Navratri 2023 : नवरात्रीच्या उपवासात 'या' 3 चुका कधीही करू नका, वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते; जाणून घ्या कसे?
Navratri 2023 : या काळात मानसिक शांततेसह आपल्या शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
Navratri 2023 : आज नवरात्रीचा (Navratri 2023) तिसरा दिवस आहे. नवरात्रीच्या या उत्सवात अनेक भाविकांचे उपवास सुरु झाले आहेत. उपवासाने आपण शारीरिकदृष्ट्याही निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. या काळात आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवू शकतो. तसेच, या काळात मानसिक शांततेसह आपल्या शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी देखील उपवास ठेवतात. पण अनेकदा लोक या दिवसात अशा चुका करतात की त्यांचे वजन कमी होण्याऐवजी वाढते. नवरात्रीत उपवासा दरम्यान कोणत्या चुका करू नयेत हे या ठिकाणी जाणून घेऊयात.
नियमित न खाणे :
नवरात्रीच्या काळात बरेच लोक दीर्घकाळ उपवास करतात त्यामुळे त्यांचे शरीर पोषक तत्वांच्या कमतरतेला बळी पडते. नियमित न खाल्ल्याने आपले शरीर कमकुवत होते आणि आपल्याला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो आणि वजन वाढते. त्यामुळे नवरात्रीच्या काळातही आपण ठराविक अंतराने काही ना काही खात राहायला हवे. फळे, दूध, दही असे हलके पौष्टिक अन्न काही ठराविक अंतराने खात राहावे.
तळलेले पदार्थ खाऊ नयेत
नवरात्रीच्या काळात, लोक अनेकदा तेल आणि तुपाचे तळलेले पदार्थ खाण्यास सुरुवात करतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. जास्त तळलेले अन्न आपल्या शरीराला अनावश्यक कॅलरीज पुरवतात ज्यामुळे वजन वाढू शकते. याशिवाय जास्त तळलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने अन्नामध्ये ट्रान्स फॅट वाढते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे नवरात्रीमध्ये तळलेले अन्न आणि जास्त तेल-तूप टाळून आरोग्यदायी पदार्थ खावेत.
गोड पदार्थ खाणे :
नवरात्रीच्या काळात बरेच लोक लाडू, हलवा, मिठाई इत्यादी गोड पदार्थांचे सेवन करतात. यामध्ये भरपूर साखर असते जी आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. गोड पदार्थांमध्ये जास्त कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढते.
पुरेसे पाणी न पिणे :
उपवासामुळे पाणी कमी प्यायल्याने शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. एवढेच नाही तर पुरेसे पाणी न प्यायल्याने आपले शरीर निर्जलीकरण होते. यामुळे डोकेदुखी, अशक्तपणा, बद्धकोष्ठता यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. शरीरात टॉक्सिन्स देखील जमा होऊ लागतात ज्यामुळे वजन वाढू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :