एक्स्प्लोर

Dasara 2023 : काय सांगता! महाराष्ट्रातील 'या' गावात होते चक्क रावणाची पूजा, 250 वर्षांपासूनची परंपरा काय आहे?

Dasara 2023 : महाराष्ट्रातील या गावात रावणाची पूजा का केली जाते? दसऱ्याला होणारं रावण दहन थांबावं, असं आवाहनही इथले गावकरी लोकांना करतात.

Dasara 2023 : रावण (Ravana) म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो रामायणातील 'व्हिलन', खलनायक... अशीच या पात्राची आपल्या मनात प्रतिमा असते. वाईट शक्तींचं प्रतिक असलेल्या याच रावणाचं दसऱ्याला दहन केलं जातं. मात्र, अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात चक्क याच रावणाची पुजा केली जाते. या गावात रावणाची पूजा का केली जाते? रावणपूजेची अडीचशे वर्षांची या गावाची परंपरा नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या
 

सांगोळ्यात आहे रावणाची पुरातन मुर्ती 

रावणाची मनोभावे पूजा आणि आरती होत असल्याचं पाहून-ऐकून आपल्याला निश्चितच आश्चर्याचा धक्का बसेल. अन् तेही कोणत्या दाक्षिणात्य राज्यात नव्हे तर चक्क महाराष्ट्रात होतं. अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावाने गेल्या अडीच शतकांपासून रावणपुजेची अनोखी परंपरा जोपासली आहे. फक्त परंपराच नाही तर या गावात 350 वर्षांपुर्वीची रावणाची सुंदर आणि सुरेख मुर्तीसुद्धा आहे. पातूर तालूक्यात असलेलं सांगोळा गाव अकोल्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाच्या अगदी सुरूवातीलाच एका मंदिरवजा चौथऱ्यावर रावणाची एक अतिशय सुंदर, रेखीव मूर्ती आहे. 

 


Dasara 2023 : काय सांगता! महाराष्ट्रातील 'या' गावात होते चक्क रावणाची पूजा, 250 वर्षांपासूनची परंपरा काय आहे?


गावात रावणाच्या मुर्तीचं असं झालं आगमन

सांगोळा गावात रावणाच्या मंदिरासोबतच श्रीराम, हनुमान, भवानी देवीचंही मंदिर आहे. गावाला अगदी लागूनच गावाची जीवनवाहिनी समजली जाणारी मन नदी वाहते. या मूर्तीच्या आगमनामागची पौराणिक कथाही फार रोचक आहे. याच मन नदीच्या काठी ऋषी-मुनीचे आश्रम होते. अडीचशे वर्षांपूर्वी याच नदीच्या काठावर वास्तव्यास असलेल्या असलेल्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपस्या केली होती. त्यांच्या प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रम होत असत. ऋषी मरण पावल्यानंतर गावकऱ्यांनी मुर्तीच्या रूपाने त्यांच्या स्मृती जपण्याचा निर्णय घेतला. एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती घडवण्याचे काम सोपवले गेले. पण त्याच्या हातून घडली ती दशानन रावणाची मूर्ती. दहा तोंडे, काचा बसवलेले वीस डोळे, सर्व आयुध असलेले वीस हात अशी विराट मूर्ती त्याने घडवली. मूर्ती घडवली तिथे दहा फटे असलेले सिंदोळीचे झाड होते. सिंदोळीचे झाड, अवचित घडलेली ही घटना अन त्यातून ‘लंकेश्वराची मूर्ती’ साकारल्या गेल्याचा हा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांनी हेरला आणि गावात लंकेश्वर 'रावण महाराज' स्थिरावलेत. 

 

आणि या गावात लंकेश्वर 'रावण महाराज' स्थिरावलेत.... 


ही मूर्ती गावाच्या दुसऱ्या बाजूला ठेवायची होती. मात्र, मूर्ती गावाच्या वेशीवरून समोर हललीच नाही. त्यामुळेच गावाच्या सुरुवातीलाच तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. या आख्यायिकेबद्दल माहिती ही लिखित नसून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत राहते. या घटनेनंतर गेल्या अडीच शतकांपासून 'रावण महाराज' सांगोळावासियांचं दैवत बनलं आहे. येथे विजयादशमीला रावणाचे दहन होत नसून त्याची मनोभावे पूजा केली जाते. 

एकदा मूर्ती चोरून नेण्याचा प्रयत्न झाला होता 

सांगोळ्यातील रावणाची ही सुंदर मुर्ती 50-60 वर्षांपूर्वी चोरून नेण्याचा प्रयत्नही झाला. एकदा काही बाहेरच्या लोकं रात्रीच्या वेळी गावात ही मूर्ती चोरून नेण्याकरीता आली होती. मात्र, मोठे प्रयत्न करूनही ती उचललीच न गेल्याने चोरीचा प्रयत्न फसल्याची आठवण गावकरी सांगतात. 

'रावण महाराज' सांगोळावासियांचं 'दैवत'

या गावात रावणाच्या मंदिरासोबत राम, हनुमान आणि इतर देवतांची मंदिरंही आहेत. या देवतांच्या आराधनेबरोबरच गावकरी भक्तीभावानं रावणाचीही आराधना करतात. रावणाच्या मूर्तीचं कुतूहल असल्यानं अनेक लोक या मूर्तीच्या दर्शनालाही येतात. वर्षभरातून दसरा आणि रामनवमीला या रावणासाठी गावकरी विशेष आरती आणि सोहळा साजरा करतात. पुढच्या काळात गावात रावणाचे भव्य मंदिर उभारणीचा ग्रामस्थांचा मानस आहे. 

रावणदहन न करण्याचा सांगोळावासियांचा आग्रह 

दसऱ्याला होणारं रावण दहन थांबावं, असंही आवाहन हे गावकरी लोकांना करतात. कारण, रावण हा सर्वात मोठा शिवभक्त होता. देवी सीतेकडे त्यानं कधीही वाईट नजरेनं न बघता तिचा आई म्हणून सन्मानच केल्याचं गावकरी सांगतात. त्यामुळे रावणातील चांगुलपणाला पुजत त्याचा सन्मान केला जावा असं गावकऱ्यांना वाटतं. 


खरे राक्षस वेगळेच


रावणात दुर्गुणासोबतच फार मोठे सद्गुणही होते. मात्र, आजही सद्गुण दुर्लक्षित करीत देशभर होळी होतेय ते ती दुर्गुणरुपी रावणाचीच...  सध्याच्या परिस्थितीत महागाई, दहशतवाद, महिलांवरील अत्याचार, राष्ट्रीय एकात्मतेचे मारेकरी हेच खरे राक्षस आहेत. त्यांच्या रूपातील रावणाचा दहन करण्याची शपथ दसऱ्याला घेत देश बलशाली करूयात. सर्वार्थाने हेच खरं आपलं सीमोल्लंघन होऊ शकेल.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Dasara 2023 : यंदा दसऱ्याचा मुहूर्त कधीचा? होम हवन करण्याचा विधी आणि मुहूर्त, जाणून घ्या सविस्तर

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget