(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : पाय जमिनीवर ठेवताच पायांच्या टाचा तीव्र दुखू लागतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला
Health Tips : सकाळी उठल्यानंतर अंथरुणावरून खाली उतरण्याचा प्रयत्न करताच टाचांत तीव्र वेदना जाणवते का? जाणून घ्या या समस्येचे कारण आणि उपाय.
Health Tips : वयाच्या तीशीनंतर बहुतेक महिलांना टाचदुखीची समस्या जाणवू लागते. मात्र, ही समस्या फक्त महिलांनाच आहे असे नाही, पुरुषांनाही टाचदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. सकाळी टाचेचे दुखणे खूप तीव्र असते, इतकं की जमिनीवर पाय पायांत तीव्र वेदना जाणवू लागतात. जरी ही वेदना दिवसभर उद्भवत असली तरी, सकाळच्या वेळी मात्र हा त्रासअसह्य होतो. असे होण्याचे कारण नेमके काय ते जाणून घ्या.
टाचदुखी का होते?
टाचदुखीच्या समस्येचे मुख्य कारण म्हणजे वाढलेले यूरिक अॅसिड (Uric Acid). ज्या लोकांचे युरिक ऍसिड खूप वाढते, त्यांना दिवसाही तीव्र वेदना आणि टाचदुखीची समस्या असते. परंतु त्याचा भयंकर परिणाम सकाळी उठल्यावर दिसून येतो.
यूरिक ऍसिड वाढण्याची कारणे कोणती आहेत?
- दैनंदिन जीवनात यूरिक अॅसिड वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खाण्यापिण्यात आरोग्यापेक्षा चवीला अधिक महत्त्व देणे. यासाठी चुकीचे अन्न खाणे, विरुद्ध प्रकृतीचे अन्न एकत्र खाणे, खाण्यापिण्याच्या वेळेची खात्री नसणे.
- आनुवंशिकता देखील यूरिक ऍसिड वाढण्याचे कारण आहे.
- दारूचे अतिसेवन हे देखील एक प्रमुख कारण आहे.
- हायपोथायरॉईडीझममुळेही युरिक अॅसिड वाढते.
- अनेक औषधांचा दीर्घकाळ वापर केल्याने देखील युरिक ऍसिड वाढू शकते.
आयुर्वेदात काय सांगितलंय?
आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते अन्नातील युरिक अॅसिड वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे कुकरमध्ये शिजवलेल्या मसूरच्या डाळीचे अतिरिक्त सेवन. या गोष्टीमुळे अनेकांना आश्चर्य वाटेल, परंतु गेल्या 41 वर्षांपासून आयुर्वेदिक औषधांद्वारे रुग्णांवर उपचार करणारे वैद्य डॉ. सुरेंद्र सिंह राजपूत म्हणतात की, आपल्या देशात आजार आणि रुग्णांच्या वाढत्या संख्येचे कारण चुकीची जीवनशैली आहे. प्राचीन काळी लोक साधी पण वैज्ञानिक जीवनशैली जगत होते. आताच्या काळात ज्या स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी कुकरचा वापर केला जातो, तेथे हे फेस वेगळे करण्याची सोय नसल्याने हे फेस शरीरात नुकसान पोहोचतात आणि युरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढवतात.
आयुर्वेदानुसार युरिक ऍसिडचे उपचार कसे करावे?
- डॉ. राजपूत सांगतात की, सर्वप्रथम तुम्ही घरच्या घरी खुल्या भांड्यात मसूर बनवायला सुरुवात करा.
- जीवनशैलीत सुधारणा करा. जसे की, झोपण्याची आणि उठण्याची आणि खाण्यापिण्याची वेळ निश्चित करा.
- हिरव्या भाज्या, सुका मेवा, ताजी फळे, दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात समावेश करा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
Drinking Water : सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर की घातक? वाचा संशोधनात काय म्हटलंय