Shravan Somvar Vrat 2022 : आज श्रावणातील चौथा सोमवार; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व
Shravan Somvar Vrat 2022 : श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी महादेवाची पूजा करायची धार्मिक परंपरा आहे. चौथ्या सोमवारची शिवामूठ मूग आहे.

Shravan Somvar Vrat 2022 : आनंदाचा, उल्हासाचा, भक्तीचा श्रावण महिना (Shravan 2022) बघता बघता संपत आला. श्रावण महिन्यात अनेक सण, उत्सव, समारंभ आणि व्रत वैकल्ये झाली. यातीलच महत्वाचे एक व्रत म्हणजे श्रावणी सोमवार व्रत. भगवान शंकराची पूजा करण्यासाठी श्रावणी सोमवार व्रताला श्रावणात खूप महत्त्व आहे. याच व्रताचा आजचा चौथा आणि शेवटचा सोमवार. या चौथ्या सोमवारची शिवामूठ जव आहे. या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी दिलेली माहिती जाणून घेऊयात.
श्रावणी सोमवार व्रत :
श्रावणी सोमवार या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस ह्यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असावा. ही मूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। ‘ हा मंत्र म्हणावा. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन ह्या व्रताची समाप्ती करावी.
अशी करावी पूजा :
सोमवार व्रत पद्धत 2 : आणखी एका वेगळ्या प्रकारे सोमवार व्रत केले जाते. हे व्रत श्रावणाप्रमाणेच चैत्र, वैशाख, कार्तिक आणि मार्गशीर्ष ह्या महिन्यांमध्येही केले जाते. मात्र श्रावणातील सोमवारी केल्यास ते विशेष मानले जाते. पूजेआधी व्रताचा संकल्प करावा. नंतर शिवशंकरांचे ध्यान करावे. तत्पश्र्चात’ओम नम: शिवाय’ ह्या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर ‘ओम नम: शिवाय:’ या मंत्रोच्चारासह पार्वतीमातेची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. ह्या दिवशी एकभुक्त राहावे. शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे. अशातऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे. श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा.
महत्वाच्या बातम्या :
- Important Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
- Shravan 2022 : श्रावण महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?























