Vinayak Chaturthi 2024 : नवीन वर्षातील पहिली विनायक चतुर्थी कधी? पूजा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या
Vinayak Chaturthi 2024 Date : हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष स्थान आहे. चतुर्थी तिथीला गणेशाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं, या दिवशी गणेशाची पूजा केल्याने ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
Vinayak Chaturthi 2024 : हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनिय देवाचा दर्जा आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होते. गणपतीला संकंष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे. चतुर्थीला श्रीगणेशाचे विधीवत पूजन करता व्रत करण्याची परंपरा आहे.
पंचांगानुसार, चतुर्थी तिथी महिन्यातून दोनदा येते. एक शुक्ल पक्षात, तर दूसरी कृष्ण पक्षात. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) आहे. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केल्याने शुभ फळ मिळते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. त्यानुसार विनायक चतुर्थीची तिथी, मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घेऊया.
विनायक चतुर्थी तिथी आणि मुहूर्त
पंचांगानुसार, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 14 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7 वाजून 59 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 15 जानेवारी 2024 रोजी पहाटे 4 वाजून 59 मिनिटांनी समाप्त होईल. पंचांगानुसार, 14 जानेवारी 2024 रोजी पौष महिन्यातील विनायक चतुर्थी साजरी केली जाईल.
विनायक चतुर्थी पूजा पद्धत
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करा. यानंतर चौरंगावर गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा, यानंतर शुभ मुहूर्तावर विधीनुसार गणेशाची पूजा करा. श्रीगणेशाची मूर्ती समोर ठेवून जलाभिषेक करावा. पूजेदरम्यान गणपतीला दुर्वा, फुलं, कुंकू अर्पण करा. देवासमोर दिवा आणि अगरबत्ती लावा. गणपतीला मोदक आणि दुर्वा गवत खूप आवडतात असं म्हणतात, त्यामुळे चतुर्थीला मोदक बनवणं शुभ मानलं जातं. गणपतीला मोदकांचा प्रसाद दाखवून शेवटी श्रीगणेशाची आरती करून घरातील सर्व सदस्यांना प्रसाद वाटप करा.
विनायक चतुर्थीला करा हे उपाय
- कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी उंदरावर बसलेल्या गणेशाची मूर्ती किंवा चित्राची पूजा करा, याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
- गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला मोदक अर्पण करा. यामुळे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल.
- गणपतीला मोदकाशिवाय दुर्वाही आवडतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजेच्या वेळी 'इदं दुर्वदलं ॐ गं गणपतये नमः' हा मंत्र म्हणत गणपतीला 5 किंवा 21 गाठी दुर्वा अर्पण करा.
- विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजेच्या वेळी गणपतीला लाल सिंदूर तिलक लावा आणि स्वतःलाही तिलक लावा.
- या दिवशी पूजा करताना श्रीगणेशाला शमीची पानं अर्पण करा, यामुळे श्रीगणेश प्रसन्न होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.
हेही वाचा:
Mahashivratri 2024 Date : नवीन वर्षात महाशिवरात्री कधी? तारीख, पूजा मुहूर्त आणि विधी जाणून घ्या