Navratri Health Tips : नवरात्रीच्या उपवासात 'या' चार फळांचा समावेश करा; दिवसभर उत्साही राहाल
Navratri Health Tips : दररोज किमान एक फळ जरी खाल्लं तरी शरीरात ऊर्जा मिळते. तसेच, तुमचे शरीर हायड्रेटेड राहते.
Navratri Health Tips : शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri 2022) सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांत विविध देवींची भक्तिभावाने पूजा केली जाते. उपवास केले जातात. काही लोक निर्जल उपवास करतात. तर काही अनवाणी चालतात. मात्र, या काळात आरोग्याची देकील काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. काही लोक भक्तिभावाने पूजा करतात आणि नंतर शरीरा थकवा जाणवतो. अशक्तपणा येणे, चक्कर येणे असे प्रकार दिसू लागतात. तुम्ही सुद्धा नवरात्रीच्या काळात उपवास करण्याचा विचार करत असाल तर आहाराच्या यादीत काही फळांचा समावेश नक्की करा. दररोज किमान एक फळ जरी खाल्लं तरी शरीरात ऊर्जा मिळते. तसेच, तुमचे शरीर हायड्रेटेड राहते.
नवरात्रीत 'ही' फळे खा
सफरचंद (Apple) : सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर मिळते. याबरोबरच सफरचंदात कार्बोहायड्रेट्स देखील असतात. त्यामुळे शरीरात अधिक काळापर्यंत ऊर्जा टिकून राहते. तसेच, डॉक्टरांकडून अनेकदा सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही 9 दिवस उपवास करत असाल तर नवरात्रीत सफरचंदाचे सेवन जरूर करा.
ब्लूबेरी (Blueberry) : ब्लूबेरीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. याशिवाय ब्लूबेरीमध्ये पाण्याचे प्रमाणही जास्त प्रमाणात असते. यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहते. जर तुम्हाला उपवासातही उत्साही राहायचे असेल तर तुम्ही आहारात ब्लूबेरीचा समावेश नक्की करा. यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल. तसेच, तुम्ही अनेक शारीरिक समस्यांपासून दूर राहाल.
संत्र (Orange) : संत्र्यांना व्हिटॅमिन सी चा चांगला स्त्रोत मानला जातो. संत्र खाल्ल्याने तुम्हाला अनेक शारीरिक फायदे मिळू शकतात. हे फळ तुम्हाला तंदुरूस्त ठेवण्याबरोबरच दिवसभर हायड्रेटेड देखील ठेवते. संत्र्यांत फायबर आणि पाणी जास्त प्रमाणात असते. नवरात्रीत उपवास करत असाल तर संत्री नक्की खा.
प्लम (Plum) : प्लम खाल्ल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते. यासोबतच तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स मिळतात. ज्यामुळे तुम्हाला शारीरिक कमजोरी जाणवत नाही. उपवासात शरीर निरोगी ठेवायचे असेल तर प्लम खा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :