Mothers Day 2022 : यंदाचा ‘मदर्स डे’ नायिकांसाठी असणार खास! ‘या’ अभिनेत्रींकडे झालंय चिमुकल्या पाहुण्याचं आगमन!
Mothers Day 2022 : या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये अनेक बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री आई झाल्या आहेत.
Mothers Day 2022 : आई होणे ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. स्त्री जेव्हा आई बनते, तेव्हा तिचे संपूर्ण आयुष्य बदलते, असे म्हटले जाते. आई झाल्यावर तिला जो आनंद वाटतो तो शब्दात वर्णन करू शकत नाही. फक्त कुणा एकीसोबतच नाही, तर प्रत्येक स्त्रीला आई होताना सारखेच वाटते. सामान्य महिलाच नाही, तर मोठ्या अभिनेत्रींसाठी देखील आई बनण्याचा हा क्षण एक अतिशय आनंददायी आणि अनोखा अनुभव असतो.
अनेक अभिनेत्रींनी सांगितले की, आई झाल्यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. विश्वसुंदर ऐश्वर्या रायनेही कबूल केले होते की, आई झाल्यानंतर तिचे आयुष्य पूर्ण झाले आहे. या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये अनेक बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री आई झाल्या आहेत.
भारती सिंह
कॉमेडी क्वीन भारती सिंह नुकतीच आई झाली आहे. भारतीने एका मुलाला जन्म दिला आहे. भारती तिच्या बाळंतपणाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत सेटवर काम करत होती. तिने लाडाने तिच्या लेकाचे नाव ‘गोला’ ठेवले आहे. लवकरच बाळाचं बारसं करून त्याचं नाव ती जाहीर करणार आहे.
मृणाल दुसानिस
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. 24 मार्च रोजी तिने मुलीला जन्म दिला आहे. आमची छोटी राजकुमारी आली आहे, असे म्हणत मृणालने निरज, मृणाल आणि बाळ अशा तिघांच्या हाताचा एकत्रित फोटो शेअर केला होता.
प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्राच्या घरी सरोगसीच्या मदतीने चिमुकलीचं आगमन झालं आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात अभिनेत्री प्रियांका चोप्राने बाळाच्या आगमनाची बातमी शेअर केली होती. प्रियांका सध्या तिच्या मुलीसोबत मातृत्वाचा आनंद लुटत आहे.
काजल अग्रवाल
‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालने गेल्या वर्षी बिझनेसमन गौतम कीचलूशी लग्न केले. यंदा काजलने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. काजलने तिची ही गुड न्यूज इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
देबिना बॅनर्जी
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री देबिना बॅनर्जी तिच्या प्रेग्नेंसीमुळे खूप चर्चेत आली होती. देबिनाने 3 एप्रिल रोजी एका मुलीला जन्म दिला. देबिनासाठी आई होण्याचा प्रवास सोपा नव्हता. तब्बल 11 वर्षांनी गुरमित आणि देबिनाच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.
महत्वाच्या बातम्या :