Patanjali: डिटॉक्स, योग आणि सात्त्विक आहार… पतंजली वेलनेसच्या यशामागचं रहस्य काय?
Patanjali: पतंजलीचा दावा आहे की त्यांचे वेलनेस सेंटर हे आयुर्वेद, योग आणि आधुनिक विज्ञानाचा संगम आहे. येथे नैसर्गिक उपचारपद्धतींच्या माध्यमातून विविध रोगांवर उपचार केले जातात.

Patanjali News: आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव, लठ्ठपणा, डायबिटीज आणि हृदयरोग यांसारखे आजार सामान्य झाले आहेत. त्यामुळे लोकांना नैसर्गिक, सुरक्षित आणि दीर्घकालीन उपचारांची गरज भासू लागलीय. पतंजलीचं म्हणणं आहे की, 2006 पासून सुरु असलेली त्यांची वेलनेस सेंटर्स( Patanjali wellness centre) सामान्य लोकांसाठी वरदान ठरत आहेत. योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे हे केंद्र आयुर्वेद, योग आणि आधुनिक वैद्यकीय विज्ञान यांचा अनोखा संगम आहे, जो जगातील इतर वेलनेस प्रोग्राम्सपेक्षा वेगळाय.
पतंजलिचा दावा आहे, “कंपनी आपल्या फार्म हाऊस आणि जीएपी (गुड अॅग्रीकल्चर प्रॅक्टिस) शेतीतून मिळालेल्या औषधी वनस्पतींपासून संपूर्ण नैसर्गिक, केमिकलमुक्त आणि स्टेरॉइडविरहित औषधे तयार करते. पंचकर्म, शिरोधारा, कटि बस्ति, स्वेदन यांसारख्या प्राचीन उपचारपद्धतींना पॅथोलॉजी लॅब, एक्स-रे, ईसीजी, अल्ट्रासाऊंड अशा आधुनिक निदान साधनांसोबत जोडले जाते. ज्यामुळे रोगाचे अचूक निदान करता येते.”
100 हून अधिक आजारांवर उपचार- पतंजली
पतंजलीने सांगितलं की, “निसर्गोपचार आणि योग यांचा समन्वय ही आमची आणखी एक मोठी खासियत आहे. सूर्योदयापूर्वी प्राणायाम, ध्यान आणि योगासनाचे सत्र घेतलं जातं. जलचिकित्सा, मृत्तिकाचिकित्सा, उपवास आणि सात्त्विक आहाराद्वारे शरीराचा डिटॉक्स केला जातो. मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, संधिवात, लठ्ठपणा, त्वचारोग अशा 100 पेक्षा अधिक आजारांवर येथे शस्त्रक्रियेविना आणि दुष्परिणाममुक्त उपचार यशस्वीपणे होत आहेत.”
5 स्टार रिसॉर्टसारख्या सुविधा- पतंजली
आधुनिक सुविधा, आलिशान निवास, ऑर्गेनिक किचन, स्विमिंग पूल, स्पा- या सर्वांमुळे आमची वेलनेस सेंटर्स पाचतारांकित रिसॉर्टसारखी वाटतात. पण उद्देश व्यावसायिक नाही, तर मानवसेवा हा आहे. त्यामुळे दरवर्षी देश-विदेशातून हजारो लोक हरिद्वार, बेंगळुरू, नागपूर यांसारख्या ठिकाणी असलेल्या पतंजली वेलनेस सेंटरमध्ये उपचारासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी येतात.” असा पतंजलीचा दावा आहे.
स्वामी रामदेव म्हणतात,“आमचं ध्येय केवळ रोगमुक्ती नाही, तर रुग्णाला असा जीवनशैली प्रशिक्षण देणे आहे. ज्यामुळे तो आयुष्यभर औषधांपासून मुक्त राहील.” याच तत्त्वज्ञानामुळे पतंजली वेलनेस जगातील सर्वात प्रभावी आणि किफायतशीर वेलनेस कार्यक्रमांमध्ये गणला जातो.
























