Women Health : महिलांसाठी कच्ची पपई फायदेशीर; मिळतील अनेक फायदे
Papaya For Women : पपई आपल्या तब्येतीसाठी चांगला मानला जातो. तुम्ही कच्ची किंवा पिकलेला अशा दोन्ही प्रकारचे पपई खाऊ शकता. पपई खाल्ल्याने शरीराशी संबंधित बरेच गंभीर आजार बरे होतात.
Raw Papaya Benefits : पपई आपल्या तब्येतीसाठी चांगला मानला जातो. तुम्ही कच्ची किंवा पिकलेली अशा दोन्ही प्रकारचे पपई खाऊ शकता. पपई खाल्ल्याने शरीराशी संबंधित बरेच गंभीर आजार बरे होतात. महिलांनीही कच्च्या पपईचा आहारात समावेश करावा. यामुळे मासिक पाळीच्या त्रासात आराम मिळतो. याशिवाय कच्ची पपईचे आणखी कोणते फायदे आहेत ते जाणून घ्या.
कच्च्या पपईचे फायदे :
पपई खाल्ल्याने शरीराला गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते. पिकलेली पपई तुम्ही फळ म्हणून खाऊ शकता. दुसरीकडे, तुम्ही कच्च्या पपईपासून अनेक प्रकारच्या भाज्या बनवून खाऊ शकता. पपईमध्ये भरपूर पोषक घटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन, एन्झाईम्स, न्यूट्रिएंट्स आढळतात, जे पोटाच्या समस्या दूर करतात. कच्च्या पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, बी आणि मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखी खनिजे आढळतात. अशा परिस्थितीत पपईचे सेवन जरूर करावे. विशेषतः महिलांनी आपल्या आहारात पपईचा समावेश जरूर करावा. महिलांना पपई खाल्ल्याने अनेक फायदे होतात.
कच्चा पपई खाण्याचे फायदे :
- कच्ची पपई खाल्ल्याने महिलांना मासिक पाळी येण्याच्या त्रासात आराम मिळतो. यामुळे शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोस्टाग्लॅंडिनची पातळी वाढते ज्यामुळे वेदना कमी होते.
- कच्ची पपई खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण योग्य राहते.
- कच्चीपपई खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनक्रिया सुधारते.
- कच्ची पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सर्दी आणि फ्लूची समस्या दूर होते.
- मुलांना खायला घालणाऱ्या आईने कच्ची पपई जरूर खावी. कच्च्या पपईमुळे दूध वाढण्यास मदत होते.
महत्वाच्या बातम्या :