Shani Dev : महिलांनी शनिदेवाची पूजा करताना चुकूनही 'अशी' चूक करू नये, जीवनात संकट येईल, जाणून घ्या नियम
Shani Dev : शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. महिलांनी शनिदेवाची पूजा करताना काही नियमांचे पालन केलेच पाहिजे, अन्यथा शनीची नाराजी खूप जड जाऊ शकते.
Shani Dev : धार्मिक मान्यतेनुसार, शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. शनिवारी त्याची पूजा केल्याने व्यक्तीला शनीची महादशा, ढैय्या आणि साडेसातीपासून मुक्ती मिळते. ज्याच्यावर शनीची कृपा असते, त्याचे जीवन संकटातून मुक्त होते. शास्त्रानुसार, शनि हा कठोर ग्रह देखील मानला जातो, त्यामुळे त्याच्या उपासनेमध्ये विशेष काळजी घेतली जाते.
महिलांनी शनिदेवाची पूजा करताना काही नियमांचे पालन केले पाहिजे
विशेषत: महिलांनी शनिदेवाची पूजा करताना काही नियमांचे पालन केले पाहिजे, अन्यथा शनिदेवाच्या नाराजीचा सामना करावा लागेल. जीवन संकटांनी घेरले जाऊ शकते. जाणून घ्या महिलांसाठी शनिदेवाच्या पूजेचे नियम.
महिलांनी शनिदेवाची पूजा कशी करावी?
चांगले-वाईट कर्म करणाऱ्यांवर शनिदेव नेहमी लक्ष ठेवतात.
स्त्रिया त्यांच्या कुंडलीत शनिदोष असताना किंवा शनीच्या महादशापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिदेवाची पूजा करू शकतात.
शनिदेवाची पूजा करताना महिलांनी चुकूनही शनिदेवाच्या मूर्तीला स्पर्श करू नये. असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.
शास्त्रानुसार शनिदेवाच्या मूर्तीला स्पर्श केल्याने महिलांवर शनिदेवाच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो.
शास्त्रानुसार महिलांना शनिदेवाच्या मूर्तीला तेल लावणे वर्ज्य आहे.
शनीला प्रसन्न करण्यासाठी महिला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावू शकतात किंवा शनि मंदिरात शनीसाठी दिवा लावू शकतात.
शनिदेवाची आशीर्वाद मिळविण्यासाठी महिलांनी शनि मंदिरात शनि चालिसाचे पठण करावे.
महिलांसाठी ही सर्वात सोपी आणि फलदायी पूजा मानली जाते.
शनिवारी महिलांनी मोहरीचे तेल, काळे कपडे, काळे बूट, लोखंडी भांडी, काळे उडीद, काळे तीळ यांसारख्या वस्तूंचे दान करा. यामुळे शनिदोष शांत होतो.
यामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न असतात.
गर्भगृहात महिलांना प्रवेश दिला जात नव्हता
यापूर्वी शनि शिंगणापूर मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. परंतु 26 जानेवारी 2016 रोजी तृप्ती देसाई (सामाजिक कार्यकर्त्या) यांच्या नेतृत्वाखाली 500 हून अधिक महिलांच्या गटाने मंदिराकडे मोर्चा वळवला. त्यांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करायचा होता, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. परंतु 30 मार्च 2016 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले.
दशरथकृत शनि स्तोत्र
दशरथ उवाच:
प्रसन्नो यदि मे सौरे ! एकश्चास्तु वरः परः ॥
रोहिणीं भेदयित्वा तु न गन्तव्यं कदाचन् .
सरितः सागरा यावद्यावच्चन्द्रार्कमेदिनी ॥
याचितं तु महासौरे ! नऽन्यमिच्छाम्यहं .
एवमस्तुशनिप्रोक्तं वरलब्ध्वा तु शाश्वतम् ॥
प्राप्यैवं तु वरं राजा कृतकृत्योऽभवत्तदा .
पुनरेवाऽब्रवीत्तुष्टो वरं वरम् सुव्रत ॥
दशरथकृत शनि स्तोत्र:
नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च .
नम: कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नम: ॥1॥
नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च .
नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते ॥2॥
नम: पुष्कलगात्राय स्थूलरोम्णेऽथ वै नम: .
नमो दीर्घाय शुष्काय कालदंष्ट्र नमोऽस्तु ते ॥3॥
नमस्ते कोटराक्षाय दुर्नरीक्ष्याय वै नम: .
नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने ॥4॥
नमस्ते सर्वभक्षाय बलीमुख नमोऽस्तु ते .
सूर्यपुत्र नमस्तेऽस्तु भास्करेऽभयदाय च ॥5॥
अधोदृष्टे: नमस्तेऽस्तु संवर्तक नमोऽस्तु ते .
नमो मन्दगते तुभ्यं निस्त्रिंशाय नमोऽस्तुते ॥6॥
तपसा दग्ध-देहाय नित्यं योगरताय च .
नमो नित्यं क्षुधार्ताय अतृप्ताय च वै नम: ॥7॥
ज्ञानचक्षुर्नमस्तेऽस्तु कश्यपात्मज-सूनवे .
तुष्टो ददासि वै राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात् ॥8॥
देवासुरमनुष्याश्च सिद्ध-विद्याधरोरगा: .
त्वया विलोकिता: सर्वे नाशं यान्ति समूलत: ॥9॥
प्रसाद कुरु मे सौरे ! वारदो भव भास्करे .
एवं स्तुतस्तदा सौरिर्ग्रहराजो महाबल: ॥10॥
दशरथ उवाच:
प्रसन्नो यदि मे सौरे ! वरं देहि ममेप्सितम् .
अद्य प्रभृति-पिंगाक्ष ! पीडा देया न कस्यचित् ॥
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Shani Amavasya 2023 : एक असं गाव...जिथे घराच्या दरवाजांना कधीच कुलूप नसते!