एक्स्प्लोर

Relationship Tips : नातेवाईकांचे 'असे' फुकटचे सल्ले, जे पती-पत्नीचं नातं बिघडवू शकतात! दुर्लक्ष कराल, तर शांततेत जीवन जगाल

Relationship Tips : नातेवाइकांकडून असे अनेक सल्ले दिले जातात, जे नातेसंबंध वाढवण्याऐवजी ते तुटण्याच्या मार्गावर आणतात. त्याकडे कितपत लक्ष द्यायचं? नुकसान किंवा परिणाम याबाबत लक्ष देणे आवश्यक आहे

Relationship Tips : वेळेनुसार सर्व काही ठीक होईल.. हा सर्वात मोठा सल्ला अनेक नातेवाईकांकडून सर्वाधिक दिला जातो. हो ना? असं म्हणतात ना, कोणाचं चांगलं, प्रगतीचं आयुष्य असलं की ते अनेकांना बघवत नाही, मग संधी साधून विविध सल्ले देऊन ते नातं कसं तुटेल यावर काही जणांचा सर्वाधिक भर असतो. नातेवाईकांकडून दिले जाणारे काही सल्ले चांगलेही असतात. मात्र असे काही नातेवाईक असतात, ज्यांच्या सल्ल्यांमुळे तुमचे पती-पत्नीचे नाते चांगले होण्याऐवजी बिघडू शकते. चांगल्या नात्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेली सकारात्मकता, जी तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतेच पण तुम्हाला आनंदी ठेवते. मात्र जर असे होत नसेल तर याचा अर्थ तुमच्या नात्यात कुठेतरी तुटण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांना किंवा नातेवाइकांना परस्पर विसंवादाच्या या गोष्टी कळतात तेव्हा ते सल्ले देऊ लागतात. नातेवाइकांकडून असे अनेक सल्ले दिले जातात, जे नातेसंबंध वाढवण्याऐवजी ते तुटण्याच्या मार्गावर आणतात. त्याकडे कितपत लक्ष द्यायचं? त्यानंतर होणारं नुकसान किंवा परिणाम या गोष्टींबाबत लक्ष देणे आवश्यक आहे. जाणून घ्या...

वेळेनुसार सर्व काही ठीक होईल

वेळेनुसार सर्वकाही चांगले होईल..नातेवाईकांनी दिलेल्या या सल्ल्याचे पालन करून तुम्ही वाट बसू शकत नाही, कारण कधी कधी वेळ निघून जातो आणि नातेसंबंध बिघडत राहतात. म्हणूनच, जेव्हा तुमच्या नात्यात थोडीशी कटुता असते, त्याचवेळी विलंब न लावता तुम्ही तुमच्यातील गोष्टी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सासरचे घर सोडण्याचा सल्ला

परस्पर संबंध बिघडले की सासरचे घर सोडून जाण्याचा विशेष सल्ला नातेवाईकांचा असतो. त्यांच्या मते, सासरपासून वेगळे राहिल्याने सर्व काही चांगले होते. पण जर तुम्हाला तुमचं नातं दीर्घकाळ चांगलं ठेवायचं असेल तर नातेवाईकांचा हा सल्ला मनावर घेऊ नका.

प्रेगनंसी प्लॅन करा

जेव्हा नातेवाईक तुमच्या बिघडत चाललेल्या नात्याबद्दल ऐकतात, सहसा त्यांचा पहिला सल्ला असतो की आता प्रेगनंसी प्लॅन करा, सर्व काही ठीक होईल. मात्र गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी नातेसंबंध दुरुस्त करण्याकडे लक्ष दिले तर चांगले होईल. मुलाला जन्म देण्याचा निर्णय तुमच्या दोघांचा असावा, तुमच्या नातेवाईकांचा नाही.

घरकाम फक्त स्त्रियांना शोभते

घरातील बहुतांश कामे स्त्रीच करते. पण जर तुम्ही तुमच्या पतीला तुमच्या नातेवाईकांसमोर छोट्या छोट्या कामातही मदत करायला सांगितली तर तो अनेकदा तुम्हाला टोमणा मारेल की घरातील काम पुरुषांसाठी नाही. अशाप्रकारे तुमच्या घरात पुरुष काम करतात असा शब्द घराबाहेर जाईल. या टोमणेने नवऱ्याच्या वागण्यातही बदल होतो. अशा परिस्थितीत त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. त्यामुळे पतींनीही इतरांचं न ऐकता आपल्या पत्नीकडे लक्ष दिल्यास चांगले राहील.

स्वाभिमानाची बाब असेल तर झुकू नका

तुमच्या नातेवाइकांना तुमचे परस्पर मतभेद कळताच अनेक सल्लागार तुम्हाला सल्ला देतील की, तुमचा स्वाभिमान असेल तर हार मानू नका. अशा सल्ल्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, कारण अशा सल्ल्याने तुमचे चांगले नातेही बिघडू शकते. नातं टिकवण्यासाठी कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं.

मोठा निर्णय घेण्यापूर्वी...

राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. एस. धनंजय म्हणतात, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांमध्ये पुरेसे प्रेम मिळत नाही, तर आधी कारण जाणून घ्या. तुम्ही तुमच्या सासऱ्यांना आई-वडिलांप्रमाणे, वहिनींना बहिणीप्रमाणे, भावाला भावाप्रमाणे वागवून त्यांचा आदर करता का? तुमच्या सासरच्या घरात कोणी तुमच्याशी कसे वागते हे त्याचे व्यक्तिमत्व दर्शवते. तुम्ही जगातील प्रत्येकाला संतुष्ट करू शकत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणाचाही अपमान करू नका. तुमच्यासोबत काही अप्रिय वर्तन घडल्यास एकांतात चर्चा करा आणि शांतपणे तुमच्या पतीला सांगा. एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी, तुमच्या सासरच्या लोकांशी आणि पालकांशी नक्कीच चर्चा करा आणि जर काही पटत नसेल तर मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घ्या.

हेही वाचा>>>

Relationship Tips : तुमच्या नात्यात मतभेद, जोडीदाराचे बहाणे वाढतायत? Relationship Burnout चे संकेत, यातून बाहेर कसं पडाल?

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Eknath Shinde : माहीमची जागा, एकनाथ शिंदेंकडून एका दगडात दोन 'पक्ष'?Uddhav Thackeray On Eknath Shinde : माझी बॅग तुला तपासायला देतो फक्त कपडे चोरु नकोAmol Kolhe on Ajit Pawar : चुकीला क्षमा पण गद्दारीला माफी नाही, अमोल कोल्हे अजितदादांवर बरसलेSanjay Raut Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, मनसैनिकांनी दिलं आमंत्रण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget