एक्स्प्लोर

Health Tips : वजन कमी करणारा दुधीचा रस ‘या’ समस्यांवरही गुणकारी! जाणून घ्या याचे फायदे...

Bottle Guard juice Benefits : दुधीच्या रसामध्ये कॅलरी आणि लिपिड्स कमी असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते उत्तम पेय बनते.

Bottle Guard juice Benefits : असं म्हटलं जातं की, जर भाज्यांमधून अधिक पोषक द्रव्ये मिळवायची असतील, तर त्यांचा रस बनवून प्यावा. दुधी ही अशा भाज्यांपैकी एक आहे, ज्याचा रस प्यायला लोकांना आवडतो. पोटॅशियमसह व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, लोह, मॅग्नेशियम, फोलेट यांसारखे सर्व आवश्यक पोषक घटक दुधीमध्ये असतात. याशिवाय यात भरपूर फायबर असते, ज्यामुळे हा रस कॅलरी-फ्रेंडली बनतो.

दुधीच्या रसामध्ये कॅलरी आणि लिपिड्स कमी असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते उत्तम पेय बनते. शिवाय, त्यात फायबरचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होते आणि भूक कमी लागते. जर, रिकाम्या पोटी दुधीचा रस प्यायला, तर पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. मात्र, दुधीचा रस वजन कमी करण्यासाठी काम करत नाही, तर इतर समस्यांमध्येही गुणकारी ठरतो.

तणाव आणि नैराश्यात आराम : दुधीमध्ये कोलीनचे प्रमाण जास्त असते. हा एक न्यूरोट्रांसमीटर आहे, जो मेंदूच्या पेशींच्या कार्यामध्ये मदत करतो आणि त्यामुळे मानसिक आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होते. यासोबतच कोलीनचे प्रमाण जास्त असल्याने, तणावाची पातळी कमी करण्यास आणि नैराश्य टाळण्यास मदत होते.

हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम :  रिकाम्या पोटी दुधी रस प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. दुधीमध्ये उच्च विद्राव्य फायबर असते, जे रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते. परिणामी हृदय निरोगी राहते.

मुरुम कमी करते : दुधीच्या रसामध्ये क्लीन्जिग गुणधर्म असतात. हा रस आपली त्वचा आणि अंतर्गत प्रणाली डिटॉक्स करतो आणि आपल्या शरीरातील घाण, विषारी घटक आणि धूळ नष्ट करतो. याव्यतिरिक्त, हा घटक सेबम उत्पादन नियंत्रित करतो.

निद्रानाश दूर होतो : आजकाल झोपेशी संबंधित समस्या सामान्य आहेत. झोपेच्या समस्येवर उपचार करण्यासाठी देखील दुधीचा रस मदत करतो. चांगली झोप येण्यासाठी दुधीचा रस पिऊ शकता.

दुधीच्या रसाचे दुष्परिणाम

दुधीच्या रसामध्ये काही प्रमाणात विषद्रव्ये असतात, ज्यामुळे रक्तस्त्राव, अतिसार, उलट्या आणि पोटात अल्सर होऊ शकतो. दुधीमध्ये काही विषारी संयुगे असतात जसे की, टेट्रासायक्लिक ट्रायटरपेनॉइड्स, ज्याला क्युकर्बिटॅसिन म्हणतात. दुधीचा ज्यूस पिण्यापूर्वी त्याची चव घ्या. हा रस थोडा जरी कडू असेल, तरीही तो पिऊ नका. कारण तो विषारी असू शकतो आणि गंभीर परिणाम होऊ शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
CSK Zaheer Khan: चेन्नई सुपर किंग्जचा नवा डाव, IPL 2027 साठी झहीर खानवर सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी 
स्टीफन फ्लेमिंगनं साथ सोडली, चेन्नईनं नवा डाव टाकला, झहीर खानवर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जेवणासाठी फ्री स्टाईल; पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर एकच घाई, कॉलर पकडून हाणामारी
भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जेवणासाठी फ्री स्टाईल; पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर एकच घाई, कॉलर पकडून हाणामारी
Post Office RD Scheme : दरमहा फक्त 4000 रुपयांची पोस्टाची RD ठरेल गेमचेंजर, 5 वर्षात किती फंड जमणार, कर्ज काढण्याची सुविधा उपलब्ध, जाणून घ्या
दरमहा फक्त 4000 रुपयांची पोस्टाची RD ठरेल गेमचेंजर, 5 वर्षात किती फंड जमणार, आर्थिक संकटात कर्ज देखील मिळतं...

व्हिडीओ

Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
विद्यानंद बापट लहानपणापासूनच हुशार; रत्नागिरीत 22 वर्षांपूर्वीच तत्कालीन नेते उदय सामंतांकडून सत्कार, फोटो व्हायरल
CSK Zaheer Khan: चेन्नई सुपर किंग्जचा नवा डाव, IPL 2027 साठी झहीर खानवर सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी 
स्टीफन फ्लेमिंगनं साथ सोडली, चेन्नईनं नवा डाव टाकला, झहीर खानवर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जेवणासाठी फ्री स्टाईल; पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर एकच घाई, कॉलर पकडून हाणामारी
भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जेवणासाठी फ्री स्टाईल; पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर एकच घाई, कॉलर पकडून हाणामारी
Post Office RD Scheme : दरमहा फक्त 4000 रुपयांची पोस्टाची RD ठरेल गेमचेंजर, 5 वर्षात किती फंड जमणार, कर्ज काढण्याची सुविधा उपलब्ध, जाणून घ्या
दरमहा फक्त 4000 रुपयांची पोस्टाची RD ठरेल गेमचेंजर, 5 वर्षात किती फंड जमणार, आर्थिक संकटात कर्ज देखील मिळतं...
अमित ठाकरेंचा संवेदनशीलपणा; केमिकल रंगाने रंगलेल्या चिमुकल्यांना पाहून वेदना, मदतीसाठी पुढाकार, मनसैनिकांना आवाहन
अमित ठाकरेंचा संवेदनशीलपणा; केमिकल रंगाने रंगलेल्या चिमुकल्यांना पाहून वेदना, मदतीसाठी पुढाकार, मनसैनिकांना आवाहन
Bombay High Court on DJ : डीजेच्या दणदणाटाची मुंबई हायकोर्टाकडून सुमोटो दखल; क्षमतेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या डीजेंवर बंदीचे आदेश,उद्या तातडीची सुनावणी
डीजेच्या दणदणाटाची मुंबई हायकोर्टाकडून सुमोटो दखल,क्षमतेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या डीजेंवर बंदीचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 सप्टेंबर 2026 | सोमवार
मग मुख्यमंत्र्यांनाच बांधावर पाठवा, रोहित पवार मंत्र्यांवर संतापले; आमदार देशमुख निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले
मग मुख्यमंत्र्यांनाच बांधावर पाठवा, रोहित पवार मंत्र्यांवर संतापले; आमदार देशमुख निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले
Embed widget