Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांची पालखी अहमदनगरहून पंढरपूरकडे मार्गस्थ, आज मुक्काम जामखेड तालुक्यात
Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा चौदावा दिवस आहे.
![Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांची पालखी अहमदनगरहून पंढरपूरकडे मार्गस्थ, आज मुक्काम जामखेड तालुक्यात maharashtra news nashik news ashadhi wari sant nivruti nath maharaj in jamkhed taluka while muktabai palkhi is on its beed city Maharashtra News Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांची पालखी अहमदनगरहून पंढरपूरकडे मार्गस्थ, आज मुक्काम जामखेड तालुक्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/16/a605941694149035dfd8a4819d85b7d21686894443113738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sant Nivruttinath Palkhi : 'विठ्ठलनामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली... ', अशा असंख्य अभंगांनी पंढरीची वारी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे. अशा भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Palkhi) नगर जिल्ह्यात असून जामखेड तालुक्यात दाखल झाली होणार आहे. त्यानंतर अहमदनगर शहरात संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळ्यानंतर आज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. काल पाडळसिंगी येथील मुक्कामानंतर मुक्ताबाईंची पालखीचं आज सकाळी प्रस्थान होत बीड शहराकडे मार्गक्रमण करण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या तेरा दिवसांपासून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी दिंड्याचे प्रस्थान झाले असून लाखो भाविक पायी वारी करीत आहेत. भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, अभंगांच्या गोडीने अन् विठ्ठलाच्या ओढीने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहेत. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा चौदावा दिवस आहे. ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते आहे, त्या ठिकाणी स्वागत करून दुसऱ्या दिवशी गावासह इतर परिसरातील वारकरी दिंडीत सामील होत आहेत. संत निवृत्तीनाथांची पालखी नगर जिल्ह्यात असून काल अहमदनगर शहरात संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा साजरा करण्यात आला. यानंतर नाथांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.
राज्यभरातून निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी आहेत. लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंडी पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाच्या सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गावरील भाविक आनंदून जात आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. यात संत निवृत्तीनाथांच्या दिंडीसह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी या गावात मुक्कामी होती. आज पालखीचा चौदावा दिवस असून मुक्कामाच्या ठिकाणाहून पालखीने प्रस्थान करत पुढे मार्गस्थ झाली आहे. तर दुपारी नामलगाव फाटा येथे दुपारचा विसावा घेणार आहे. त्यानंतर संत मुक्ताबाईंची दिंडी याच मार्गाने पुढे बीड शहराकडे मार्गस्थ होणार असून याच ठिकाणी हनुमान मंदिरात विसावा घेणार आहे.
आज पालख्यांचा मुक्काम कुठे?
संत निवृत्तीनाथांची पालखी आज अहमदनगर शहरातुन पुढे सरकली आहे. पुढे मार्गक्रमण करत जामखेड तालुक्यात प्रवेश करून तुकडओढा मार्गे साकत गावी मुक्कामाला जाणार आहे. संत मुक्ताबाईंची पालखी आज पाडळसिंगी येथून मार्गस्थ होऊन पायी मार्गक्रमण करणार आहे. या दरम्यान दुपारी नामलगाव फाटा जाहेर पाटील, माध्यमिक विद्यालयाकडून येथील शिक्षक कर्मचारी वृंदाकडून दिंडीला दुपारचे जेवण दिले जाणार आहे. त्यांनतर दिंडीचे मुक्कामाचे ठिकाण बीड शहरातील माळीवेस शहरवासी मंडळ हनुमान मंदिरात असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)