बोचऱ्या थंडीला सुरुवात झाल्याने विठुरायाला उबदार पोशाख सुरु, अंगावर काश्मिरी शाल आणि कानाला कानपट्टी
Vitthal Rukmini Temple, Pandharpur : बोचऱ्या थंडीला सुरुवात झाल्याने विठुरायाला उबदार पोशाख सुरु परिधान करण्यात आलाय.
Vitthal Rukmini Temple, Pandharpur : सध्या राज्यभर थंडीचा कडाका वाढत जात अजून ऋतुमानानुसार विठुरायाला उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात झाली आहे . यामध्ये उब देण्यासाठी देवाला मऊ काश्मिरी शाल आणि डोक्याला रेशमी मुंडासे बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रात्री शेजारातीनंतर विठुराया जेंव्हा निद्रेसाठी जात असतो तेंव्हा त्याच्या अंगावरील पोशाख काढण्यात येतो.
देवाचे अंग पुसून घेतल्यावर देवाच्या डोक्यावरील मुकुट काढून तेथे 150 हात लांबीचे हे खास उबदार मुंडासे देवाच्या मस्तकावर वैशिष्ठ्यपूर्ण पद्धतीने बांधण्यात येते. यानंतर देवाच्या कानाला थंडी वाजू नये म्हणून मस्तकी असलेल्या मुकुटावर सुती उपरण्याची कानपट्टी देवाच्या कानाला बांधण्यात येते. यावर पारंपरिक असलेली देवाची उबदार काश्मिरी शाल अंगावर घालण्यात येते . या कपड्यांमुळे देवाला नखशिखांत उबदारपणा जाणवेल याची खबरदारी घेतली जाते . यानंतर देवाला तुळशीहार व फुलांचे हार घातले जातात . घालून आरती करीत देवाला निद्रेसाठी सज्ज केले जाते . रुक्मिणी मातेलाही अशाच पद्धतीची उबदार काश्मिरी शाल घालण्यात येते.
पहाटे काकड्याच्यावेळी देवाच्या अंगावरील हि काश्मिरी रजई फक्त काढून बाकीचे उबदार कपडे तसेच ठेवण्यात येतात . रुक्मिणी मातेलाही अशाच पद्धतीने उबदार रजई गुंडाळून ठेवण्यात येते . साधारणपणे प्रक्षाळपुजेच्या दुसऱ्या दिवसापासून देवाची हुडहुडी घालविण्यासाठी हा खास पद्धतीचा पोशाख देवाला घालण्याची हि परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली असून साधारण होळीपर्यंत हे उबदार कपडे देवाला घालण्यात येतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या