Relationship Tips : जोडीदारासोबतचं नातं छान हवंय? मग 'या' अपेक्षा ठेवू नका, एकदा ट्राय करा, तुमचं नातं आणखी बहरेल!
Relationship Tips : अनेक वेळा लोकांच्या जोडीदाराकडून अशा अपेक्षा असतात की त्या पूर्ण न झाल्यास नात्यात अंतर निर्माण होऊ लागते.
Relationship Tips : एकदा का तुम्ही प्रेमात (Love) पडलात, की जसजसं ते नातं फुलत जातं, तसतशा तुमच्या अपेक्षाही वाढत जातात. जोडीदाराकडून प्रत्येकाच्या अपेक्षा असतात. पण अनेक वेळा लोकांच्या जोडीदाराकडून अशा अपेक्षा असतात की त्या पूर्ण न झाल्यास नात्यात अंतर निर्माण होऊ लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अवास्तव अपेक्षांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे नाते बिघडू शकते.
तुमचं नातं बिघडवण्यास कारणीभूत ठरणारी गोष्ट कोणती?
नात्यात एकमेकांकडून अपेक्षा असणे अगदी सामान्य आहे, परंतु अशी काही गोष्ट आहे, जी तुमचं नातं बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते. ती म्हणजे एकमेकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदाराशी तुमच्या अपेक्षा बोलून शेअर करणे महत्त्वाचे आहे, तसेच तुमचा जोडीदार तुमच्या या अपेक्षा पूर्ण करू शकतो की नाही? हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
जोडीदाराकडून अपेक्षा ठेवा... पण...
अनेक वेळा लोक त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा खूप दुःखी होतात. त्याच वेळी, अनेक लोक जेव्हा त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा त्यांच्या जोडीदाराला दोष देतात आणि त्यांच्याशी भांडणे सुरू करतात. असे केल्याने तुमचे नाते बिघडू लागते आणि नात्यात दुरावा निर्माण होऊ लागतो. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही अवास्तव अपेक्षांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून चुकूनही करू नये. याचा तुमच्या नात्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.
एकमेकांसोबत वेळ घालवण्याबाबत..
बहुतेक लोक नात्यात सर्वात मोठी अशी चूक करतात की, त्यांच्या जोडीदाराने आपला सर्व वेळ आपल्यासोबत घालवला पाहिजे. तुमच्या या एका अपेक्षेमुळे तुमचा जोडीदार चिडू शकतो. अशा स्थितीत तुमच्या जोडीदाराशिवाय तुमचा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप असणे गरजेचे आहे. यामुळे नात्यात संतुलन राहते.
महत्त्वाच्या विषयांवर मतभेद
आपल्या विचारांप्रमाणेच कोणीतरी सोबत असायला हवं हा एक समज आहे. नातेसंबंधातील भागीदारांमध्ये काही महत्त्वाच्या विषयावर मतभेद असू शकतात, पण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की, दोन भिन्न लोकांचे स्वतःचे भिन्न विचार आहेत. अशा परिस्थितीत, तुमचे विचार समोरच्या व्यक्तीवर लादण्याऐवजी समजून घेणे किंवा तुमचे विचार स्पष्टतेने मांडणे महत्वाचे आहे. याचा तुमच्या नात्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.
प्राधान्य
नातेसंबंधांमध्ये लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांच्या जोडीदाराने तुम्हाला प्रथम प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा करणे. नातेसंबंध हा कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाचा खूप मोठा भाग असतो. परंतु कधीकधी एखाद्या व्यक्तीसाठी नातेसंबंधांपेक्षा अधिक महत्त्वाच्या अनेक गोष्टी असतात.
समजून घेणं
तुम्हाला काय हवंय? तुम्ही काहीही न बोलता तुम्ही रागावलेले किंवा दुःखी का आहात हे तुमच्या जोडीदाराने समजून घ्यावे, अशी अपेक्षा केल्याने नातेसंबंध बिघडू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमचं नातं वाचवायचं असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरशी स्पष्ट बोलणं गरजेचं आहे.
वाईट वाटणं
एक आदर्श नाते असे नसते जिथे भागीदारांमध्ये भांडणे होत नाहीत. त्याऐवजी, एक आदर्श संबंध असा असतो, ज्यामध्ये जोडीदारांना भांडणानंतर एकमेकांना कसे पटवून द्यावे आणि एकत्र पुढे कसे जायचे हे माहित असते.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :