No Diet Day 2024 : आज डाएट ठेवा बाजूला, बिनधास्त जे आवडेल ते खा! आज 'नो डाएट डे', का साजरा करतात दिवस?
No Diet Day 2024 : मंडळीनो.. आजचा दिवस तुमचा आहे. जे हवं ते खा.. कोणतीही काळजी न करता तुमच्या आवडत्या गोष्टी खा, आरोग्याला कोणतीही हानी होणार नाही.
![No Diet Day 2024 : आज डाएट ठेवा बाजूला, बिनधास्त जे आवडेल ते खा! आज 'नो डाएट डे', का साजरा करतात दिवस? No Diet Day 2024 Lifestyle marathi news Today put the diet aside eat whatever you like Today No Diet Day reason behind celebrate this day No Diet Day 2024 : आज डाएट ठेवा बाजूला, बिनधास्त जे आवडेल ते खा! आज 'नो डाएट डे', का साजरा करतात दिवस?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/963e8b9e1e60b0a1a77e52eba1015a6a1714968719118381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
No Diet Day 2024 : आजकाल बदलती जीवनशैली, धकाधकीचे जीवन, खाण्याच्या अयोग्य वेळा आणि कामाचा तणाव या सर्व गोष्टींमुळे अनेकांचे वजन झपाट्याने वाढत आहे. वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे असून त्यासाठी अनेक जण मनापासून इच्छा नसतानाही डाएट फॉलो करतात. आपल्या आवडत्या पदार्थांवर निर्बंध घालतात. पण अशात तुमच्या मनाला आणि पोटाला कसं समजवाल? त्यामुळे एक दिवस असा आहे, जो फक्त तुमचा दिवस आहे. या दिवशी तुम्ही हवं ते खाऊ शकता, मनाप्रमाणे राहू शकता. आज आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस असून दरवर्षी 6 मे रोजी साजरा केला जातो. जे नेहमी कठोर आहाराचे पालन करतात आणि त्यांच्या खाण्याच्या सवयींबाबत शिस्तबद्ध राहतात त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास आहे.
खाण्याबाबत शिस्तबद्ध राहण्यासाठी खास दिवस!
आजकाल, बहुतेक लोक वाढलेले वजन किंवा विविध रोगांपासून मुक्त होण्यासाठी कमी आहारावर राहतात. आपल्या आहारात अति निर्बंध असणे कधीकधी कंटाळवाणे होते. अशा परिस्थितीत दरवर्षी 6 मे रोजी आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस साजरा केला जातो. जे नेहमी कठोर आहाराचे पालन करतात आणि त्यांच्या खाण्याच्या सवयींबाबत शिस्तबद्ध राहतात त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास आहे. या दिवशी, लोक त्यांच्या आहाराचे नियम तोडतात आणि कोणत्याही दोषाशिवाय त्यांच्या आवडीचे काहीही खातात. पाहिले तर त्याला नो डाएट डे किंवा चीट डे असेही म्हणता येईल. या दिवशी असे केल्याने लोक स्वतःवरील प्रेम व्यक्त करतात. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की 6 मे रोजी नो डाएट डे का साजरा केला जातो.
नो डाएट डे का साजरा केला जातो?
चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लठ्ठपणा ही सतत मोठी समस्या बनत चालली आहे. लोक लठ्ठ होत चाललेत आणि हा लठ्ठपणा सर्व प्रकारच्या रोगांचे घर बनत आहे. लठ्ठपणा हे रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदय आणि सांधेदुखीपर्यंतच्या आजारांचे कारण बनले आहे. अशा परिस्थितीत अनेक वेळा डॉक्टर कठोर आणि शिस्तबद्ध आहार पाळण्याचा सल्ला देतात, स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक नियमांचे पालन करून अन्न खातात. स्वतःला तंदुरुस्त ठेवणे महत्वाचे आहे. पण रोज असे केल्याने लोक त्यांच्या आयुष्याचा आनंद लुटायला विसरतात. या उद्देशाने दरवर्षी 6 मे रोजी नो डाएट डे साजरा केला जातो. जेणेकरून एक दिवस लोकांनी खाण्या-पिण्याचे नियम मोडून त्यांच्या आवडत्या गोष्टी खाव्यात आणि कोणताही पश्चाताप न करता त्यांचा आनंद घेता यावा. या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय आजच्या दिवशी नातेवाईक आणि मित्र एकमेकांना घरी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करतात आणि हा दिवस मोकळेपणाने साजरा करतात.
आंतरराष्ट्रीय नो डाएट डे चा इतिहास
1992 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस साजरा करण्यात आला. ब्रिटीश महिला मेरी इव्हान्सने याची सुरुवात केली होती. लोकांना त्यांच्या शरीराच्या आकाराची लाज वाटू नये आणि ते जसे दिसतात तसे स्वीकारले पाहिजेत हा मेरीचा उद्देश होता. तसेच डाएटिंगमुळे होणारे नुकसान समजून घ्या. मेरी इव्हान्स स्वतः एनोरेक्सियासारख्या आजाराने ग्रस्त होती. एनोरेक्सिया हा खाण्याच्या विकाराचा एक प्रकार आहे. याला एनोरेक्सिया नर्वोसा असेही म्हणतात. या आजारात शरीराचे वजन वाढण्याचा धोका वाढतो. मेरी इव्हान्सने डायट ब्रेकर नावाची संस्था सुरू केली आणि तिच्या संस्थेमार्फत पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय नो डाएट डे आयोजित केला. तिला लोकांना हे समजावून द्यायचे होते की तुम्ही जसा दिसतो तसा स्वीकार करावा. तुमच्या शरीराच्या आकारामुळे स्वतःला लाज वाटू देऊ नका. आयुष्य पूर्ण जोमाने जगा.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Mothers Day 2024 : 'आईसारखे दैवत...' मदर्स डे निमित्त आईवर 'असं' भाषण कराल की, प्रत्येकजण होईल भावूक, इथून आयडिया घेऊ शकता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)