(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लठ्ठपणा कमी करण्यासाठी बॅरिअॅट्रिक सर्जरीनंतर ऑनलाईन सपोर्ट ग्रुपचा आधार
लठ्ठपणा कमी करण्यासाठी बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या रूग्णांसाठी किंवा शस्त्रक्रिया करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आता ऑनलाईन सपोर्ट ग्रुप सुरू करण्यात आला आहे.लॉकडाऊनच्या काळावधीत आहार आणि कामाच्या वेळापत्रकात बदल झाल्याने घरबसल्या वजन वाढीची समस्या वाढू लागली आहे.
मुंबई : लठ्ठपणा कमी करण्यासाठी बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या रूग्णांसाठी किंवा शस्त्रक्रिया करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आता ऑनलाईन सपोर्ट ग्रुप सुरू करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळावधीत आहार आणि कामाच्या वेळापत्रकात बदल झाल्याने घरबसल्या वजन वाढीची समस्या वाढू लागली आहे. तसेच शस्त्रक्रिया केलेल्या रूग्णांना रूग्णालयात येता येत नाही, अशा स्थितीत घर बसल्या रूग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी या सपोर्ट ग्रुपची मदत मिळतेय.
बॅरिअॅट्रिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर म्हणाल्या की, ‘‘जास्त वजन असल्याने लोक हिणवतील, या भितीने अनेक लोक घराबाहेर पडणं टाळतात. काही लोक कौटुंबिक समारंभात सहभागी होत नाहीत. वाढत्या वजनामुळे लोक चेष्टा करत असल्याने अनेकांचा स्वाभिमान दुखावला जातो. अशा रूग्णांसाठी बॅरिअॅट्रिक सर्जरी हा एक उत्तम पर्याय आहे. रूग्णांना हा पर्याय निवडण्यास मदत करणं गरजेचं आहे. याशिवाय बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेनंतर खाण्यापिण्याच्या बाबतही तथ्य पाळणं आवश्यक आहे, याकरता लॉकडाऊनमध्ये खास लठ्ठ व्यक्तीसाठी आता घरबसल्या ऑनलाईन सपोर्ट ग्रुप सुरू करण्यात आला आहे. बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या रूग्णांसाठी हा योजना एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतेय.’’
बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेनंतर रूग्ण नियमितपणे मिटिंगमध्ये सहभागी झाल्यास तो वजन पटकन कमी करू शकतो. तसेच आरोग्यही उत्तम ठेवू शकतो. अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण घरात अडकून पडला आहे. दररोज व्यायामासाठी घराबाहेरही पडू शकत नाही. अशा स्थितीत वजन वाढीची समस्या वाढू लागली आहे, यात शंकाच नाही. परंतु, लॉकडाऊनच्या काळावधीत लठ्ठपणामुळे त्रस्त झालेल्या आणि बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया केलेल्या रूग्णांना आवश्यक शारीरिक हालचाली करण्यास मिळत नाहीये. त्यामुळे या रूग्णाचे वजन वाढण्याची शक्यता असते. अशा स्थितीत रूग्णांना सपोर्ट ग्रुपचा आधार दिला जात आहे. या ग्रुपच्या माध्यमातून डॉक्टर रूग्णांच्या संपर्कात राहून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. याशिवाय रूग्णांना गरजेनुसार आवश्यक ते मार्गदर्शन करत आहेत, असेही डॉ. अपर्णा यांनी सांगितले.
लठ्ठपणामुळे ग्रस्त असणाऱ्या लोकांना अजूनही समाजाकडून हीन वागणूक मिळते. याचं मुख्य कारणं, लठ्ठपणाबाबत समाजात जागरूकतेचा अभाव आहे. अतिलठ्ठ व्यक्तींकडे समाज एक वेगळ्याच दृष्टीने पाहतो. हे लोक सतत उपहासाचे विषय बनतात. त्यामुळे या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास कुठेतरी कमी दिसून येतो. बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया ही रूग्णांसाठी सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. तरीही भारतीय समाजात आजही ती निषिद्ध मानली जाते.
डॉ. अपर्णा पुढे म्हणाल्या की, ‘‘लठ्ठपणा हा एक आजार आहे, म्हणूनच त्याचा उपचार फक्त बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेपुरताच मर्यादित नाही. बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया ही नव्या आयुष्याची सुरूवात आहे. बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना वजन वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लक्ष द्यावे लागते. याशिवाय आहाराचे योग्य नियोजन करणं आणि नियमित व्यायाम करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन रूग्णांना मिळणं गरजेचं आहे, यासाठी ऑनलाईन सपोर्ट ग्रुप काम करत आहे. इतकंच नाहीतर या सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून ज्या रूग्णांची बॅरिअँट्रिक शस्त्रक्रिया झाली आहे, त्या रूग्णांशी डॉक्टर थेट संपर्कात राहू शकतात.’’
ऑनलाईन सपोर्ट ग्रुप कसे काम करते
-
- बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींना या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले जाते.
- शस्त्रक्रियेनंतर वजन वाढणार नाही, यासाठी कायकरावेत याबाबत डॉक्टर रूग्णांना मार्गदर्शन करतात.
- लठ्ठपणामुळे त्रस्त असणाऱ्या व्यक्तींना शस्त्रक्रिया झालेले रूग्ण स्वतःचा अनुभव सांगतात.
- शस्त्रक्रियेनंतर आहार कशा असावा, याबद्दल या बैठकीत योग्य तो सल्ला डॉक्टर देतात.रूग्ण ही डॉक्टरांकडे त्यांच्या समस्या मांडतात.
सपोर्ट ग्रुपची मदत कशाप्रकारे होऊ शकते?
- लठ्ठपणामुळे शस्त्रक्रिया करून घेण्याबद्दल चिंताग्रस्त असणारे रूग्ण, जे शस्त्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. किंवा ज्या रूग्णांची बॅरिअँट्रिक शस्त्रक्रिया झालेली आहे. बऱ्याचदा रूग्णांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य देखील या सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी होतात.
- सपोर्ट ग्रुपची ही बैठक केवळ शस्त्रक्रियेच्या यशाबद्दल बोलण्यासाठी नव्हेतर लठ्ठपणामुळे त्रस्त असणाऱ्या लोकांना मानसिक आधार देण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. लठ्ठपणामुळे एकाकी जीवन जगणाऱ्यांसाठी ही बैठक मदत करतेय. परंतु, बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियेबद्दल लोकांमध्ये भिती असते ही चिंता दूर करून या शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहन देण्याच कामही सपोर्ट ग्रुपद्वारे केलं जात आहे.
- या सपोर्ट ग्रुपद्वारे डॉक्टर रूग्णांच्या थेट संपर्कात राहतात. रूग्ण वैयक्तिरित्या रूग्णालयात येऊ शकला नाहीतरी या ऑनलाईन पद्धतीने रूग्णाने कशा आहार घ्यावा, काय व्यायाम करावा याबाबत डॉक्टर मार्गदर्शन करत आहेत.
-
अनेक रूग्ण दूरहून उपचारासाठी रूग्णालयात येतात. पण या ऑनलाईन पद्धतीमुळे रूग्णाचा प्रवासाचा वेळ वाचतोय.