एक्स्प्लोर

Vitamin C : बदलत्या ऋतूत रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी 'या' व्हिटॅमिन्सचा आहारात समावेश करा; निरोगी राहाल

Immunity In Monsoon : शरीरात व्हिटॅमिन बी, सी, डी आणि झिंकची कमतरता नसावी. या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते.

Vitamins For Health : कोरोना विषाणूचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. तर दुसरीकडे पावसाळ्याचे दिवसही सुरु झाले आहेत. त्यामुळे आहाराची आणि शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी तुमची प्रतिकारशक्तीसुद्धा मजबूत असणे आवश्यक आहे.    आहारामध्ये जीवनसत्त्वे समृद्ध आहार घेतल्यास रोगप्रतिकारशक्तीसुद्धा चांगली राहते तसेच शरीर कोणत्याही विषाणूशी लढण्यास देखील सक्षम राहते. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी कोणते जीवनसत्त्वे आवश्यक आहेत हे जाणून घ्या. 

1. व्हिटॅमिन-सी : रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्हाला सर्दी, खोकला यासारख्या समस्या होऊ लागतात. जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे फुफ्फुसात जळजळ होते, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. व्हिटॅमिन सी जळजळ कमी करते. यासाठी लिंबूवर्गीय फळे आणि भाज्या खाव्यात. 

2. व्हिटॅमिन-डी : शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. यासाठी तुम्ही कॅल्शियम आणि फॉस्फरस समृद्ध असलेल्या गोष्टींचे सेवन करत राहणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही व्हिटॅमिन डी समृध्द असलेले सप्लिमेंट्सही घ्यावेत. व्हिटॅमिन डीचे सेवन केल्याने श्वसनाचे संक्रमण कमी होते. व्हिटॅमिन डी शरीराला श्वसनमार्गाच्या संसर्गापासून किंवा श्वसनाच्या स्नायूंमध्ये ताण येण्यापासून संरक्षण करते. 

3. व्हिटॅमिन बी-6 : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन बी-6 खूप आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी 6 मध्ये आढळणारी जैवरासायनिक प्रतिक्रिया रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते. यासाठी व्हिटॅमिन बी 6 समृद्ध असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करावा. 

4. झिंक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शरीरात झिंकची कमतरता नसावी. झिंकच्या कमतरतेमुळे लिम्फोसाइट्सच्या संख्येवर परिणाम होतो. झिंक शरीरात लिम्फोसाइट्सची संख्या वाढवते आणि प्रतिकारशक्ती मजबूत करते. झिंक देखील टी-सेल्स सक्रिय होण्यास मदत करते. झिंक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

टीव्हीची पिन थेट भिंतीच्या सॉकेटमध्ये लावावी की एक्सटेंशन बोर्डमध्ये? जाणून घ्या स्मार्ट टीव्ही कनेक्ट करण्याचा योग्य मार्ग
टीव्हीची पिन थेट भिंतीच्या सॉकेटमध्ये लावावी की एक्सटेंशन बोर्डमध्ये? जाणून घ्या स्मार्ट टीव्ही कनेक्ट करण्याचा योग्य मार्ग
Women Health: महिलांनो..प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करण्याची घाई नको! आधी शरीराला द्या योग्य पोषण, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात...
महिलांनो..प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करण्याची घाई नको! आधी शरीराला द्या योग्य पोषण, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात...
Menstrual Health: मासिक पाळीच्या या असामान्य लक्षणांकडे चुकुनही दुर्लक्ष करु नका; पाळीची तारीख सतत बदलत असेल तर...
मासिक पाळीच्या या असामान्य लक्षणांकडे चुकुनही दुर्लक्ष करु नका; पाळीची तारीख सतत बदलत असेल तर...
New Blood Group: A, B, AB, O रक्तगटात आता नव्या ब्लड ग्रुपची भर; वैज्ञानिकांचा नवा शोध; जाणून घ्या 
A, B, AB, O रक्तगटात आता नव्या ब्लड ग्रुपची भर; वैज्ञानिकांचा नवा शोध; जाणून घ्या 

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
Mamata Banerjee: इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
Asian Games : कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं
कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं
Mumbai Ganpati Visarjan : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धुळीस, 'या' भागात नोंदवला गेला सर्वाधिक 107 डेसिबल आवाज!
मुंबईत विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धुळीस, 'या' भागात नोंदवला गेला सर्वाधिक 107 डेसिबल आवाज
Embed widget