Mahashivratri 2024 : यंदाची महाशिवरात्री खास! भगवान शिवाने स्वतः सांगितलेला व्रताचा महिमा माहित आहे? जाणून घ्या त्याचे महत्त्व
Mahashivratri 2024 : शिवपुराणानुसार महाशिवरात्री व्रताचा महिमा भगवान शिवाने स्वतः ब्रह्मा, विष्णू आणि माता पार्वतीला सांगितला आहे. या व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Mahashivratri 2024 : हिंदू पंचांगानुसार, 8 मार्चला महाशिवरात्री आहे. या दिवशी देवाधिदेव महादेवांची (Lord Shiv) विधीपूर्वक पूजा केली जाते. तुम्हाला माहित आहे का? शिवपुराणानुसार (Shiv Puran) महाशिवरात्री व्रताचा महिमा भगवान शिवाने स्वतः ब्रह्मा, विष्णू आणि माता पार्वतीला सांगितला आहे. या व्रताचे महत्त्व जाणून घ्या
शिवपुराणानुसार महाशिवरात्री व्रताचा महिमा भगवान शिवाने सांगितला...
शिवपुराणानुसार, भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि माता पार्वतीने भगवान शिवांना विचारले की, असे कोणते व्रत आहे? ज्या व्रताने तुम्ही संतुष्ट होऊन तुम्ही सर्वोत्तम सुख प्रदान करता. ज्या व्रताचे पालन केल्याने भक्तांना मोक्ष मिळू शकतो, आम्हाला जाणून घ्यायचंय. यावर भगवान शिव म्हणाले की, 'त्यांना समर्पित अनेक उपवास आहेत, जे आनंद आणि मोक्ष देतात. याला दशशैवव्रत म्हणतात. द्विज लोकांनी नेहमी या व्रतांचे पालन करावे, परंतु ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी नियमानुसार चार व्रतांचे पालन करावे. हे चार व्रत आहेत: भगवान शिवाची पूजा, रुद्र मंत्रांचा जप, शिवमंदिरात उपवास आणि काशीत शरीराचा त्याग. मोक्षप्राप्तीचे हे चार शाश्वत मार्ग आहेत. या चार पैकी शिवरात्रीचे व्रत अनन्यसाधारण आहे, त्यामुळे हे व्रत केलेच पाहिजे.
चार प्रहारात पूजा करावी
शिवपुराणानुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिवरात्री म्हणतात. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात. चतुर्दशी तिथी ज्या दिवशी मध्यरात्री येते, त्या दिवशी शिवरात्री येते. व्रत आणि पूजा एकाच दिवशी करावी. शिवरात्रीच्या दिवशी सकाळी दैनंदिन कामातून संन्यास घेतल्यानंतर माणसाने कपाळावर भस्माचे त्रिपुंड लावावे. गळ्यात रुद्राक्षाची जपमाळ धारण करावी. शिवमंदिरात जाऊन विधीप्रमाणे शिवलिंगाची पूजा करावी. व्रताचे नियम पाळून चार प्रहारात पूजा करावी. रात्रीचे जागरण करावे. दुसऱ्या दिवशी पुन्हा शिवाची पूजा करावी. त्यानंतर ब्राह्मणांना भोजन दिल्यावर स्वतः भोजन करावे.
महाशिवरात्री 2024 कधी आहे?
हिंदू दिनदर्शिकेनुसार, उदय तिथीनुसार महाशिवरात्री 8 मार्च 2024 ला साजरी करण्यात येणार आहे. फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येतो. यंदा ही तिथी ही 8 मार्चला रात्री 09.57 वाजता सुरु होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी 9 मार्चला संध्याकाळी 06.17 पर्यंत असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :