एक्स्प्लोर

Pitru Paksha 2023 : पितृऋण आणि पितृदोष यात मोठा फरक, तो दूर करण्यासाठी पितृ पक्षात करा 'हे' उपाय 

Pitru Paksha 2023 : पितृऋण आणि पितृदोष यामुळे कुटुंबात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातून सुटका करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. पितृपक्षात हे उपाय करा.

Pitru Paksha 2023 : हिंदू धर्मात (Hindu Religion) पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृ पक्ष म्हणजे पितरांची प्रार्थना, पिंडदान आणि श्राद्ध करण्याची वेळ. यामुळे पितरांना समाधान मिळते आणि ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना समृद्धीचा आशीर्वाद देतात.

 

यंदा पितृ पक्ष कधीपासून सुरू होणार?

पंचागानुसार, पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावस्या दिवसापर्यंत सुरू होतो. यावर्षी पितृ पक्ष 29 सप्टेंबर 2023 रोजी सुरू होईल आणि 14 ऑक्टोबर 2023 रोजी संपेल. पितृ पक्षाच्या काळात काही उपाय करून पितृदोष आणि पितृऋणापासून मुक्ती मिळू शकते. यासाठी काही उपाय सुचविण्यात आले आहेत, जे अत्यंत प्रभावी मानले जातात.

 


पितृऋण आणि पितृदोष मध्ये काय फरक आहे?
अनेक लोक पितृ दोष आणि पितृ ऋण एकच मानतात. धार्मिक मान्यतेनुसार, पितृ दोष आणि पितृ ऋण सारखे नाहीत. पूर्वजांनी आयुष्यात काही चूक केली असेल किंवा वाईट कृत्ये केली असतील, ज्यामुळे पितर मृत्यूनंतरही दुःखी राहतात तेव्हा पितृऋण होते. पितरांचे ऋण असले, आणि हे ऋण फेडले नाही तर पितरांच्या पापाचे फळ संपूर्ण वंशाला भोगावे लागू शकते. त्यामुळे पितृपक्षाच्या काळात पितृपक्षाच्या ऋणातून मुक्ती मिळवण्याचे उपाय करावे लागतील.

 


पितृ दोष म्हणजे...
पौराणिक मान्यतेनुसार, पितृदोषाच्या उपायांनी तुम्ही संतप्त पितरांना शांत करू शकता. कारण पितरांना राग आला तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. पितरांचा अनादर किंवा दुःखी झालेले दिवंगत आत्मे कुटुंबाना शाप देतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य, मंगळ आणि शनि जर व्यक्तीच्या पत्रिकेच्या लग्न भावात आणि पाचव्या भावात असतील तर पितृदोष तयार होतो.


पितृऋण आणि पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी उपाय


तर्पण करा
आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृ पक्षात तर्पण करावे. तर्पण केवळ पूर्वजांच्या नावानेच नाही तर ज्या व्यक्तीचे तुमचे पूर्वज ऋणी आहेत आणि त्यांचा मृत्यू झाला असेल, तर त्यांच्या नावानेही तर्पण करावे. यामुळे पितृदोष आणि पितृऋणातून आराम मिळतो.


कापूर जाळणे
पितृ पक्षाच्या काळात दररोज कापूर होम करावा आणि देवाकडे पितृऋणाची क्षमा मागावी.


दान करा
दान पापकर्म नष्ट करते आणि पुण्य कर्म वाढवते. पितृ पक्षाच्या काळात आपल्या क्षमतेनुसार गरिबांना दान करावे. पितृ ऋण आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृ पक्षाच्या काळात कुटुंबातील सर्व सदस्यांकडून नाणी गोळा करून मंदिरात दान करा.


हनुमान चालीसा
पितृपक्षात त्रयोदशी, चतुर्दशी अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला शेणाच्या पोळीवर गूळ आणि तूप टाकून ते जाळावे, तसेच हनुमान चालीसाही पाठ करा. यामुळे पितृ ऋण आणि पितृ दोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या 

Pitru Paksha 2023: पितृ पक्षात मुलगी पिंडदानही करू शकते का? पुराणानुसार काय म्हटलंय?

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026: कन्यापूजन कोणत्या वयोगटातील मुलींचे योग्य मानतात? वयानुसार देवीची कोणते स्वरूप? अष्टमी की नवमीला पूजन? शास्त्र, धार्मिक मान्यता...
कन्यापूजन कोणत्या वयोगटातील मुलींचे योग्य मानतात? वयानुसार देवीची कोणते स्वरूप? अष्टमी की नवमीला पूजन? शास्त्र, धार्मिक मान्यता...
Shardiya Navratri 2026: नवरात्रीत अनेकजण देवीचे 'कुंकुमार्चन' का करतात? याचा अर्थ काय? कुंकुमार्चन का, कधी अन् कसे करतात? धार्मिक महत्त्व...
नवरात्रीत अनेकजण देवीचे 'कुंकुमार्चन' का करतात? याचा अर्थ काय? कुंकुमार्चन का, कधी अन् कसे करतात? धार्मिक महत्त्व...
Shardiya Navratri 2026: आज नवरात्रीची सहावी माळ! देवी कात्यायनीच्या पूजेला मोठे महत्त्व, आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व...
आज नवरात्रीची सहावी माळ! देवी कात्यायनीच्या पूजेला मोठे महत्त्व, आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व...
Shardiya Navratri 2026: पंचमी, अष्टमी कि नवमी..नवरात्रीत देवी, कुलदेवीची ओटी कधी भरावी? घरी कि मंदिरात भरावी? 'या' एका गोष्टीशिवाय ओटी अपूर्ण! धार्मिक मान्यता...
पंचमी, अष्टमी कि नवमी..नवरात्रीत देवी, कुलदेवीची ओटी कधी भरावी? घरी कि मंदिरात भरावी? 'या' एका गोष्टीशिवाय ओटी अपूर्ण! धार्मिक मान्यता...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Embed widget