Ashadhi wari 2023 : माझे माहेर पंढरी... म्हणत वारकऱ्यांनी धरली पंढरीची वाट; ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्य़ा आज कुठे विसावणार?
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखीचा आजचा मुक्काम सराटीमध्य़े असणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुतेमध्ये विसावणार आहे.
Ashadhi wari 2023 : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूरचा मुक्काम आटोपून सराटीच्या मुक्कामाच्या (Ashadhi wari 2023) दिशेने मार्गस्थ झाला (Ashadhi ekadashi 2023) आहे. आजचा मुक्काम सराटीमध्ये असणार आहे. या पालखी सोहळ्यात अनेक वारकऱ्यांनी गर्दी केली होती. तुकोबारायांच्या पालखीचा रथ आल्यावर ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी टाळ्या वाजवून रथाचं स्वागत केलं होतं. डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आनंदानं चालत होते. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने बरडचा मुक्काम आटपून नातेपुतेकडे सकाळी मार्गस्थ झाली. आज ज्ञानोबांची पालखी नातेपुतेमध्ये विसावणार आहे.
Ashadhi wari 2023: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बरडचा मुक्काम आटपून नातेपुतेकडे प्रस्थान
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं बरडचा मुक्काम आटपून नातेपुतेकडे प्रस्थान ठेवलं. यावेळी बरडसियांनी पाणावलेल्या डोळ्यांनी पालखीला निरोप दिला. अनेक बरडसियांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. अनेकांनी वारकऱ्यांची सेवा केली. वारकऱ्यांचा पाहुणचार केला. कुटुंबियांप्रमाणे त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर रात्री वारकऱ्यांनी अनेक ठिकाणी भजनं केली आणि पुन्हा एकदा पंढरीच्या वाटेकडे रवाना झाले.
Ashadhi wari 2023 : माझे माहेर पंढरी... म्हणत वारकऱ्यांनी धरली पंढरीची वाट
राज्यभरातून निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी आहेत. लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंडी पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाच्या सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गावरील भाविक आनंदून जात आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.
Ashadhi wari 2023: अजितदादाच मुख्यमंत्री, अमोल मिटकरींचं पांडुरंगाकडे साकडं...
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूरचा मुक्काम आटोपून सराटीच्या मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. दरम्यान या पालखी सोहळ्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे सहकुटुंब सहभागी झालेत. यावेळी मिटकरी यांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. राज्यात सध्या धार्मिक तेढ निर्माण होत आहेत जर हे तेढ दुर करायचे असतील तर अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. आगामी काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादाच मुख्यमंत्री असतील, असं साकडं मी विठ्ठल चरणी घालतोय असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.