजाराला बळी पडलेल्या लोकांमध्ये दिसून येते.
6. फॅटी लिव्हरचा मेंदूवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा