Navratri 2023 : यंदाच्या नवरात्रीत देवीचा मंडप 'या' पद्धतीने सजवा; जाणून घ्या 5 सोप्या पद्धती
Navratri 2023 : दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते.
Navratri 2023 : हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. देवी दुर्गाला समर्पित नवरात्रीचा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. भारतातील प्रत्येक राज्यात नवरात्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते आणि प्रत्येक राज्यात या सणाचे वेगळे महत्त्व आहे. नवरात्रीच्या सणाला अनेकजण आपल्या घरात देवीची मूर्ती बसवतात. तुम्हालाही या नवरात्री 2023 मध्ये मातेच्या नवरात्रीची स्थापना करायची असेल, तर तुम्ही या कल्पनांच्या मदतीने देवीचा मंडप सजवू शकता.
या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. संपूर्ण नऊ दिवस देवी आदिशक्ती जगदंबेची पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, यावर्षी शारदीय नवरात्र रविवार, 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होत आहे.
1.
या नवरात्रीत तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये अशा प्रकारची सजावट करू शकता. यासाठी तुम्हाला एक साधा पडदा लागेल, तुम्ही लाईटिंगदेखील वापरू शकता. फुलांसाठी, तुम्ही बाजारातून कृत्रिम फुले खरेदी करू शकता किंवा कागदाच्या मदतीने फुले बनवू शकता. ही सजावट खास बनवण्यासाठी तुम्ही वॉल हँगिंग किंवा वेगवेगळ्या रंगांचे पडदे वापरू शकता.
2.
विविध रंगांचे पडदे वापरून तुम्ही अशा प्रकारची सजावट करू शकता. ही सजावट तुम्ही ओढणी किंवा कोणत्याही हलक्या कापडाने करू शकता. या प्रकारची सजावट अतिशय खास दिसेल.
3.
ही सजावट तुमचे घर किंवा ऑफिस देखील खूप खास बनवेल. या प्रकारच्या सजावटीसाठी, तुम्हाला 2-3 रंगीत पडद्यांची आवश्यकता असेल. तुम्ही कृत्रिम फुले वापरू शकता आणि दिवे जोडू शकता. वॉल हँगिंगच्या मदतीने तुम्ही पडदे आणखी चांगल्या पद्धतीने सजवू शकता.
4.
ही सजावट खूप खास आहे. गुजराती थीमवर केलेली ही सजावट तुम्ही नक्की करून पाहा. तसेच या प्रकारच्या सजावटीसाठी तुम्ही कागदाचा वापर करून हे वॉल हँगिंग्ज बनवू शकता. फुलांच्या हारांच्या मदतीने तुम्ही ही सजावट अतिशय सर्जनशील बनवू शकता.
5.
ही फुलांची सजावट तुमचे घर देखील खूप खास बनवेल. तुम्ही पडदा वापरू शकता किंवा पाठीमागे छान केळीची पाने देखील वापरू शकता. ही सजावट खूप खास आणि सुंदर दिसेल. तुम्ही या नवरात्रीत नक्की करून पाहू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Shardiya Navratri 2023 : शारदीय नवरात्र कधी आहे? नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा! जाणून घ्या